"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
तव तेजाचा एक अंश दे...
तव ज्ञानाचा एक थेंब दे..
तव समतेचा एक कण दे..
तव करुणाची मज उब दे...
मागणं........हा मनुष्याचा स्थायी भाव. आपण देवाकडं सतत काही ना काही मागत असतो.. माझं काय चुकत नसेल तर बरोबर आहे का? आपण अगदी हक्कान देवाकडे मागत असतो. पण देवानंतर जर कोणाकड काही मागू वाटतं असेल तर त्या आपल्या महापुरुषांकडून!!!!
आपल्या जीवनाची शिदोरी कायम भरावी, एवढा अथांग महासागर या सगळ्या आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलं आहे.. त्यामधून मला ज्यावेळी स्वतंत्र, समता, बंधुता, ज्ञान व न्याय हे कोणाकडे तरी मागव वाटतं. त्यावेळी माझ्यासमोर फक्त आणि फक्त....
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव येतं..
" हे हास्य केवळ हास्य नव्हे, ते एका युगाचं आत्मविश्वास आहे."
स्वतंत्र,समता बंधुता आणि ज्ञान व न्याय एवढे सगळे गुण या महामानवाकडून मागताना माझं मन मला म्हणत होतं. या गुणांची पाईक होण्याची क्षमता तुझ्याकडे आहे का? काय? काय जाणतो या महामानवा विषयी तू? इतिहास हा फक्त घडलेल्या घटनांचा टाईम लाईन नसतो. तो इतिहास अभ्यासायचा असेल तर त्या विचारांची आपल्याला एकरूप व्हावा लागतो. माझी जिद्दनाशा जागृत होत होती. अन मला चिकित्सक इतिहासात डोकवायचं होतं. म्हणून मी माझ्या मनाला म्हटलं. चल मला त्यांच्या विचारांच्या दुनियेत घेऊन..
माझं मन मला सांगत होतं इतिहास हा फक्त महामानवांच्या जन्म आणि मृत्यू तारकांपुरता पहायचा नसतो. तो त्यांच्या विचारांबर जगावा लागतो. मला हे पटत होतं. कारण मी हे पाहिलं होतं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान व्यक्तीमत्व यांची जयंती सुद्धा तारखेच्या वादामध्ये अडकली.
मला फक्त या महामानवाच्या विचाराचा थोडा तरी अंश दे. मी मागत होतो. अन त्यामुळे माझं मन मला इतिहासाच्या त्या काळा वरती घेऊन गेलं.. याच याच काळामध्ये हजारो वर्ष खिदपत पडलेला होता एक समाज. गाव कुसा बाहेर पडलेला. अज्ञान,दारिद्र्य, अन रूढी परंपरा याच्यात अडकलेला. मेलेली जनावर गावाबाहेर ओढून टाकणारा. अन आपली पोटाची ईदभर खळगी भरण्यासाठी त्यांचच मांस खाणारा इतक करुण दिवस जगत होता हा समाज. त्या समाजात एक शुक्रतारा जन्मावा अशा या दिव्य महामानवाचा जन्म झाला.
त्यांचं नाव म्हणजे "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर "
बापरे समाजाची ही परिस्थिती एकूण माझ्या अंगावर काटा आला. या परिस्थितीमधून कसा हा महामानव उभा राहिला असेल. ज्याने केवळ त्या समाजासाठीच नव्हे.तर या देशासाठी व संपूर्ण मानव जातीसाठी एक नवा इतिहास आणि एक नवा आदर्श घालून दिला.
मला प्रचंड ओढ लागली. या अद्वितीय मानवाविषयी, आणि त्यांच्या प्रत्येक विचारांविषयी जाणून घेण्याची..
इतिहास मला अगदी त्यांच्या जवळ घेऊन जात होता. या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी इंदूर जवळ महू येथील लष्करी छावणीत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीला झाले. ज्यावेळी शिक्षणाची दारे या सगळ्यांसाठी बंद असताना हा महामानव शिकत राहिला. आपल्या खडतर प्रवासातून 1915साली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून एम ए पदी मिळवली. 1916 मध्ये ' भारतीय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ :क्करण परिशिलन ' या प्रबंधासाठी कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी दिली. तर 1921 ते त्यांनी ' प्रोएशियन्स ड्रीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया ' या प्रबंधासाठी एम एस पदी मिळवली. तर 1922 लंडन विद्यापटात सादर केलेल्या ' प्रॉब्लेम ऑफ द रुपी ' या प्रबंधामुळे त्यांना डी एस सी ही पदवी मिळाली. 1923 साली ते बॅरिस्टर परीक्षा पास झाले.
