नमस्कार वाचक मित्रांनो,
गेले काही दिवस ब्लॉगवर नियमितपणे काही लिहिता आलं नाही, याची जाणीव मला होती. काही वैयक्तिक कारणांमुळे लेखनात थोडा खंड पडला. पण मनात विचार सतत चालूच होते – पुन्हा लिहायला सुरुवात करायची, पुन्हा तुमच्याशी संवाद साधायचा.
आज पुन्हा नव्यानं सुरुवात करत आहे. तुमचा नेहमीसारखा विश्वास आणि साथ मिळेल, हीच आशा!
– तुमचा, कुलदीप लोंढे
दोन रेल्वे डब्बे... दोन भारत!
प्रवास! जो कधी असतो निवांत भटकंतीचा. तर कधी असतो रोजचाच पोटापाण्यासाठी केलेला. तर कधी असतो तो आपल्या गावाकडे घेऊन जाणारा. जो तो आपापल्या परीने प्रवासाला निघालेला असतो. मीही आज गावाकडे जाण्यासाठी अशाच एका प्रवासाला निघालो होतो. त्यावेळी मला कधी वाटलं सुद्धा नाही आजचा प्रवास माझ्या एवढ्या आठवणीतला बनेल. मला एवढा अंतर्मुख होऊन विचार करायला लावेल. मला एकाच प्रवासात दोन भारत पाहायला मिळेल. हो पण मी हे सगळं अनुभवलं त्याच अनुभवातील ही व्यक्त भावना......
गावी जाण्यासाठी मी लगभगने रूम सोडून रेल्वे स्टेशनवर आलो होतो. नेहमी गावी जाण्यासाठी हा माझा सततचाच असणारा प्रवास. पुणे स्टेशनहून रेल्वे पकडून दौंडला उतरायचं आणि तिथून पुढे एसटीने आपलं गाव गाठायचं. हा नेहमीचा अंगवळणी पडलेला प्रवास. आपल्या खाजगी वाहनातून प्रवास करणे हे जरी आजकाल प्रतिष्ठित झाल असलं तरी. आपल्या वाटणाऱ्या सरकारी साधनांमधून प्रवास करणं मला नेहमीच आवडणार राहिला आहे. आपले सर्व सरकारी साधनांचा आपण सर्वांनी योग्य उपयोग करावा. आणि या सरकारी साधनांनी अशीच गोरगरिबांची सेवा करावी असं मला नेहमी वाटत राहतं. माझ्या मनात विचारांची जशी ही गर्दी चालू होती. तशी स्टेशनवर ही प्रचंड गर्दी होती..
 |
| याच ट्रेनमध्ये दोन देश आहेत – एक गरिबांचा, एक निवांतांचा. |
|
|
🚆 जनरल डब्ब्यातील वास्तव
मीही या गर्दीचा एक भाग झालो होतो. ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर उभा होतो. इतक्यात ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. या प्रचंड गर्दीमध्ये कोण उतरण्यासाठी तर कोण ट्रेनमध्ये चढण्यासाठी जीवाची कसरत करत होता. तसा हा आमचा नेहमीचा प्रवास असल्यामुळे आम्ही मित्रमंडळी नेहमी एसी, स्लीपर, अशा डब्यात घुसूनच प्रवास करत असे. कारण आमचा प्रवास एक ते दीड तासाचा असे. त्यामुळे आम्ही कधी जनरल डब्याकडे फिरकत नसे. त्यादिवशीही आम्ही असंच गर्दीतून वाट काढत एखादा स्लीपर चा डबा पाहत होतो. कारण तिकडे गर्दी खूप कमी असते. जो तो गाडीमध्ये चढण्यासाठी जीवाचे कसरत करत होता. असंच गर्दीतून जनरल डब्याच्या समोरून जाताना ती गर्दी डोळ्यात मावत नव्हती. लोकांची ती जीवघेणे धडपड आज मला वेगळीच जाणवत होती. त्यातच मी पुढे सरकत असताना एकादृश्याने मला विचलित केले. एक गरीब महिला आपल्या मुलाला कडवरती घेऊन त्या जनरल डब्यात शिरण्याचा अतोनात प्रयत्न करत होती. पण डब्यात शरण्यास मुंगीसही जागा नव्हती. पण तीही तेवढ्या आकांताने प्रयत्न करत होते. कदाचित तिच्या गावी जाण्यासाठी ही एकमेव ट्रेन असेल. तिचा तो धक्काबुक्कीच्या गर्दीतून ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न पाहून मी तिथेच थांबलो. मी मित्राच्या मदतीने कसं तरी तिला डब्यात शिरण्यास मदत केली. आणि मित्रला बोलो आपण आज याच डब्यात जायचं. डब्यात प्रचंड गर्दी होती. अगदी उभा राहिला सुद्धा जागा नव्हती. एखाद्या गोधडीत कोंबून कुंबून चिंध्या भरावेत अगदी तशी माणसं भरली होती. आम्ही दोघे मित्र तर अगदी एका एका पायावरच उभा राहिलो.
