पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

ती... मायक्रो फायनान्स मुळे आणखी मायक्रो होत आहे...

इमेज
  ती.. मायक्रो फायनान्स मुळे आणखी मायक्रो तर होत नाही ना?.....  माझी आजी जाऊन आज खूप दिवस झाले आहेत. तरीही तिच्या गोड आठवणींचा पसारा सदैव आपल्या भोवती असल्याचा भास होतो. आजही या धावपळीच्या जीवनात माझ्या बोटाला धरून ती, मार्गदर्शन करत असल्याची जाणीव होते. आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेल्या पायवाटेवर चालताना. ही माणसे विचाराने किती समृद्ध होती. याची जाणीव नक्कीच होते.  भले ही आजच्या काळातील मॅनेजमेंट मध्ये तीच शिक्षण झालं नसेल. ती अडाणी असताना सुद्धा, आपल्या अनुभवाच्या जोरावर तिने आपल्या प्रपंचाची, आपल्याला घराची जी व्यवस्था लावली होती. त्याचंच फळ म्हणून आजची आमची पिढी उभा होती.  त्यावेळी नव्हतं तिच्याकडे फोन पे,गुगल पे तरीपण कमरेवरील तिचा बटवा पैशाने समृद्ध असायचा. आजच्यासारखा फर्निचर समृद्ध नव्हतं तिचं घर. तरी पण वलणीवर घडी करून ठेवलेली कपडे,आहेत त्या परिस्थितीत आजीचा  व्यवस्थितपणा मला शिकवत असे. आजच्या सारखं  माझ्या आजीचं  किचन समृद्ध नव्हतं. वापरून झालेल्या पाण्याच्या माठाच्या उतरंडी मध्ये तिनं तीच जणू किचन साठवलं होतं. याची जाणीव मला आज होते....