"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

शाळेतील दिवस एक अविस्मरणीय जीवन!

                अन् मी शाळेत गेलो.....

"शाळेचे आवार आणि इमारत – ग्रामीण भागातील एक शिक्षण संस्था"
        "शाळेचे मुख्य आवार व इमारत, जिथे ज्ञानाचा         प्रवास  सुरू होतो"
   


सुट्टीमुळ दोन दिवस गावी आलो होतो.गावाकडे चांगलीच थंडी जाणवत होती.शहरातील या धाकाधुकीच्या अन् धावपळीच्या जीवनामुळे जरा निवांत पणा अनुभवा म्हणून गाढ झोपलो होतो.थंडीच्या दिवसातील अशी झोप म्हणजे नेहमी हवी हवीशी वाटणारी.कधीही झोप संपू नये अशी वाटणारी.अन् अचानक टन-टन-टन-टन असा आवाज कानावर पडला.त्या आवाजाने मी खडबडून जागा झालो.येवढे गोड स्वप्न मोडून पडणारा तो आवाज कशाचा होता.या आपल्यां स्वच्छंद मनावर एक शिस्तप्रिय वेळेचा नाजूक नियम घालणारा तो आवाज कशाचा होता.टन-टन-टन हा आवाज कानावर पडत होता.तो आवाज होता शाळेच्या घंटेचा......

घंटेचा आवाज कानावर पडताच धडपडून उठलो.धावतच अंगणामधे आलो.पहाटेचा गारवा चांगलाच अंगाला टोचत होता.पहाटेची ती नीरव शांतता मनाला प्रसन्न करतं होती.वडील अंगणामधे आंघोळीच्या पाण्याला जाळ घालत होते.चुलीतून निघणारा धूर हवेत पसरलेल्या धुक्यात अगदी घट मैत्री सारखा मिसळून जात होता.तितक्याच वडील पाणी तापवता तापवता ओरडले.उशिरा उठला शाळेत जायच नाही का ? मी फ़क्त हो म्हंटलं.चुलीच्या जवळच आज्जी शेक घेत बसली होती.मी तिच्या जवळ जाऊन बसलो.स्वतः थोडं माघ सरून बस थोडा उबेला म्हणारी आज्जी मला प्रेमानं जवळ करतं होती.तिच्या त्या मायेच्या स्पर्शाने माझी सगळी झोपच पळून गेली.ब्रश करता करता आज्जीच्या कुशीतून जाळाकड पाहात होतो.कित्येक वेळी हा जाळ आपल्यां अंगावर घेऊन;आपलं जीवन काळकुट्ट करून पण दुसऱ्याच जीवन निर्मळ करणाऱ्या गरम पाण्याच्या पातेलाचा मला अभिमान वाटत होता.कस असताना निर्जीव वस्तूंची जाणीव आपल्याला होत नाही.पण आपल्यासाठी ते किती झिजत असतात.

उशीर झाल्यामुळं पटकन आंघोळ केली.खाकी पँट अन् पांढरा शर्ट हा शाळेचा गणवेश अंगावर घातला.गरबडी मध्येच इनशर्ट करतं होतो ,मला ते कधी शाळेत आवडायचं नाही.पण ते त्या वेळी मला शिकवत असेल कदाचित; आयुष्य जगताना अशा अनेक गोष्टी तुला नाही आवडल्या तरी या इन शर्ट सारख्या तुझ्या जीवनात कोंबून भरल्या जातील.इन करून झाल्यावर डोक्याला तेल लावण्यासाठी बाटली हातात घेतली.तर आमचे तेल काका जाम रुसून बसलेले.थंडीच्या दिवसात त्यानंच हे रुसन कायमचच , मग त्याना गरम करण्यासाठी सरळ चुलीच्या जाळावर धरलं.आता तेल काका गरम झाले पण आमच्या बाटली ताई पार वाकड्या तिकड्या झाल्या.थंडीच्या दिवसात अशा अनेक बाटल्या खराब केल्यामुळे आईचा सडकून मार खात असे.डोक्याला चमचमीत तेल लावत होतो ,तो पर्यंत आईनं चहा साठी आवाज दिला.चहा घेताच दप्तर ठेवत असलेल्या देवळीकड वळालो.माळवदाच्या घरातील देवळी म्हणजे आमच्या साठी कपाटच होत.त्यातून हळुच दफ्तर घेतलं,दफ्तर म्हणजे काय होत? खताच्या गोणीची शिवलेली पिशवी म्हणजे आमचं दफ्तर पण किती प्रेम असे आमचं त्यांच्यावर.बेल वाजून बराच वेळ झाला होता.सकाळची कोवळी किरण सगळीकडं पसरली होती.झाडावरची पाखरं किलबिल करून उठत होती , अगदी तसंच आम्ही सगळी मुलं शाळेकडे किलबिल करतं चालत होतो.कोण सायकल वर तर कोण चालत येत होत.मी चालत चालत अगदी शाळेच्या गेटवर आलो ;अन् तेवढ्यात माझ्या कानावर आवाज पडला.