माझं मन तर अगदी चक्रावून गेलं होतं. अरे जो समाज जर शिक्षणापासून वंचित होता. त्या समाजात एक महामानव एवढ्या पदव्या घेऊ शकतो? त्यावेळी मला इतिहास बोलू लागला. मी असाच असतो. जो नेहमी खडतर आणि काटेरी प्रवासातूनच लिहिला जातो. तू फक्त ते बॅरिस्टर झाले एवढं वाचलं. पण तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रोज त्यांनी 21 तास अभ्यास केला हे मला तुला शिकवायचं आहे.
"अखंड वाचन आणि चिंतन यातून घडलेला विचारमंथनाचा महामेरू – बाबासाहेब आंबेडकर..
अशा अनेक उच्च शिक्षणाचा आणि पदव्यांचा त्यांनी महामेरू उभा केला होता. इतिहास मला सांगत होता, शिक्षणाचा उपयोग समाजासाठी कसा करावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या या शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर त्यांनी हजारो वर्ष अस्पृश्य म्हणून जगलेल्या समाजाला आपल्यातील आत्म सन्मानाची जाणीव करून दिली. व समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले. सामाजिक कार्यासाठी त्यांनी, 1924 सली बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. याचा उद्देश होता. बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे. आणि या सभेचे एक ब्रीद वाक्य होतं ते म्हणजे. "शिका, संघटित, व्हा संघर्ष करा."
आपल्या दलित व अस्पृश्य बांधवांसाठी सार्वजनिक पुरवठ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळावा म्हणून 1927 ला महाड सत्याग्रह केला. आपल्या समाज बांधवातील मनोबल वाढवण्यासाठी ज्या रूढी परंपरांच्या विळख्यात ते अडकले होते. त्या तोडण्यासाठी, 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचे दहन केले. देव हा सर्वांसाठीच असतो ना? मग माझ्या समाज बांधवांसाठी का नाही? यासाठी त्यांनी अंबादेवी मंदिर सत्याग्रह केला. त्याचबरोबर 3 मार्च 1930 ला काळाराम मंदिर सत्याग्रह केला. 1932साली गोलमेज परिषदेला त्यांनी अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व केले.
समाजाला योग्य नेतृत्व आणि दिशा द्यायची असेल तर फक्त सामाजिक संघटना करून उपयोग नाही तर आपल्याला राज्यकर्ते व्हावे लागेल.ही त्यांची मूलभूत विचारधारा होती. यासाठी त्यांनी 1936 ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. या पक्षाचे धोरण ' कबाड कष्ट करणाऱ्या वर्गाचे हित जोपासणे हे होतं.' हाच पक्ष त्यांनी1942 ला अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन म्हणून विस्तारित केला.
सामाजिक कार्य, पक्ष संघटना याबरोबरच समाजाला मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर त्यांच्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचा आहे. याची जाणीव त्यांना कायम होती. त्यामुळेच त्यांनी. 1945 ला मुंबईमध्ये पीपल एज्युकेशन सोसायटी. ची स्थापना केली. मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरू केले.
इतिहास मला विचारत होता, आहे ना हे खरंच अचंबित करणार. समाज शिक्षणापासूनच कोसो दूर होता. त्याच्यातीलच एक शुक्रतारा आज शिक्षण संस्था उभा करत होता. हे सगळं कशामुळे होत होतं. तर ते फक्त "शिक्षणामुळे "
या महामानवाची व्याप्ती फक्त सामाजिक कार्य, सामाजिक संघटना, पक्ष, शैक्षणिक संस्था एवढ्या पुढची मर्यादित न राहता. समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता. यासारखे वृत्तपत्र सुरू केली. मूकनायक हे पाक्षिक चालवण्यासाठी त्यांना राजर्षी शाहू महाराजांनी मदत केली. मला तुला हे का सांगायचं आहे?. ते यासाठी ' समतेसाठी या लोकांनी आपल्याला त्यावेळी समतेचा विचार दिला. तर आज का आपण जातीपातीमध्ये भांडत बसलो आहे.