कारण हा डबा होता गोरगरिबांचा, कामगारांचा, आणि वंचितांचा. हे पण लोक कोणत्या न कोणत्या रूपाने काहीतरी टॅक्स सरकारला देतच असतील ना. काही बर अपेक्षा असतील या लोकांच्या सरकारकडून. या विषयावर मी आणि मित्र बोलू लागलो. ती पण लोक योग्य ते तिकीट काढूनच आले असतील ना. खूप काय अपेक्षा नसेल ना या लोकांची. नको असेल या लोकांना एसी पण या लोकांना बसायला पुरेशी जागा तरी मिळाली एवढीच अपेक्षा असेल ना. बसायला तर सोडा उभा राहिला ही जागा नव्हती. दरवाजापासून ते टॉयलेट मध्येही उभे राहिलेली माणसं आम्ही पाहत होतो. एवढ्या प्रचंड गर्दीतही कोणीतरी एका माऊलीने एक झोळी बांधून त्यात आपले बाळ टाकलेले आम्ही पाहिले. माझा मित्र मला मिश्किल पणे म्हणाला 21 व्या शतकातील भारत तो बाळ झोळीतून पाहत आहे.
 |
जिथं सीट नाही, तिथं जागेचा कोणताही कोपरा पुरेसा वाटतो.
|
मी त्या बाळाच्या वडिलांना विचारलं किती दिवस लागतात तुम्हाला घरी जायला. तो म्हणला दोन दिवसाचा प्रवास आहे रेल्वे मधील. म्हणजे दोन दिवस ते आई-वडील उभा राहून आणि ते बाळ झोळीतून प्रवास करणार होतं. मी मित्राला म्हटलो जर जागाच उपलब्ध नसेल तर सरकार तिकिटाचे पैसे घेऊन तिकीट तरी कशाला देत असेल. त्यावर मित्र मला सांगत होता. तुला माहीत नाही आधी तरी जनरल चे दोन डबे असायचे. आता तर ते कमी करून एकच डब्बा केला आहे. काही दिवसांनी गोरगरीब जनतेने प्रवासच करू नये असं फर्मान सरकार काढेल. त्याचही असे नेहमीच मिश्किलपणे बोलणं मी जाणवत होतो. पण ते सत्य होतं आणि मनाला लागत होत.
त्यावेळी मला जाणीव झाली हा फक्त प्रवास नाही " हा एक लढा आहे जीवन जगण्याचा " जवळजवळ अर्धा तास आम्ही एका पायावरती उभा होतो. आमच्या आधी बसलेली माणसं थकून जाऊन उभ्यानेच झोपत पेंगळत असल्याची आम्ही पाहिली. ज्यांच्या वाटेला आयुष्यभर कष्ट येत त्यांच्या वाट्याला कमीत कमी प्रवास तरी सुखाचा यावा असं मला खूप वाटत होतं. पण पण हे दृश्य खूप भयान होतं. उभा राहिलेले हे माणसं मला माणसं वाटत नव्हती. तर गरिबीन त्यांचा फक्त सापळा झालेला मला जाणवत होता. जो बसण्यासाठी फक्त एक ईतभर जागेसाठी दहा फोडत होता.