  अरे कुलदीप तू तर शाळा सोडून खूप दिवस झाले , अन् आज अचानक असं दफ्तर घेऊन कसा काय आलास. मी खूप काबरा बावरा झालो ,मला कोणी आवाज दिला . मी इथं कसा ? मला काहीच कळत न्हवत.तेवढ्यात पुन्हां आवाज आला अरे कुलदीप घाबरु नको.मी बोलतीय मी तुझी शाळा ! ... तू आज अचानक दफ्तर घेऊन कसा आलास , आलाच आहेस तर थोड्यावेळ थांब माझ्या जवळ;मला तुझ्या बरं थोडं बोलायचं आहे.मी घाबरून गेलो होतो ,पण तिनं मायेने मला जवळ केल.अन् मला जरा हायवस वाटलं ,ती बोलत होती . आयुष्याची 8 वर्ष माझ्या जवळ खेळा , बागडला, शिकला,घडला ;अन् अचानक मला सोडून गेला आणि आज 18 वर्षा नंतर तुला माझी  आठवण आली का रे ?तुला पुढच्या प्रवासाला जाणही भाग होत . माझ्याकडून ज्ञानाची शिदोरी घेऊन तू पुढच्या वाटचालीला गेलास.पण मी तुला आज न बोलता शिकवलेल्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देणार आहे.कदाचित त्या वेळी तू लहान असल्यामुळं शिकला नशील पण मी तुला नकळत शिकवत होते.कदाचित जीवन जगताना तुला त्या उपयोगी येतील.अशा प्रकारे शाळा माझ्या बरं मनसोक्त बोलत होती ,अन् मी मन लाऊन फ़क्त ऐकत होतो.

"शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचा सहभाग – एक भावनिक क्षण"
   शाळेच्या जुन्या आवारात परतलेल्या विद्यार्थ्यांची            हालचाल – आठवणींना उजाळा देणारा क्षण"


तितक्याच सरांनी प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहण्याची सूचना दिली.उंची नुसार आम्ही मुलं उभा रहात होतो.त्यावेळी शाळा मला बोलू लागली , जीवन जगताना तुझा दृष्टीकोण कसा असावा हे मी तुला शिकवत असे ,आपल्यापेक्षा लहान जीव, आपली जीवा भावाची माणस जी तुझ्यावर विश्वास ठेऊन आपले मानतात ;त्यांच्या पाठीमागे तू पाहाडसारखं उभा रहा.या मधे तू एकटा नशील तुझे पण मित्र तुझ्या पाठीमागे तुला उभे दिसतील.एक दुसऱ्याला सांभाळून घेण्याची शिकवण मी तुला देत होते.एक हातचे आंतर घेऊन उभे रहा हे सांगताना ती बोलत होती ,या जगात खूप लोक तुझ्या अवती भवती असतील.तुला सगळेच आपलं आपलं म्हणतील.त्यातील सगळेच आपले कधी नसतील ही  त्या माणसातील माणूस ओळखायला तू शिक.अशा वेळी तू एका  हाताच्या  अंतराची शिकवण नक्कीआठव.
प्रार्थना संपताच पाळलेल 5 मिनिटांच मौन आज प्रत्येक पावलाला सांगत आहे .मौनामधे किती मन शांती असती ते...

