पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

शाळेतील दिवस एक अविस्मरणीय जीवन!

इमेज
                  अन् मी शाळेत गेलो.....          " शाळेचे मुख्य आवार व इमारत, जिथे ज्ञानाचा         प्रवास  सुरू होतो"     सुट्टीमुळ दोन दिवस गावी आलो होतो.गावाकडे चांगलीच थंडी जाणवत होती.शहरातील या धाकाधुकीच्या अन् धावपळीच्या जीवनामुळे जरा निवांत पणा अनुभवा म्हणून गाढ झोपलो होतो.थंडीच्या दिवसातील अशी झोप म्हणजे नेहमी हवी हवीशी वाटणारी.कधीही झोप संपू नये अशी वाटणारी.अन् अचानक टन-टन-टन-टन असा आवाज कानावर पडला.त्या आवाजाने मी खडबडून जागा झालो.येवढे गोड स्वप्न मोडून पडणारा तो आवाज कशाचा होता.या आपल्यां स्वच्छंद मनावर एक शिस्तप्रिय वेळेचा नाजूक नियम घालणारा तो आवाज कशाचा होता.टन-टन-टन हा आवाज कानावर पडत होता.तो आवाज होता शाळेच्या घंटेचा...... घंटेचा आवाज कानावर पडताच धडपडून उठलो.धावतच अंगणामधे आलो.पहाटेचा गारवा चांगलाच अंगाला टोचत होता.पहाटेची ती नीरव शांतता मनाला प्रसन्न करतं होती.वडील अंगणामधे आंघोळीच्या पाण्याला जाळ घालत होते.चुलीतून निघणारा धूर हवेत पसरलेल्या धुक्यात अगदी घट मै...

स्री मुक्तिदाता...

इमेज
      सावित्रीबाई फुले जयंती: बालिका दिन... 3 जानेवारी 1831 हा तोच दिवस ज्या दिवशी हजारो वर्ष काळ्याकुट्ट अंधारात खितपत पडलेल्या स्री जीवनात एक आशेचा किरण उगवला.. त्यांचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले.. गीते मधे सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल, त्या त्या वेळी मी जन्म घेईल . यांचा प्रत्यय यावा अन् त्यानंच हा जन्म घेतला असावा असंच वाटाव येवढ दैदिप्यमान कर्तव्य सावित्रीबाई यांनी समजासाठी केल.त्यांच्या जन्मापूर्वी महिलांना हजारो वर्षापासून शिकायला बंदी होती.इतक्या  वर्षांच्या या परंपरा विरुध्द जाऊन त्यांनी स्रियांच्या शिक्षणाची  वाटच नाही उघडली, तर त्या साठी त्या पहिल्या शिक्षिका बनल्या.. केवळ शिक्षणच नाही तर स्री वर्गावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायावर त्यांनी आवाज उठवला.विधवा स्रियांच्या होणाऱ्या केशवपन विरुध्द नाभिकाचा संप घडून त्यांनी आणला.विधवा स्रियांसाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंध ॻृह स्थापन केले.नुसते स्थापन करून त्या थांबल्या नाहीत तर त्याच मधील एक विधवेच्या मुलाला त्यांनी दत्तक घेऊन समाजाला एक आदर्श घालून दिला.1877 महाराष्ट्रात दुष्काळ पडल्या...

नवीन वर्ष शुभेच्छा..

इमेज
महाराष्ट्रामधील तमाम वाचक वर्गाला प्रथमतः नवं वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा... मी kulदीप माझ्या या नवीन ब्लॉग मधे सगळ्याच मनःपूर्वक स्वागत करतो..या ब्लॉग च्या माध्यमातून मी आपल्यां बरोबर विचार काहूर या शीर्षकच्या माध्यमातून बोलत आहे.. माझ्या socialThinkMe मधून आपल्यां समाजातील सर्व महान व्यक्तीचं विचार ,त्यांच कार्य ,त्याची सामाजिक नाळ..व आताच समाज मन या मधे संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे... आपले हे सर्व महान आदर्श, त्यांनी घालून दिलेली पाय वाट.वसध्या आपलं जगणं या वर मी मुक्त संवाद साधून एक समाज मनच बोलत आहे;यांची जाणीव तुम्हा सगळ्या वाचक वर्गाला होईल याचा प्रयत्न करणार आहे..  आपला विनीत..kulदीप