आज तिच्याबरं प्रवास....
आज गावी जायचच हा निश्चय करून ,लवकरच रूमवर आलो .आवश्यक तेवढे साहित्य व कपडे बॅगमधे भरून गडबडीतच रूम लॉक करतं होतो.तेवढ्यात शेजारचे काका म्हटले , कारे काय गडबड गावी निघाला आहे का ? मी त्याना हो म्हंटलं.आपल्या आयुष्याचं बालपण गावी जगलेल्या या काकांना आम्ही मुलं गावी निघालो की किती कौतुक होत असे हे शब्दात सांगणे कठीण आहे.कदाचित त्याना ही आपलं शालेय जीवन आठवत असेल.असेच ते ही कधी काळी घराच्या ओढीनं गावी गेले असतील.त्या आठवणी त्याना आमच्या रुपानं आठवून खरोखरच खूप आनंद होत असेल.त्यांचा हो आनंद कितीतरी वेळा मी त्याच्या चेहऱ्यावर टिपला होता.आठवणी ! किती गोड असतात ना ? पण आठवणी फ़क्त अनुभवता येतात जगता येत नाही.काकांचा निरोप घेऊन मी लगबगीनं चालू लागलो.परतीचा प्रवास आपोआप जलद घडतो असं म्हणतात.त्यामुळं पाऊले पटापट पडत होती.अवती भवती वाहनांची प्रचंड गर्दी अन् लोकांची वर्दळ होती.पण यांची कसलीच जाणीव आपल्याला होत नसते कारणं आपण आपल्यां दुनियेत रमलेलो असतो.प्रत्येक जण आपल्यां आपल्या प्रवासाला निघालेला.तो ही असा प्रवास जो कुठंपर्यंत चालत राहणार हे कोणालाच माहीत नसतं.तरी आपण रोज धावपळ करत राहतो.या प्रवासात कधी कोणाची साथ लाभते तर कधी -कधी एकट्यालाच हा अनंताचा प्रवास करावा लागतो.डोक्यात चालणाऱ्या या विचारांच्या वादळात कधी बस स्टॉप वर आलो कळच नाही.
आपलं जीवन पण एक प्रवासचं आहे ,रोजची धावपळ करता करता आपण कधी आपल्या स्टॉपला पोचतो हे कळतच नाही.
बस स्टॉप वर तिची वाट पाहात बाकावर बसलो होतो.आज किती तरी दिवसांनी तिची वाट पाहात होतो.बऱ्याच वर्षा पूर्वी 12वी च्या परीक्षेसाठी तालुक्याच्या गावी मुक्कामी राहिलो होतो.तेव्हा ही अशीच तिची वाट पाहात असे.कारण ती त्यावेळ माझ्या घरच्यांनी पाठवलेला जेवणाचा डब्बा घेऊन येत असे. तेव्हां पासून तीच अन् माझं नात हे खूप घट्ट असं झालेलं.मला कायमच तीच आकर्षण राहिलेलं आहे.मला ती कायम खूप खूप जवळची वाटतं राहिली.लहानपणी किती तरी वेळा ती रस्त्यानं जात असताना मी तिला डोळेभरून पाहातअसे. आपल्या सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम करणारी ती कायम धावताना पाहून माझं मन व्याकूळ होयच.अशा तिच्या एक ना अनेक आठवणी डोक्यात थैमान घालत असताना , डौलत- डौलत आपले पुढचे दोन डोळे चमकवत ती आली.ती म्हणजे..माझी आवडती लालपरी...
ती स्टँड ला लागताच धावतच तिच्याकडे निघालो.आता पर्यंत आपल्याबरोबर सोबती आलेल्या लोकाना ती सोडत होती.तर त्यांचं वेळी नवीन प्रवाश्यांना ती आपल्यां कुशीत ही घेत होती.आपलं जीवन ही असंच ना कधी सुखाची साथ मिळते तर कधी दुःख बरं आपल्याला चालावं लागत.पण हा प्रवास आपल्याला करावाच लागतो.गर्दी मधून वाट काढत मी वरती चढलो.बसायला जागा नाही भेटली.पाठीवरची बॅग वरती ठेवली,अन सीटचा आधार घेत उभा राहिलो.एखादा नम्र सेवक कसा असावा याच उत्तम उदहारण म्हणजेआपली लालपरी.
तिच्यात बसता क्षणी तुमचं साहित्य माझ्या जवळ वरती ठेऊन तुम्ही निवांत बसा असंच ती प्रत्येकाला सांगत असते.सर्व प्रवाशी आल्यावर वाहकाने दरवाजा लावला व बेल दिली.बेल देताच ती आपल्यां पुढच्या प्रवासाला निघाली.आताच तर
आली होती विसाव्यला.प्रत्येकाला आपल्या आपल्या ठिकाणी पोहचायसाठी ही किती धावपळ करतं असते याचा विचार मी करतं होतो.
