"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
वारंवार येणारे महापूर - निसर्गाचा इशारा की विनाशीची नांदी...
यावेळीही मला ब्लॉग लिहिण्यास थोडा विलंब झाला. त्यामुळे प्रथमतः वाचक वर्गाची दिलगिरी व्यक्त करतो.
माझ्या या आधीच्या आठवणीतील कविता" कणा " या पोस्टमध्ये या विषयावर व्यक्त झालो होतो. मला पुन्हा त्या विषयावर लिहिण्यास भविष्यात वेळ येईल असं मला वाटलं नव्हतं.
सप्टेंबर महिना चालू होता. पावसाचे जवळजवळ तीन महिने सरले होते. धरणी माय सर्वत्र हिरवा शालू नेसून नटली होती. बळीराजा ही या पावसाने सुखावला होता. नदीकाठ पाण्याने तुडुंब भरून, माझं येणार वर्ष समृद्ध जाणार,जणू काय हाच संदेश देत होत.
![]() |
| रम्य तो पावसाळा.. |
पावसाळ्यात येणारे नागपंचमी, रक्षाबंधन, श्रावण महिन्यातील सण. आम्ही नुकतेच आनंदाने साजरे केले. यावर्षी पावसानेही मनसोक्त पडून धरणीमायची ओटी ओसंडून भरली होती. आता आम्हा सगळ्यांना चाहू लागली होती. दिवाळी आणि दसऱ्याची.
माझ्या आठवणीतील असा हा पावसाळा. यावर मी आधीही लिहिलं होतं. तो नेहमी येताना माझ्या आयुष्यात उत्साहच घेऊन येत असे. दरवर्षी त्याच्या येण्यान गणू काय माझ्या जीवनाला नवी पालवीच फुटत असे. त्याच्या सोबतीने चार महिने मी जणू काय नवीन उत्सव साजरा करतो. एवढा आनंद तो माझ्या जीवनात भरत असे.
धरणी मायला हिरवा शालू नेसून, आणि माझ्या बाचं घर धान्याने भरून आनंदाने तो आमचा निरोप घेत असे.
पण अलीकडच्या काळात तो उत्सव नाही, तर भीतीचा संदेश घेऊन येत आहे की काय? याची जाणीव होत आहे.
याचं कारण सप्टेंबर महिन्यात महाकाय पडलेला पाऊस. आणि त्यामुळे निर्माण झालेली ना भूतो ना भविष्य पूर परिस्थिती.
![]() |
| महापूर निसर्ग निर्मिती की मानवर्निर्मित.. |
एकेकाळी माझ घर धन धान्याने भरणारा हा पाऊस. आज माझ्या घरातील सर्व धान्य वाहून घेऊन जात होता. त्याच्या येण्यान माझं जीवन समृद्ध करणारा, हा पाऊस आज माझंच जीवन पुरात वाहून नेत होता. याच विचाराने मी व्यस्थित झालो होतो. आज हा का एवढा निष्ठूर वागत आहे. यांचाच विचार करत असताना, भूतकाळात त्याने मला काही जाणीव करून दिली आहे का? याचा विचार मी करू लागलो.
त्यावेळी मला सगळं आठवू लागलं. या पावसाने, या निसर्गाने वारंवार मला माझ्या चुकांची जाणीव करून दिली आहे. 2005 च्या मुंबई महापुरात त्याने मला भविष्याची नांदी सांगितली होती. पण मी मानव प्राणी माझ्या चुकातून मी काय शिकत नाही हीच माझी मोठी खंत आहे.
चकचकीत शहर उभा करण्याच्या नादात मी अफाट वृक्षतोड केली. नदीच्या प्रवाहात अतिक्रमण केली. कुठे कोठे तर नैसर्गिक प्रवाह मी नाहिशेच केले. छोटे छोटे ओढे आणि नाले आता तर फक्त कागदावरच पाहायला मिळतात.
शहरात चकचकीत रस्ते करण्याच्या नादात. आम्ही सगळीकडे सिमेंट काँक्रेट ओतत गेलो. जणू काय नैसर्गिक पाणी मुरण्याची प्रत्येक जागा आम्ही लिंपत गेलो..
