पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

पांडू -आजच्या तरुणांचं एक वास्तव रूप!

इमेज
  ओळखीतून मैत्रीकडे प्रवास.  मी नेहमीप्रमाणे रोजच्यासारखं जिम मध्ये व्यायाम करत होतो. मी आणि माझ्या दोन-तीन मित्रपरिवारांचा हा नेहमीचा दिनक्रम. न चुकता आम्ही जिम मध्ये जमणार आणि मनसोक्त व्यायाम करणार. व्यायामाचे हे वेड मला पहिल्यापासूनच. लहानपणापासून गावाकडे ही व्यायाम केलेला. आता गेली  तीन-चार वर्ष झाले जिम घनिष्ठ नातं तयार झालं. कुठेही मनाला सुकून नाही भेटला, तरी जिम मध्ये मनाला समाधान मिळणार हे मात्र नक्की!   आयुष्यामध्ये कशाच तरी वेड असावं! आणि मला हे जिमच लागलेलं वेड! असो. काही ओळखीचे तर, काही अनोळखी माणसानी जिम सतत भरलेली. आपल्याबरोबरच कधी नवीन मुलांना काही माहिती देत. जिम करणं हे माझं रोजचंच. आजही काही नवीन आणि काही जुन्या लोकांनी जिम भरलेली.  दुःखात कायम साथ देणारे जिवलग मित्र  त्यातीलच कुणीतरी एक नवीन मुलगा. माझ्याजवळ येऊन काहीतरी माहिती विचारू लागला. मी त्याला आज पहिल्यांदाच पाहिलं होतं. साधा आणि निरागस चेहरा! ग्रामीण भागातून आला असेल असं पाहताक्षणी वाटलं. मी त्याला मनापासून माहिती सांगू लागलो. आणि तोही माझ्याबरोबर मनापासून व्यायाम करू लागला....

"युद्ध एक चाहूल, चला पुन्हा स्वयंपूर्ण श्रीमंत होवू या!"

इमेज
  मी आणि युद्ध!  मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त असणारा, एक सामान्य युवक. रोजची ठरलेली कामे, रोजच धाक दुखीचे जीवन! त्यामधून  थोडाफार मोकळा वेळ मिळाला तर, त्या वेळेत रील बघण्यात रमून जाणारा. वीकेंडला एखादी पार्टी. इतकं साधं सरळ माझं जीवन. 'आयुष्य म्हणजे अजून काय'? एवढं माझं जीवन सुरळीत चाललेला असतं. सोशल मीडियामुळे जगाचा संपर्क रोज मला नव्याने घडतच असतो. “रात्री मोबाईलवर रील्स पाहत बसलेलो मी… जगात कुठेतरी युद्ध पेटलंय, याच्याशी माझा काय संबंध? असंच मला वाटत होतं. पण काही दिवसांतच पेट्रोल पंपावरील रांगा, गॅसची टंचाई आणि खतासाठी भटकणारे शेतकरी पाहिले… तेव्हा कळलं — युद्ध हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याच्या झळा माझ्या उंबऱ्यापर्यंत पोहोचतात.” सगळं काही एकदम सुरळीत चालू असताना, म्हणतात ना संकट काही सांगून येत नाही? तसंच काहीतरी आता माझ्या आयुष्यात घडतं होत.  संकट हजारो कोस दूर तरी झाळा मात्र मला.  आपला काय दोष नसताना,काही भोग हे आपल्या वाटेला नकळत येतातच. तसंच काहीतरी माझ्या जीवनात आता घडलं. माझ्यापासून हजारो कोस दूर असणाऱ्या इराण मध्ये  युद्ध पेटलं. आणि त्...

श्रीमंत कसे व्हावे? पैशांचाखेळ की इच्छांचे गणित?

इमेज
  जवळचा एक मित्र गमावला..  मनाला खूप हेलावून टाकणारी घटना नुकतीच आयुष्यामध्ये घडून गेली. नियती एवढी पण कठोर असते. याचाच परिचय त्या दिवशी आयुष्यामध्ये झाला. ज्याच्याबरोबर लहानपणापासून खेळलो, बागडलो. अशा एका जीवाभावाच्या मित्रांन खूपच अनपेक्षित वेळी जगाचा आहे आणि माझाही निरोप घेतला होता. त्याच्या अकाली जाण्याने माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण केली होती. त्याच्या जाण्याची हानी कशानेच भरून येणारे नव्हती. त्याच्याबरोबर शाळेत घालवलेले एक एक दिवस. एकेक आठवणी डोळ्यांमध्ये अश्रूंबरोबर तरळत होत्या. अनंतामध्ये तो विलीन झाला होता ;पण माझ्या मनामध्ये विचाराचं 'अनंत काहूर ' उठलं होतं. आणि मी माझ्या अस्वस्थ मनामध्ये त्याची उत्तरं शोधत होतो.  मित्राच्याअचानक जाण्याने विचारात बुडलेला एक व्यक्ती   आपण संवाद हरवून बसलो आहे..  सोशल मीडियाने भर भरलेला हा काळ. जग अगदी कवेमध्ये आल्यासारखं वाटतं. संपर्काचे एक ना अनेक साधने उपलब्ध. फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टा, अशी एक ना अनेक साधना माझ्या हातात. पण खरच आपण मनाने एकमेकांच्या जवळ येतो का? एकमेकांच्या सुखदुःखामध्ये मनापासून सहभाग...

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

इमेज
        नका तोडू निरागस कोवळ्या कळयांना .....🙏🙏   मनात खूप भावना होत्या. पण आज बोलण्याचाही आणि लिहिण्याचाही धाडस होत नव्हतं. एखाद्या अपराध्यासारखं तब्ध होऊन एका कोपऱ्यामध्ये सुनसान बसलो होतो. डोळ्याच्या कडा आपोआप पानवत होत्या. षंड होऊनी नि:शब्द  होण्यापलीकडे मी काय करू शकत नव्हतो. बातमीच तशी कानावर पडली होती. चार वर्षाची कवळी मुलगी! माणूस रुपी राक्षसाच्या वासनेची शिकार होऊन देवा घरी गेली होती...   तिची असाह्य, बेबस अतर्क हाक माझ्या कानात शिस ओतल्यासारखी ओरडत होती....   नका तोडू कोवळ्या निरागस कळ्या..... कळी… हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येतं ते कोवळं, नाजूक, अजून पूर्ण उमलायचं असलेलं फूल. पण ही कळी फक्त निसर्गातली नाही—आपल्या समाजातली प्रत्येक मुलं ही अशीच कळी असते. त्यांच्या डोळ्यांत स्वप्नं असतात, मनात निरागसता असते, आणि आयुष्यभर फुलत राहण्याची क्षमता असते. त्या कळ्यांना योग्य वेळी प्रेम, संरक्षण आणि मार्गदर्शन मिळालं तरच त्या सुंदर फुलं बनतात. पण जेव्हा समाजातल्या काही विकृत प्रवृत्ती त्यांच्या आयुष्यावर आघात करतात, तेव्हा त्या कळ्या उमलण्य...