घाम, गर्दी, आणि जागेसाठी झुंज
 |
| "पायांवर उभं राहून धडपडत चाललेलं आयुष्य" |
तेवढ्यात गाडी उरुळीच्या स्टेशनवर थांबली. मित्र म्हणाला मी एक सेकंदपण येथे उभा राहू शकत नाही मी पाठीमागे चाललो. तुला यायचं असेल तर चल. माझाही नाईलाज होता पाय दुखून आले होते. आम्ही एसी च्या डब्यात प्रवेश केला. येथील परिस्थिती पूर्ण वेगळी होती. इथं कमीत कमी उभा राहण्यासाठी मोकळीच मोकळी जागा होती. मेन दरवाजा उघडून आम्ही आत मध्ये प्रवेश करताच. मंद हवेची झुळूक अंगाला प्रसन्न करत होती. एका वेगळ्याच जगात आल्याचा भास होत होता. जिथे त्या डब्यात उभा राहिला ही जागा नव्हती. इथे तर एका एका बाकड्यावरती एक एक माणूस निवांत झोपला होता. सरकारने दिलेली त्यांना स्वच्छ बेडशीट होती. वरून एसीची थंडगार हवा! मी मित्राला म्हणलो, आयुष्य 360 अंशात फिरल्या सारखं वाटत आहे रे! कुठे ती जीवघेणी उभा राहण्यासाठी धडपड आणि कुठे इथे एसी मध्ये झोपण्यासाठी बेड! मी दोन जग पाहत असल्यासारखं मला वाटत आहे. मित्र म्हणाला तू दोन जग नाही दोन भारत पाहत आहे. तो जनरल डब्यातील गरीब कामगारांचा भारत आहे. आणि हा एसी मधील आधुनिक इंडिया आहे. " त्या जनरल डब्याला गरिबीचा शाप असतो, तर या एसी डब्याला श्रीमतीचे वरदान असतं "
मी त्याला बोलत होतो. अरे ती पण लोकच आहेत ना. किमान सरकारने ती लोक ही तिकीट काढतात. त्यांनाही बसण्यापुरती तरी जागा द्यावी. नुसतील त्यांच्याकडे रिझर्वेशन साठी पैसे पण मग काय त्यांनी असा जीव घेणा टॉयलेट मध्येही उभा राहून प्रवासच करायचा. असं कसं त्यांचा कोण विचार करत नाही?
त्यावर मित्र हसून म्हणला, अरे विचार करतात ना यांचा, निवडणुकीमध्ये यांचा तर सगळ्यात जास्त विचार केला जातो. गोरगरीब जनतेसाठी सामान्य लोकांसाठी काम करायला निवडून द्या असे म्हणणारे लोक कधी त्या जनरल मध्ये मधून उभारून प्रवास करतील का? अरे या गरीब जनतेचा विचार फक्त मतांसाठीच असतो.
❄️ एसी डब्ब्याचा निवांतपणा
 |
| इथे संवाद नाही, पण शांतता इतकी की विचार खोल जातात. |
आम्ही असंच बोलत बोलत एसीच्या डब्यातून पुढे पुढे चालत होतो. आमच्या सारखीच जनरल डब्यातून फक्त उभा राहायला मिळावे म्हणून काही लोकही इथे आलेली होती. एखाद्या बाकड्याजवळ ती उभा राहिलेली दिसत होती. ती तिथेही उभा होते आणि इथेही उभा होते. मित्र मला बोलत होता. आपल्या देशामध्ये गरीबी श्रीमंतीची दरी तर वाढतच आहे. पण त्याच बरोबर माणुसकी, आपुलकी याची ही दरी खूप वाढत आहे. त्याच्या बोलण्यावर मी मनात विचार करत होतो. इतक्यात एसीच्या डब्यातून पुढे सरकत असताना, एक दृश्य माझ्या मनाला खूप लागलं. दरवाज्याच्या तिथेच थोडी जागा असते. त्याच्याच बाजूला रेल्वेचे टॉयलेट असतं. अन त्या थोड्याशा मोकळ्या जागेत दोन-तीन महिला आपला डब्बा काढून जेवण करत होत्या अगदी टॉयलेटच्या बाजूला!