त्यामुळेच या वर्षी अगदी पंधरा मिनिटात हिंजवडी आयटी पार्क पावसाने जलमय करून टाकल.मी माझ्या अहंपणाच्या भावनेने निसर्गाला छेडीत होतो. त्याच पावसाने माझ्या लाखो करोडो किमतीच्या गाड्या क्षणात पाण्यात बुडून, मला आहे त्या जागी सोडून द्यायला लावल्या. कशाबशा त्या सोडून फक्त जीव वाचवायला मी पळू लागलो..
![]() |
| महापूर विनाशाची नांदी तर नाही ना! |
त्या वेळी मला जाणीव झाली. निसर्गपुढे माझी किंमत ती काय? आज तरी जीव वाचवण्यासाठी वेळ मिळत आहे. उद्या तशी वेळ ही तो देणार नाही.यातून आपण काय शिकावं का? पण छे! चुकातून शिकल तो मानव कसला. हे घडत असतानाच
मराठवाड्यात तर त्याने खूपच अक्राळ विक्राळ रूप दाखवलं. यावेळी मात्र त्यांने माझ्या हातात काहीच ठेवलं नाही. त्याला जेवढं न्यायचं होतं तेवढं वाहून नेलं. पावसाने माझ्या हातात ठेवलं होतं फक्त त्याच्यापुढे माझं असणारा छोटा रूप, माझ्या चुका, आणि माझ्या मर्यादा.
कसाबसा जीव मुठीत धरून मी मानव, कुठे घराच्या छतावर, कुठं मंदिराच्या कळसावर पुराच्या पाण्याने वेढून माझा जीव वाचवण्यासाठी आक्रोश करत होतो. मदतीची भीक मागत होतो.
माझा अहंकार सगळ्यात जास्त त्यावेळी तुटून पडला. ज्यावेळी कुठूनच अपेक्षा नसते, त्यावेळी माझं सैन्य माझ्या मदतीसाठी येत.
पण या महापुराच्या वेळी, सैन्याची एक प्रतिक्रिया माझ्या मनाला खूप भावून गेली.ती म्हणजे, " वातावरण चांगलं झाल्याशिवाय आम्ही मदतीसाठी उडान नाही करू शकत. "
त्यावेळी मला जाणीव झाली. मी करत असलेल्या प्रगतीच्या विलगनेची. आणि निसर्गपुढे असणाऱ्या माझ्या हतबलतेची. प्रगतीच्या नावाखालील निसर्गाला ओरबाडणे. एक दिवस मला किती हातबल करू शकत. मनात आणलं तर तो निसर्ग माझ्यापर्यंत मदत सुद्धा पोहोचू देणार नाही. मग मी कुठल्या प्रगतीच्या गप्पा कराव्यात..
![]() |
| महाप्रलय निसर्गाचाही आणि मानवी चुकांचाही.. |
लहानपणी मला नेहमी हवाहवासा वाटणारा पाऊस. माझ्या जीवनात आनंदाचा उत्साह घेऊन येणारा. आज माझ्या जीवनात भीतीचा महापूर घेऊन येत आहे. जर हे असंच चालू राहिलं तर, मला तो खरच भीतीदायक आणि नकोस वाटेल. पण मी त्याच्या शिवाय जगू शकेल का?
पावसा तू माझ्या जीवनात पाहिजेत रे! पण आनंदाने उत्सव घेऊन येणारा.
महापुराचा डोंगर घेऊन येणारा नको, तू बदलत आहे. याची जाणीव मला होत आहे. या चुकातून मी नक्की शिकेल. आणि तुझं स्वागत नेहमी आनंदानेच करेल. फक्त एकदा तू माफ कर.
तुम्हाला काय वाटतं, वारंवार येणारे महापूर, येणारी विनाशाची नांदी तर ठरणार नाहीत. यातून आपण काय शिकायला हवं का?
तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्कीच कळवा..
तुमचा ब्लॉग लेखक... कुलदीप लोंढे
https://www.vicharkahoor.inFollow me: Facebook | Instagram
Share:
Facebook |
Twitter |
WhatsApp
लेखक: कुलदीप लोंढे
छान लेखन कुलदीप
उत्तर द्याहटवाThanx
हटवाखूप भयानक होती ती वेळ अचानक जेव्हा पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरत होते .त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा.
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिले आहे
उत्तर द्याहटवाThanx
हटवाCHANGLI SHBD RACHNA
उत्तर द्याहटवा