"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

स्री मुक्तिदाता...

     सावित्रीबाई फुले जयंती: बालिका दिन...

3 जानेवारी 1831 हा तोच दिवस ज्या दिवशी हजारो वर्ष काळ्याकुट्ट अंधारात खितपत पडलेल्या स्री जीवनात एक आशेचा किरण उगवला..

त्यांचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले..

गीते मधे सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल, त्या त्या वेळी मी जन्म घेईल . यांचा प्रत्यय यावा अन् त्यानंच हा जन्म घेतला असावा असंच वाटाव येवढ दैदिप्यमान कर्तव्य सावित्रीबाई यांनी समजासाठी केल.त्यांच्या जन्मापूर्वी महिलांना हजारो वर्षापासून शिकायला बंदी होती.इतक्या  वर्षांच्या या परंपरा विरुध्द जाऊन त्यांनी स्रियांच्या शिक्षणाची  वाटच नाही उघडली, तर त्या साठी त्या पहिल्या शिक्षिका बनल्या..

केवळ शिक्षणच नाही तर स्री वर्गावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायावर त्यांनी आवाज उठवला.विधवा स्रियांच्या होणाऱ्या केशवपन विरुध्द नाभिकाचा संप घडून त्यांनी आणला.विधवा स्रियांसाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंध ॻृह स्थापन केले.नुसते स्थापन करून त्या थांबल्या नाहीत तर त्याच मधील एक विधवेच्या मुलाला त्यांनी दत्तक घेऊन समाजाला एक आदर्श घालून दिला.1877 महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर धनकवडी येथे उभारलेल्या आश्रमात त्यांनी स्वतः स्वयंपाक करून लोकांची सेवा केली.

त्या कळी जाती पातीची विषारी मुळ असताना देखील ग्यानबा सासणे यांची मुलगी राधा हिचा विवाह यशवंत फुले यांच्याशी लाऊन दिला.आधुनिक भारतातील हा पहिला आंतरजातीय विवाह मनाला जातो..नाना प्रकारे अथक समाज सेवा करता करता त्या 'सत्यशोधक समाजाच्या ' सासवड परिषदच्या अध्यक्ष बनल्या.

एक महान व्यक्तिमत्व हे फ़क्त एका गुणावर उभा नसतं रहात.त्या साठी सर्वगुणसंपन्न ते बनाव लागत.याचाच परिचय आपल्याल सावित्रीबाईच्या जीवनात पाहिला मिळतो.त्या फ़क्त समाजसेवे पुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत..साहित्या मधे ही त्यांनी आपला ठसा उमटवला.. 1850 ला 'काव्यफुले' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.तसेच 'बावनकाशी सुबोध रत्नाकर ' हा काव्यसंग्रह पण आपल्याला त्याच्या व्यक्तीमत्वची उंची दाखवतो..

मारता मारता ही कस जगावं! हे या महान व्यक्तिमत्वान आपल्या संपूर्ण समाज जगाला दाखून दिलं.  1897 ला प्लेग साथीच्या वेळी असंख्य प्लेग रुग्णांची सेवा करता करता,या महान आत्म्याचा प्लेगची लागणहोऊनच अंत झाला!....

 आज त्याच्या जयंतीनिमित्त त्याच्या आठवणींना उजळा देताना , एक मन विचारत त्या काळी येवढे हाल सहन करून स्री जीवनात प्रकाश भरणाऱ्या आपल्यां सगळ्यांच्या आदर्श सावित्रिबाई. पण आज आपण त्याच्या मार्गावर चालतो का ?आज ही स्री सगळ्या रूढी परंपरा यातून मुक्त आहे का ? आज ही समाजानं तिला मानाचं स्थान दिलं आहे का ?आज ही ती समाजातील काही क्रूर नजरेतून सुरक्षित आहे का ?

आज आपण ज्यांचं स्मरण करतो त्याच्या डोळ्यांतून आपण तिच्या कड पाहणार आहे का ? का निर्भया बनून आज ही ती डाहा फोडेल यांचा विचार आज आपण सगळेजण  करूया.अन् या महान आत्म्यास अभिवादन करूया 🙏🙏


Follow me: Facebook | Instagram

Poll:
तुम्हाला हा लेख कसा वाटला?
उत्कृष्ट
चांगला
सरासरी
सुधारणा हवी

Share: Facebook | Twitter | WhatsApp

Comment:


लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..