प्रार्थना संपताच वर्गात प्रवेश केला. गेली 8 वर्ष वेगवेगळ्या वर्गात शिकलो ,रमलो ,बागडलो,तो वर्ग जणू काही माझी वाटच पाहात होता.माझ्या प्रत्येक आठवणींचा तो साक्षीदार होता.वर्गात पाऊल टाकताच माझी बॅंच माझ्याकडं कौतूकान पहात होती.अगदी मायेन मला तिनं बसून घेतलं.कितेक वर्षांच्या भेटीमुळ तिला सुधा घैवारुन आलं होत.ती बॅच मला बोलू लागली होती ; आता तू सोफा ,गादी, आराम खुर्ची वर बसत अशिल ,पण शाळेत असताना माझ्या सोबतीने तू शिकला.माझ्या अंगा खांद्यावर तू रमलास, ती कुतूहलाने विचारात होती ,तुला आठवत आहे का रे ?तुम्ही मित्र माझ्या मधोमध रेषा मारून मला वाटून घेत असे.आज पण तुम्ही मित्र असंच एक दुसऱ्याच सुख दुःख वाटून घेता का का रे ? तिला मी कस सांगणार पाखरं खूप लांब गेली ग सुख दुःख वाटून घेणं सोड आता साधी भेट पण होत नाही.ती बोलत होती आज तुझ्याकड सोशल मेडिया आहे fb, wa, insta सगळं सगळं जग तुझ्या जवळ आहे.पण शाळेच्या त्या वेळी तुझ्या मनातील भावना माझ्यावरच उमटत असे.एखाद्या तासाच्या दरम्यान थोडा वेळ भेटला तर हातावर डोकं ठेऊन किती निवांत तू माज्या डेस्कवर विसावा घेत असे.तसा विसावा तुला आता मिळतो का रे ?

 बॅंच माझ्या बरं बोलत होती.अन् मला शब्द फुटत न्हवते फ़क्त डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या.तेवढ्यात समोरच्या फळ्याकड लक्ष गेलं.पाणावलेल्या डोळ्यांनीच त्यांच्याकड पाहिलं ,मला पाहताच म्हणाला कसा आहेस तू , इथंच तू मराठी ,हिंदी ,इंग्लीश ,शिकला.इथंच तू भूगोल अन् इतिहास पण शिकला ;गणित शिकला भूमिती शिकला.पण आज एक वेगळी शिकवण तुला देतो.तुझ्या जीवनात सुख दुःख यांच्या अनेक आठवणी उमटत राहतील ,चांगल्या आठवणी कायम मनाच्या वहीत लिहीत रहा.पण वाईट अनुभवांनी खचून न जाता जसा मी डस्टर ने स्वच्छ होऊन नवीन तासासाठी तयार होत आसे.तसाच तू वाईट अनुभवांना डस्टर ने कायमच पुसून नेहमी नवीन प्रवासाला चालत रहा.फळ्याचे एक -एक शब्द मनावर कोरले जात होते.तेवढ्यात चित्रकलेचा तास चालू झाला.फळा बोला हा तुझा आवडता तास ना? अगदी स्वच्छंद पणाने तू तुझी चित्रकलेची वही रंगवत असे.तुला हवा तो रंग तू चित्रात भरत आसे.तसेच रंग आता ही तू तुझ्या जीवनात भरत जा..
       

तेवढ्यात खेळाचा तास चालू झाला.किती हवा हवासा वाटणारा हा तास , धावतच मैदानात आलो.या मातीवर खेळेळे किती तरी खेळ डोळ्यासमोर तरळत होते खो -खो , कावडी , सूर पारंब्या ,लांब उडी, असे किती तरी खेळ या मातीत मी खेळ होतो.ती माती मला बोलत होती , अगदी वेड्या सारखं तहान, भूक विसरून तू मनसोक्त खेळत होता.ऊन ,वारा यांची तुला कधी तमा न्हवती.खेळता खेळता किती तरी वेळा तू पडला तुला जखमा झाल्या तरी तू मनसोक्त खेळणं कधी सोडलं नाही.माझ्या मातीत दामूस्तर खेळून पाण्याच्या टाकीवर पोटाभर पाणी पिऊन तुझ्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद मी पहिला आहे.ती माती मला विचारात होती आज ही तसाच खेळतो का रे ? पण मी तिला कस सांगणार या मोबाईल न माझं सगळं खेळणंचा काढून घेतलं आहे ग..
मन भरून मैदानावर उड्या मारून झाल्यावर थोडा वेळ सावलीला विसावा घ्यावा म्हणून चिंचेच्या झाडाखाली आलो.