तेवढ्यात ही आपली लालपरी मला काही तरी बोलू लागली. आज खूप दिवसांनी आलास, खूप दिवसांनी तुला माझी आठवण आली.ते ही खरच होत म्हणा खूप दिवस झाल लालपरीन प्रवास केलाच नव्हता.पुढच्या स्टॉप वर थोडे प्रवाशी उतरल्यावर मला जागा भेटली.मग मी निवांत पणे लालपरीबरं गप्पा मारू लागलो.ती ही मान मोकळेपनान बोलू लागली.तुमच्या सगळ्यांच्या घरातीलच मी एक असल्यासारखी तुमच्या सेवेसाठी मी नेहमी धावत असते.ग्रामीण भागातील तर मी जीवनवाहिनीच होऊन गेली आहे.अतिशय दुर्घम भागात पण मी तुमच्या साठी धावते.तेथे तुम्हाला तालुक्याच्या गावाला जायला ,आठवडे बाजार ला जायला , तालुक्याला दवाखान्यात जायला तुम्ही सगळे माझी वाट पाहात असता.अन् मी ही तुमच्या साठी अहोरात्र धावत राहाते.समाजाचा एक अविभाज्य भागच असल्यासारखं मी तुमच्या सगळ्यात नांदत असते. अगदी शालेय जीवनापासून मी तुमची सोबत करते.शालेय जीवनात माझा पास काढून तुम्ही मुलं मोठ्या कॉलेज मधे जाऊन शिकला ,अन् मोठ्या पदावर गेला याचा मला खूप खूप अभिमान वाटतो.तुम्ही शाळेत असताना तुम्हाला सहलीला घेऊन जाऊन महाराष्ट् दर्शन करायला मीच तुम्हाला घेऊन जाते. मला तर असं वाटतं की मनसोक्त फिरायचं बाळकडूच ती आपल्याला त्या वेळी पाजते.
तुम्ही लोक माझ्यावर अवलंबून असता अन् मला ही तुमच्या साठी खप काही करावं वाटतं.त्यासाठी मी मुलींसाठी मोफत पास करून त्यांची सेवा करते.तर आता महिलांसाठी मी अर्ध्या तिकीट मधे त्यांची सेवा करते.तुमच्या साठी जमेल तेवढं करून मी नेहमी धावत असते.काही गावांमध्ये शेवटची गाडी म्हणून तुम्हाला सोडवायला मुक्कामी गाडी म्हणून तुमच्या गावात मी मुक्कामाला पण येते.अन् सकाळी उठून परगावी शिकणाऱ्या साऱ्या मुलांचे डब्बे घेऊन मी तुमच्या कड येते.माझ्या मुळ तुम्ही मुलं घरचं जेवण करता याचा मला खूप आनंद होतो. तुमच्या प्रत्येक कामात मी तुम्हाला मदत करते.निवडणुका लागल्या की अगदी मतपेटी सुधा मीच तुमच्या गावात घेऊन येते.तुम्हाला कधी देव दर्शन करायचं असेल तर अगदी तुमच्या गावापर्यंत मी येते.पंढरीच्या वारीच्या वेळी तुम्हाला माझी आठवण येते. येवढेच काय तर कोरोना काळात तुम्ही सगळे लॉकडाउन मधे पडले असताना ज्ञानेश्वर महाराज अन् तुकाराम महाराज यांच्या पादुका घेऊन पण मीच गेले.व तुमची वारी मी पूर्ण केली.
प्रत्येक क्षणाला तुम्हाला तुमच्या ध्येया पर्यंत सोडण्यासाठी मी धावत राहाते.तुमच्या शालेय जीवनापासून मी तुमची सोबत करते. आता तर तुमच्या घरातील आजी आजोबाना मदत म्हणून मी त्याना फ्री मधे नेहु लागली आहे.अपंग व्यक्तींना मदत म्हणून मी त्याना सवलत देते.अन् मी हे सगळं मनोभावे करते.मी कधी उच - नीच , जात - पात, भेदभाव करतं नाही.जो कोणी येईल त्यांची सगळ्यांची मनोभावे सेवा करते.माझ्या कुशीत घेऊन त्याच्या ठिकाणी त्याना सुखरूप सोडवते.
अन् या बदल्यात तुम्ही काय करता माझ्याबरोबर. या वेळी मला तिच्या डोळ्यातील राग दिसत होता ती सांगू लागली.
कोणत्याही आंदोलनच्या वेळी तुमच्या रागाचा पहिला दगड माझ्यावर मारता.माझ्या काचा फोडून मला घायाळ करता.त्या वेळी तुम्ही पोर माझा हा विचार करतं नाही की या लालपरीनच
मी शिकत असताना माझा डब्बा आणला होता.माझे टायर जळताना तुम्ही हा विचार करतं नाही ते माझे पाय आहेत अन् याच पायाने पळून मी तुम्हाला कधी मामा च्या गावाला सोडलं आहे.तर कधी शाळा कॉलेज ला सोडलं आहे. तर कधी तुम्हाला मी सहलीला घेऊन गेली आहे. येवढी सगळी तुमची सेवा करून ही तुम्ही माझ्यावर दगड उचलता.माझ्या काचा फोडता,मला पेटून देता. मी घायाळ होऊन जळत रहाते पण तुम्हा लेकराना काही बोलत नाही.
कारण तुम्ही माझी लेकरे आहात.मुलांनी जर आई वर हात उचलला तर त्या हाताची तक्रार मी कोणाकड करणार....
तेवढ्यात बेल वाजली..तिनं मला उतरताना शेवटचं विचारलं सुखरूप आला ना रे लेकरा.
तिचे ते शब्द येकुन मी निशब्द झालो ! स्टॉप वर उतरताना मी फ़क्त तिच्या पाहीऱ्याना स्पर्श करून हात जोडले............
# वाचन वेडा
#लालपरी
#गावगडा
खूप छान कुलदीप 👌
उत्तर द्याहटवा1 no
उत्तर द्याहटवाAPRTIM
उत्तर द्याहटवाsamajik vichar kryla lavnara lekh
उत्तर द्याहटवा