पोस्ट्स

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..

इमेज
                       प्रेम.....  प्रेम हा असा शब्द, नकळत जरी कानावर पडला तरी; या हृदयाची स्पंदन वाढवणारा. अंगावरती एक हर्षदायी काटा उभा करणारा. आठवणींच्या एका खोल भाव विश्वात घेऊन जाणारा. कधीतरी नकळतपणे डोळ्यांच्या कडा ओलावणारा, तर कधी एक स्मित हास्य निर्माण करणारा. असे एक ना अनेक रंग या प्रेमाचे. प्रेम.. कोणासाठी जीवन असत, कोणासाठी जबाबदारी असतं, कोणासाठी त्याग असतं, कोणासाठी आत्मसमर्पण असतं, तर कोणासाठी भक्ती असतं...  अशा या हिमालया एवढ्या उंची असणाऱ्या आणि समुद्र एवढी खोली असणाऱ्या " प्रेम" या विषयावर मी कधीतरी लिहील. हे माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं. कारण काही विषय अशी असतात की, त्यांच्यावर लिहिण्या  एवढी आपल्या विचारांची उंची आपण कधी गाठू शकत नाही. अशा विषयावर लिहिणं म्हणजे एक तपस्या वाटते. प्रेम या विषयावर लिहिता लिहिता कितीतरी महान लेखकांची हयात गेली. त्यामुळे त्यांच्या एवढी उंची आपण न घाटता. फक्त त्यांच्या विचारांचे पाईक व्हावं. एवढं जरी केले तरी प्रेमा विषय आपण खूप काही केल याची जाणीव होते. अन जर मला कध...

"जनरल ते एसी – प्रवास नाही, प्रतिमा आहे!"

इमेज
          नमस्कार वाचक मित्रांनो,  गेले काही दिवस ब्लॉगवर नियमितपणे काही लिहिता आलं  नाही, याची जाणीव मला होती. काही वैयक्तिक कारणांमुळे लेखनात थोडा खंड पडला. पण मनात विचार सतत चालूच होते – पुन्हा लिहायला सुरुवात करायची, पुन्हा तुमच्याशी संवाद साधायचा. आज पुन्हा नव्यानं सुरुवात करत आहे. तुमचा नेहमीसारखा विश्वास आणि साथ मिळेल, हीच आशा!          – तुमचा, कुलदीप लोंढे               दोन रेल्वे डब्बे... दोन भारत!   प्रवास! जो कधी असतो निवांत भटकंतीचा. तर कधी असतो रोजचाच पोटापाण्यासाठी केलेला. तर कधी असतो तो आपल्या गावाकडे घेऊन जाणारा. जो तो आपापल्या परीने प्रवासाला निघालेला असतो. मीही आज गावाकडे जाण्यासाठी अशाच एका प्रवासाला निघालो होतो. त्यावेळी मला कधी वाटलं सुद्धा नाही आजचा प्रवास माझ्या एवढ्या आठवणीतला बनेल. मला एवढा अंतर्मुख होऊन विचार करायला लावेल. मला एकाच प्रवासात दोन भारत पाहायला मिळेल. हो पण मी हे सगळं अनुभवलं त्याच अनुभवातील ही व्यक्त भावना......  गावी जाण्यासाठी मी लगभगने रूम ...

"DJ वर बेभान तरुणाई: एक वास्तव"

इमेज
        "गाण्याचा गोंगाट की संस्कृतीचा संकोच?"  वर्गामध्ये माझं लेक्चर चालू होतं. मुलं मन देऊन लेक्चर ऐकत होते. मुलांना थोडासा विरंगळा म्हणून, आजचा संघर्ष आणि उद्याचा भविष्य यावर थोडसं प्रेरणादायी मोटिवेशनल पीच मी त्यांना देत होतो. आजचा युवक, सामाजिक जबाबदाऱ्या, आपली स्वप्न आणि ध्येय, त्यासाठी  करावा लागणार संघर्ष आणि त्याग, आणि उद्याचं उज्वल भविष्य. यासारख्या अनेक विषयावर आमची चर्चा रंगात आली होती. मी ही जीवाच्या आकांताने बोलत होतो. अन मुलांनाही ते आपले भविष्य  साठी महत्त्वाचं आहे म्हणून ऐकावं वाटत होतं..  तेवढ्यात बाहेरून दण -दण असा मोठा आवाज येऊ लागला. माझं बोलणं मुलांना नीट समजेना असं झालं. मी मुलांना म्हणलो काय आहे?कसला आवाज आहे हा? त्यावेळी मुलं मला म्हटली, आज कसली तरी मिरवणूक आहे त्याच्यासाठी डीजे लावला आहे. त्याचा हा आवाज. मुलांचाही लक्ष त्या आवाजाकडे जात होतं. हे मी त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखलं. तेवढ्यात मुलंही मला म्हंटली सर आज लेक्चर सोडा ना लवकर. आम्हाला मिरवणूक बघायला जायचं आहे. बाहेरून येणारा मोठमोठ्याचा आवाज आणि मुलांचं बाहेर लक्ष या...