 शाळेत असताना किती तरी वेळा हिच्या चिंचा , कोवळी पन,नुकताच आलेला मोहर आवडीनं खाल्ला होता. पण ती आज बहरी न्हवती उदास उदास वाटतं होती.मी तिला विचारू लागलो का ग काय झाल ? तर ती बोलू लागली , तुम्ही पोर सोडून गेल्यानंतर मी बहरनच विसरून गेली आहे.तुम्ही पोर माझ्यावर जिवापाड प्रेम करायचा.माझ्यावर तुम्ही सूर -पारंब्या खेळायचा , माझ्या फांदीला धरून लोबकळत खेळायचा.तुम्ही मित्रांनी झाडे वाटून घेतली होती.तुम्ही आपल्यां आपल्यां चिंचच्या झाडा खाली जमा होयचा.पाण्याच्या टाकीपासून पाट पाट करून तुम्ही मला पाणी देयचा.अन् मी ही तुमच्या साठी कायम बहरत राहीचे.हे तू विसरला नाही ना? हे ती मनापासून विचारत होती. तिला मी हे कस सांगणार 10वीच्या वेळी ज्यादा तासाला थांबताना तिच्या सावलीत केलेल्या जेवणाची सर आज कितीही मोठ्या हॉटेल मधे जेवलो तरी नाही ग येत.
      

 खेळाचा तास संपताच रांगेतच वर्गात परत आलो.शाळेतील प्रत्येक गोष्ट आपुलकीने माझी विचारपुस् करतं होते.
ॻृहपाठ वही , प्रयोग वही ,चित्रकला वही ,शुध्दलेखन वही सगळ्यांची मनापासून भेट झाली.स्टाफरूम जवळून जाताना सगळे शिक्षक आठवत होते.प्रयोगशाळेतील प्रत्येक साहित्य माझ्या बरं बोलत होत.त्यांच्या निरोप घेऊन थोड्या वेळ पुलं ग्रंथालय कड वळल.प्रत्येक पुस्तकावर मायेन हात फिरत होता.
तसा माघून तास संपले.दुपारचे 12 वाजले होते.आणि पुन्हा तोच आवाज कानावर पडला ,टन-टन-टन ! 
 शाळा सुटली होती.सकाळी आलेली पाखरे आपल्यां आपल्यां घरट्याकडे परतु लागली होती.मी मात्र जाग्यावरच  स्थब्द उभा होतो.पाऊलच उचलत न्हवते.डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत होत्या.मी तसाच रडवलेल्या चेहऱ्यान कस बस करतं झेंडा वंदन च्या खांबा जवळ जाऊन बसलो.माझं सगळं मन सुन्न झालं होत.माझी ही रडवलेली अवस्था पाहून , तो खांब माझ्या खांद्यावर होत ठेऊन मला धीर देऊ लागला. कुलदीप सगळ्यांकडून काही तरी शिकत राहिला.माझ्याकडून पण काही तरी घे ;जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी माझ्या सारखं ठाम राहिला शिक.या सह्याद्री पर्वतासारखं पाय रोउन उभा रहा.माझ्या कड पहा वर्ष भर मी असाच गुपचूप असतो. पण वर्षातील 3 दिवस का होईना मी सजत असतो सगळे मला त्या वेळी सलूट करतात. तसंच तू पण तुझ्या जीवनात जे काही आनंदाचे क्षण येतील यांना मनापासून जग.कधी आलीच तुला माझी आठवण तरी माझ्या जवळ येऊन बस मी तुला इथेच उभा ठाकलेला दिसेल.

 प्रत्येकानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट मनात साठून , हातात दफ्तर घेऊन चालू लागलो होतो.पाऊल उचलत न्हवते अन् वाट दिसत न्हवती.डोळ्यांतून पाणी वाहत होत.कानावर कशाचाच आवाज पडत न्हवता.कानावर आवाज पडत होता तो फ़क्त बंद होणाऱ्या वर्ग खोल्यांच्या काड्यांचा! एक वेळ तिला डोळे भरून पाहण्याची पण माझी हिंमत झाली नाही.कारण वाहणाऱ्या डोळ्यांतून ती दिसणारच न्हवती.फ़क्त अश्रूंचे थेंब तिच्या मैदानाच्या कुशीत पडत होते..

    तेवढ्यात आईनं आवाज दिला. कुलदीपा उठ सकाळचे 11.00 वाजले आहेत !!

Follow me: Facebook | Instagram

Share: Facebook | Twitter | WhatsApp

लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..