पोस्ट्स

समाजमन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

"ज्ञान, संघर्ष आणि समतेचा दीपस्तंभ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर"

इमेज
            तव तेजाचा एक अंश दे...             तव ज्ञानाचा एक थेंब दे..             तव समतेचा एक कण दे..             तव करुणाची मज उब दे...     मागणं........ हा मनुष्याचा  स्थायी भाव. आपण देवाकडं सतत काही ना काही मागत असतो.. माझं काय चुकत नसेल तर बरोबर आहे का? आपण अगदी हक्कान देवाकडे मागत असतो. पण देवानंतर जर कोणाकड काही मागू वाटतं असेल तर त्या आपल्या महापुरुषांकडून!!!!  आपल्या जीवनाची शिदोरी कायम भरावी, एवढा अथांग  महासागर या सगळ्या आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलं आहे.. त्यामधून मला ज्यावेळी स्वतंत्र, समता, बंधुता, ज्ञान व न्याय हे कोणाकडे तरी मागव वाटतं. त्यावेळी माझ्यासमोर फक्त आणि फक्त....  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव येतं..   " हे हास्य केवळ हास्य नव्हे, ते एका युगाचं आत्मविश्वास आहे."   स्वतंत्र,समता बंधुता आणि ज्ञान व न्याय एवढे सगळे गुण या महामानवाकडून मागताना माझं मन मला म्हणत होतं. या गुणांची ...