"ज्ञान, संघर्ष आणि समतेचा दीपस्तंभ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर"

इमेज
            तव तेजाचा एक अंश दे...             तव ज्ञानाचा एक थेंब दे..             तव समतेचा एक कण दे..             तव करुणाची मज उब दे...     मागणं........ हा मनुष्याचा  स्थायी भाव. आपण देवाकडं सतत काही ना काही मागत असतो.. माझं काय चुकत नसेल तर बरोबर आहे का? आपण अगदी हक्कान देवाकडे मागत असतो. पण देवानंतर जर कोणाकड काही मागू वाटतं असेल तर त्या आपल्या महापुरुषांकडून!!!!  आपल्या जीवनाची शिदोरी कायम भरावी, एवढा अथांग  महासागर या सगळ्या आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलं आहे.. त्यामधून मला ज्यावेळी स्वतंत्र, समता, बंधुता, ज्ञान व न्याय हे कोणाकडे तरी मागव वाटतं. त्यावेळी माझ्यासमोर फक्त आणि फक्त....  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव येतं..   " हे हास्य केवळ हास्य नव्हे, ते एका युगाचं आत्मविश्वास आहे."   स्वतंत्र,समता बंधुता आणि ज्ञान व न्याय एवढे सगळे गुण या महामानवाकडून मागताना माझं मन मला म्हणत होतं. या गुणांची ...

माझ्या आठवणीचा हरवलेला उन्हाळा!

इमेज
तळपत होता तो लाल बुंद होऊन, अगदी सर्वांचा पिवळा पाचोळा करून.. नदी नाले गुपचूप पडलेले, फक्त वावटळ झेपावत होती उंच हात करून..

शिवरायांचं बंधुप्रेम....

इमेज
       "पराक्रमाचा  तमाशा  दाखवा.."              इतिहास......मानवला सुसंस्कृत आणि समृद्ध करणार एक शास्र.गतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा घेतलेला आढावा म्हणजे इतिहास. असं म्हंटल जात इतिहास माहिती असणारी माणसच इतिहास घडवतात. या जगामध्ये घडलेल्या प्रत्येक महापुरुषान इतिहासातून योग्य ती शिकवण घेऊन, एक वेगळा इतिहास घडवला हा ही एक इतिहासच आहे. पण आज आपण इतिहासाकडं तेवढ्याच चिकित्सक दृष्टीने पाहतो का? आपण आपल्या या वैभवशाली इतिहासाला फक्त वाचनाच साधन म्हणून नाही पाहू शकत. त्यामधून आपण योग्य तो धडा घेऊन आजून पण एक आदर्श इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तयार केला पाहिजे. तरच आपण इतिहासाबदल खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपण इतिहासाला फक्त मनोरंजनसाठी वाचन करून एक चांगला समाज नाही बनू शकत. तर आपल्या त्यामधून योग्य तो बोध घेऊन तो आपल्याजीवनात उतरावा लागेल. त्यानं घालून दिलेली तत्त्व आपल्याला आज ही जगावी लागतील. कारण इतिहास हा फक्त युद्ध किंवा तलवारीचा नसतो. तो आपलं सर्वांगीण जीवन व्यापून टाकणारा असतो.  तो कधी, आदर्श रूढी,परं...

जीवन परी म्हणजेच लालपरी!

इमेज
                              आज तिच्याबरं प्रवास.... आज गावी जायचच हा निश्चय करून ,लवकरच रूमवर आलो .आवश्यक तेवढे साहित्य व कपडे बॅगमधे भरून गडबडीतच रूम लॉक करतं होतो.तेवढ्यात शेजारचे काका म्हटले , कारे काय गडबड गावी निघाला आहे का ? मी त्याना हो म्हंटलं.आपल्या आयुष्याचं बालपण गावी जगलेल्या या काकांना आम्ही मुलं गावी निघालो की किती कौतुक होत असे हे शब्दात सांगणे कठीण आहे.कदाचित त्याना ही आपलं शालेय जीवन आठवत असेल.असेच ते ही कधी काळी घराच्या ओढीनं गावी गेले असतील.त्या आठवणी त्याना आमच्या रुपानं आठवून खरोखरच खूप आनंद होत असेल.त्यांचा हो आनंद कितीतरी वेळा मी त्याच्या चेहऱ्यावर टिपला होता.आठवणी ! किती गोड असतात ना ? पण आठवणी फ़क्त अनुभवता येतात जगता येत नाही. काकांचा निरोप घेऊन मी लगबगीनं चालू लागलो.परतीचा प्रवास  आपोआप जलद घडतो असं म्हणतात.त्यामुळं पाऊले पटापट पडत होती.अवती भवती वाहनांची प्रचंड गर्दी अन् लोकांची वर्दळ होती.पण यांची कसलीच जाणीव आपल्याला होत नसते कारणं आपण आपल्यां दुनियेत रमलेलो असतो.प्रत्येक जण आ...