पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

निसर्गाचा इशारा! जपा निसर्ग!

इमेज
  वारंवार येणारे महापूर - निसर्गाचा इशारा की विनाशीची नांदी...  यावेळीही मला ब्लॉग लिहिण्यास थोडा विलंब झाला. त्यामुळे प्रथमतः वाचक वर्गाची दिलगिरी व्यक्त करतो.  माझ्या या आधीच्या आठवणीतील कविता" कणा " या पोस्टमध्ये या विषयावर व्यक्त झालो होतो. मला पुन्हा त्या विषयावर लिहिण्यास भविष्यात  वेळ येईल असं मला वाटलं नव्हतं.  सप्टेंबर महिना चालू होता. पावसाचे जवळजवळ तीन महिने सरले होते. धरणी माय सर्वत्र हिरवा शालू नेसून नटली होती. बळीराजा ही या पावसाने सुखावला होता. नदीकाठ  पाण्याने तुडुंब भरून, माझं येणार वर्ष समृद्ध जाणार,जणू काय हाच संदेश देत होत. रम्य तो पावसाळा..  पावसाळ्यात येणारे नागपंचमी, रक्षाबंधन, श्रावण महिन्यातील सण. आम्ही नुकतेच आनंदाने साजरे केले. यावर्षी पावसानेही मनसोक्त पडून धरणीमायची ओटी ओसंडून भरली होती. आता आम्हा सगळ्यांना चाहू लागली होती. दिवाळी आणि दसऱ्याची.  माझ्या आठवणीतील असा हा पावसाळा. यावर मी आधीही लिहिलं होतं. तो नेहमी येताना  माझ्या आयुष्यात उत्साहच घेऊन येत असे. दरवर्षी त्याच्या येण्यान गणू काय माझ्या जीवनाला नवी पालवी...