"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

About Me

 

🙏 माझ्याविषयी

मी एक असा लेखक आहे जो मनातून उमटलेल्या भावनांना शब्दरूप देतो. "विचार काहूर" हा ब्लॉग मी सुरू केला तो केवळ शब्द लिहण्यासाठी नाही, तर मनाशी संवाद साधण्यासाठी, विचारांशी मैत्री करण्यासाठी आणि वाचकांच्या अंतर्मनाशी नातं जोडण्यासाठी.

इथे तुम्हाला मिळतील:

  • ✍️ मनातले विचार
  • 📜 कवितासंग्रह
  • 💭 वैयक्तिक अनुभव
  • 🌿 जीवनमूल्यांवर आधारित लेख

माझ्या मते, "प्रत्येक व्यक्तीकडे सांगण्यासारखी एक कहाणी असते – आणि ती शब्दांतून उमटली की ती दुसऱ्याच्या मनाला स्पर्श करते.

---

माझ्याबद्दल – कुलदीप लोंढे

नमस्कार!

मी कुलदीप लोंढे, सध्या सर्वज्ञ अकॅडमीमध्ये गणित व बुद्धिमत्ता (Reasoning) विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे.

📘 शैक्षणिक पात्रता:


M.A.


B.Ed.

👨‍🏫 अनुभव:

गणित व बुद्धिमत्ता विषयात विशेष प्रावीण्य

MPSC, पोलीस भरती, बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अध्यापनाचा अनुभव

विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना समजून सांगण्याची खास शैली


🖋️ लेखनाची आवड:

शिक्षणासोबतच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा व प्रेरणादायी लेख लिहिण्याची आवड आहे. ग्रामीण जीवनातील संघर्ष, तरुणाईची घुसमट आणि सकारात्मक विचार हे माझ्या लेखनाचे केंद्रबिंदू आहेत.

🎯 ध्येय:

केवळ ज्ञान देणे नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वप्न आणि संघर्ष करण्याची प्रेरणा निर्माण करणे. शिक्षण हे केवळ करिअरसाठी नसून, व्यक्तिमत्त्व घडवणारे साधन आहे, असा माझा दृढ विश्वास आहे. 

--

"ज्ञान देण्याबरोबरच मन जिंकण्याची कला मला जास्त प्रिय आहे." 

- --

तुमच्या अभिप्रायांची मी वाट पाहतो. जर काही सुचलं, भावलं, किंवा स्पर्श केलंच असेल – तर जरूर कळवा.

– [कुलदीप लोंढे ]
📬 kuldiplondhe1990@gmail.com
🔗 FB ग्रुप – मनाचे शब्द. मनाच्या आतून ..

 Social Think Me  येथील सर्व मजकूर लेखकाच्या विचारांवर आधारित असून, अधिक माहितीसाठी कृपया मुख्य पृष्ठाला भेट द्या.

टिप्पण्या

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..