पोस्ट्स

विचार धारा. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

शिवरायांचं बंधुप्रेम....

इमेज
       "पराक्रमाचा  तमाशा  दाखवा.."              इतिहास......मानवला सुसंस्कृत आणि समृद्ध करणार एक शास्र.गतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा घेतलेला आढावा म्हणजे इतिहास. असं म्हंटल जात इतिहास माहिती असणारी माणसच इतिहास घडवतात. या जगामध्ये घडलेल्या प्रत्येक महापुरुषान इतिहासातून योग्य ती शिकवण घेऊन, एक वेगळा इतिहास घडवला हा ही एक इतिहासच आहे. पण आज आपण इतिहासाकडं तेवढ्याच चिकित्सक दृष्टीने पाहतो का? आपण आपल्या या वैभवशाली इतिहासाला फक्त वाचनाच साधन म्हणून नाही पाहू शकत. त्यामधून आपण योग्य तो धडा घेऊन आजून पण एक आदर्श इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तयार केला पाहिजे. तरच आपण इतिहासाबदल खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपण इतिहासाला फक्त मनोरंजनसाठी वाचन करून एक चांगला समाज नाही बनू शकत. तर आपल्या त्यामधून योग्य तो बोध घेऊन तो आपल्याजीवनात उतरावा लागेल. त्यानं घालून दिलेली तत्त्व आपल्याला आज ही जगावी लागतील. कारण इतिहास हा फक्त युद्ध किंवा तलवारीचा नसतो. तो आपलं सर्वांगीण जीवन व्यापून टाकणारा असतो.  तो कधी, आदर्श रूढी,परं...