"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

हरवलेलं माणुसपण!

 माणूसपण – आता कुठं दिसतंय का?

 “कधी कधी वाटतं…

हा रस्ता मी चालतोय की रस्ता माझ्या मागे चालत येतोय?”

              "रस्ते कितीही लांब असले तरी 

         माणूसपणाचं गाव अजूनही सापडलेलं नाही!"

आज आपण इतक्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आहोत की जग एक "ग्लोबल व्हिलेज" झालं आहे. पण तरीही, माणसं अधिक एकटी झाली आहेत. आपल्याला जग जिंकायचंय, पण त्यासाठी आपली संवेदना गमावलीय. आज कोणाला काही झालं, तर आपल्याला त्याचं दुःख वाटत नाही, वाटतं "आपलं नाही ना, मग काय करायचं?"

कधी काळी घरातले मोठे अंगणात बसून गप्पा मारायचे. आज सगळे एकाच घरात असूनही स्क्रीनमध्ये बंद झालेत.

आपल्याला दुसऱ्याच्या मनात डोकावणं, त्याच्या भावनांची किंमत करणं, ही कला हरवून बसलोय आपण. शाळा शिकवलं की पाटी-पुस्तकं; पण माणूस होण्याचं शाळा विसरलीत का?

             "एकटेपणातच खरं माणूस सापडतो,

            कारण गर्दीत चेहऱ्यांचे मुखवटे असतात."

त्या रिकाम्या बाकड्यासारखंच झालंय आजचं समाजजीवन — जागा आहे, पण कोणी जवळ येत नाही. संवादाची जागा फॉरवर्डेड मेसेजेसनी घेतलीय. विचारांची जागा हेडलाईन्सनी भरलीय.

> माणुसकी कुठं गेली?

ती तर होती प्रत्येकाच्या नजरेत, हळवेपणात, आणि निःस्वार्थ वागण्यात.

आता माणुसकीची जागा घेतलीय ‘स्वतःच्या फायद्या’ने. कोणाला मदत करायला अगोदर विचार येतो – “मला काय मिळणार यातून?”

आपण नात्यांमध्ये ‘गुणवत्ता’ ऐवजी ‘सोयी’ शोधतो. आणि म्हणूनच माणूसपण आता केवळ शब्दांपुरतं उरलंय...

शेवटी, इतकंच म्हणावंसं वाटतं…

“जग बदलतंय हे खरंय,

पण आपण आपलं माणूसपण विसरून चाललोय.

त्याला पुन्हा शोधा — एखाद्या ओळखीच्या हास्यात,

किंवा अनोळखीच्या अश्रूंमध्ये.”


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..