पोस्ट्स

गावाकडील आठवणी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

माझ्या आठवणीचा हरवलेला उन्हाळा!

इमेज
तळपत होता तो लाल बुंद होऊन, अगदी सर्वांचा पिवळा पाचोळा करून.. नदी नाले गुपचूप पडलेले, फक्त वावटळ झेपावत होती उंच हात करून..

शाळेतील दिवस एक अविस्मरणीय जीवन!

इमेज
                  अन् मी शाळेत गेलो.....          " शाळेचे मुख्य आवार व इमारत, जिथे ज्ञानाचा         प्रवास  सुरू होतो"     सुट्टीमुळ दोन दिवस गावी आलो होतो.गावाकडे चांगलीच थंडी जाणवत होती.शहरातील या धाकाधुकीच्या अन् धावपळीच्या जीवनामुळे जरा निवांत पणा अनुभवा म्हणून गाढ झोपलो होतो.थंडीच्या दिवसातील अशी झोप म्हणजे नेहमी हवी हवीशी वाटणारी.कधीही झोप संपू नये अशी वाटणारी.अन् अचानक टन-टन-टन-टन असा आवाज कानावर पडला.त्या आवाजाने मी खडबडून जागा झालो.येवढे गोड स्वप्न मोडून पडणारा तो आवाज कशाचा होता.या आपल्यां स्वच्छंद मनावर एक शिस्तप्रिय वेळेचा नाजूक नियम घालणारा तो आवाज कशाचा होता.टन-टन-टन हा आवाज कानावर पडत होता.तो आवाज होता शाळेच्या घंटेचा...... घंटेचा आवाज कानावर पडताच धडपडून उठलो.धावतच अंगणामधे आलो.पहाटेचा गारवा चांगलाच अंगाला टोचत होता.पहाटेची ती नीरव शांतता मनाला प्रसन्न करतं होती.वडील अंगणामधे आंघोळीच्या पाण्याला जाळ घालत होते.चुलीतून निघणारा धूर हवेत पसरलेल्या धुक्यात अगदी घट मै...