मी मित्राला म्हणलो, कदाचित हे नियमात नसेल पण कुणीतरी
एसी मधील एकानं तरी म्हणायला पाहिजेत रे इथं नका जेवण करू. जेवण करेपर्यंत तरी आत बसा. एवढी तरी माणुसकी असायला हवे रे. त्यावर मित्र हसून बोलला, आत्ताच बोललो तुला आपल्या समाजात फक्त गरीब श्रीमंतीचे दरी वाढली नाही. तर ती विचारांची, माणुसकीची, आपलेपणाची, एकमेकांच्या दुःखाची होणारी जाणीव या सगळ्याचीच दरी वाढली आहे. गप्पा मारत तसंच आम्ही पुढे चालत होतो. रेल्वेच्या दोन डब्यांना जोडणाऱ्या त्या छोट्याशा जागेवरही लोक उभा राहून प्रवास करत होते. तिथं रेल्वेचा जास्त धडधड आवाज येत होता. कदाचित त्या आवाजातलोक आपले दुःख विसरून जात असतील. मित्र सांगत होता हे सगळे लोक रोज पुण्यात याच श्रीमंत लोकांच्या घरात काम करतात. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी असंच उभा राहून प्रवास करून घरी जातात. यांची खूप अपेक्षा नसते. फक्त दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर, निवांत बसण्यासाठी थोडी जागा मिळावी. पण ती त्यांच्या नशिबात नसते. ती असते फक्त जनरल डब्यात कोंबून कोंबून भरलेली. लटकत उभारलेली..
एसीच्या डब्यात खिडकीच्या स्वच्छ काचे मधून, एसी च्या थंडगार हवे मधून इंडिया मधील ही लोक बाहेरचा सुंदर नजारा पाहत होती. त्याचवेळी जनरल डब्यातील माझ्या भारताचे गरीब कामगार लोक गर्दीमध्ये उभा राहून पिंगळून गेली होती. त्यांना कुठे दिसणार होते खिडकी मधून सुंदर निसर्ग. मला तर वाटत होते त्यांना त्यांचा आयुष्यही सुंदर दिसत नसेल....
तेवढेच आमचा स्टॉप आला. आम्ही खाली उतरून प्लॅटफॉर्मवर चालायला लागलो. एसी डब्यामधून उतरलो होतो. तरी पण मला आपुलकी त्या जनरल डब्याची वाटत होती. कारण पृथ्वी ही शेषाच्या फणावर नाही तर, गोरगरीब कामगारांच्या हातावर उभा राहिले आहे. तेच हात आयुष्यभर कबाड कष्ट करून सुखासाठी दोन दिवस गावाकडे जाण्यासाठी त्या जनरल डब्यात लटकत होते.
माझ्या डोक्यात चाललेले विचारांची घालमेल पाहून. मित्र मला म्हणाला. तुला काय वाटतं?
या गरीब जनतेसाठीही सरकारने बसण्यासाठी किमान योग्य जागा उपलब्ध करून द्यावी की नाही?
का जनरलचे डबेच बंद करून फक्त श्रीमंतांनीच रिझर्वेशन मधून प्रवास करावा अशी सोय करावी?
मला खात्री झाली होती. त्या जनरल डबेतील लोकांचा प्रवास नव्हता तो एक लढा होता जीवन जगण्यासाठी केलेला..
मनात असंख्य प्रश्न बोलत होते. पण उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे मी तुम्हा वाचक वर्गांनाच विचारतो...
तुम्हाला यावर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा....
मी वाट पाहत आहे.
- तुमचाच लेखक कुलदीप लोंढे..
#प्रेरणा व चांगला विचार... विचार काहूर....
Follow me:
Facebook |
Instagram
Share:
Facebook |
Twitter |
WhatsApp
लेखक: कुलदीप लोंढे
kup sundar
उत्तर द्याहटवाNice👌
उत्तर द्याहटवामी सुद्धा हा अनुभव घेतला आहे.
उत्तर द्याहटवाreal fact
उत्तर द्याहटवाNICE
उत्तर द्याहटवा