"जनतेसाठी संविधानाचा ध्यास घेऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक शोषितांपर्यंत परिवर्तनाचा मंत्र पोहोचवला."बापरे केवढं हे मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व! एकेक गोष्ट ऐकून थक्क होत होतं. त्यावेळी इतिहास मला म्हटला अजून तर एक अंश सुद्धा तू जाणून घेतला नाही. आपले या महान विचार समृद्धीचा ठेवा त्यांनी साहित्य रूपाने माझ्याबरोबर ठेवला आहे. त्यासाठी त्यांनी.. प्रॉब्लेम ऑफ रुपी, अनहिलेशन ऑफ कास्ट, थॉट्स ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, द अनटचेबल्स, रिडल्स ऑफ हिंदू जम, फेडरेशन वर्सेस फ्रीडम, स्टेट अँड मायनॉरिटी, महाराष्ट्र ऍज अ लिंग्विस्टिक स्टेट, स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड हेअर रेमेडीज, शूद्र पूर्वी कोण होते?, बुद्ध अँड हिज धम्म, द युवोल्युशन ऑफ प्रोविन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, पाली ग्रामर. यासारखे साहित्य त्यांनी लिहून ठेवले. बापरे! माझी तर ऐकून तुमच्या खोत होती. पण इतिहास मला सांगत होता. बाबासाहेब नेहमी म्हणत,
" माझे पुस्तकावर सर्वाधिक प्रेम आहे, ते माझा श्वासो श्वास आहेत. त्यांच्या शिवाय मी जगू शकणार नाही. "
हे सांगताना इतिहासाने मला एक टोला मारला. आजच्या या सोशल मीडियाच्या काळात. तू वाचन करतो का रे? तुझ्याकडे पुस्तकांचा थोडातरी संग्रह आहे का? आणि खरोखरच माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हतं.
इतिहास मला त्यांचे विषय भरभरून सांगत होता. आणि मी मन लावून ऐकत होतो.
इतिहास म्हणाला, हे तुला कुठे ना कुठे माझ्याकडेच म्हणजेच इतिहासात मिळेल. पण मला आज तुला द्यायचं आहे ते म्हणजे त्यांचा विचार. ते नेहमी म्हणत ' स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.'' जो माणूस मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो. ' स्वाभिमानाचा आणि स्वतंत्र्याचा दीप कधी विस्ता कामा नये ',' बुद्धीचा उपयोग भाकर, शिक्षण, व राजसत्ता मिळवण्यासाठी हवा '.' मत विकणे हा गुन्हा आहे शिवाय तो आत्मघातही आहे ',' स्वातंत्र्याचा अर्थ उच्चवर्णी यांना स्वातंत्र्य व आमच्यावर आधी राज्य असा कधीच होऊ शकत नाही., माझ्या पुस्तकाला बेलीफहाने हात लावल तर त्याला गोळ्या घालीन.,,' विद्यार्थ्याने शिक्षणापेक्षा राजकारणात दंग होणे हा शैक्षणिक रास होय." प्रामाणिकपणा,कर्तव्याची जाणीव व राष्ट्रीय हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची परंपरा आहे.. "
आता मात्र माझी झोळी या व्यक्तिमत्त्वाचं तेज पाहून अपुरी पडली होती. त्यावेळी इतिहास मला म्हटला, अजून खूप काही आहे या महान मानवा विषयी बोलण्यासारखं. वेळ मिळेल तेव्हा बोलतच जाऊ, पण तुला जाता जाता एक शेवटचं सांगतो.
" हजारो वर्षाची परंपरा लाभलेल्या या महान भारत देशाची राज्यघटना या महान मानवाने लिहिली.
भारतीय राज्यघटनेचे लेखन ही केवळ कायद्याची प्रक्रिया नव्हती, तर एक समानतेची न्यायाची आणि स्वतंत्र्याची अभिव्यक्ती होती.
ते केवळ घटनेचे शिल्पकार नव्हते, ते समतेचा योद्धा मानवतेचे प्रतीक आणि विचारांचा वादळ होते..
इतिहासाने मला सांगितलेल्या या ज्ञानाने मी खरोखरच दिपून गेलो होतो. जाता जाता इतिहास मला म्हटला. आजच्या युवा पिढीने बाबासाहेब कडून काय शिकावे?
तर हे 1) संकटापुढे न झुकता डोळसपणे मार्ग काढावा. 2) आत्मविश्वास बाळगावा आणि शिक्षणाला सर्वोच्च मान द्यावा
3) आणि समाजासाठी एकजुटीने कृती करावी...
एवढं सगळं ऐकून त्या महान आत्म्यासमोर माझं मन नतमस्तक झालं. अन मी उठून चालायला लागलो, त्यावेळी इतिहास मला म्हटला, कुठे निघालास आज त्यांची जयंती आहे. बाहेर थोडं नाचून येतोस का?..
मी म्हटलं नाही, ग्रंथालयात चाललो आहे त्यांना थोडं वाचून येतो......
मनापासून लिहिलं आहे.... मनापासून वाचा
- लेखक कुलदीप लोंढे..
"ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली? आपला प्रतिसाद, मत, किंवा आठवणी कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा रिप्लाय ऐकायला आवडेल!"
Follow me: Facebook | Instagram
Share: Facebook | Twitter | WhatsApp
Comment:
लेखक: कुलदीप लोंढे
mahamanav la naman ....khup sundar
उत्तर द्याहटवाChaan 👌
उत्तर द्याहटवा