"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
“मोबाईल युग : तेजाकडून तिमिराकडे… पुन्हा जुन्या काळाची हाक”
आज पुन्हा एकदा ब्लॉग लिहून मला खूप काळ झाला होता. मला ज्याच्यावर लिहायचं होतं, त्याच्यामुळेच मला लिहिण्यासाठी वेळ मिळत नव्हता. आमच्या दोघातील हा संघर्ष मी बऱ्याच दिवस अनुभवत होतो. एखादी गोष्ट खूप तीव्रतेने मनातून करावी असे वाटावे, आणि त्यासाठीच वेळ न मिळावा. या दोन टोकांच्या भावना मी खूप दिवस अनुभवत होतो. आणि आज मला वेळेने त्यावर व्यक्त होण्यासाठी वेळ दिलाच..
आज मी अस्वस्थ भावनेने येऊन, शांत चित्तेने रूमवर बसलो होतो. हातामध्ये पेन होता आणि मनाला न समजणाऱ्या रेषा मी कागदावर ओढत होतो. मनाची अशी अवस्था पहिल्यांदाच अनुभवत होतो. त्याला कारणही तसंच होतं, आत्ता बाहेरून येताना मी हॉस्पिटल मधून आलो होतो. आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याचा कारण होतं. मला न येणारी झोप!
तुम्हाला प्रश्न पडला असेल? यासाठी कोण हॉस्पिटल ला जातं का?कारण थोडं वेगळं होतं. पण ते खरं हे होतं. खूप दिवस मनाची अस्वस्थता वाढत होती. त्यामुळे मी आज जवळच्याच ओळखीच्या डॉक्टरला आवर्जून भेटण्यासाठी गेलो होतो. गेल्यानंतर त्यांनी मला प्रेमाने विचारपूस केली. का आला होतास असा प्रश्न विचारताच? मी त्यांना म्हटलं,
खूप दिवस झाले मी शांत झोपलोच नाही. नाही! सर तसं नाही,खरंतर मला झोपच येत नाही!
माझी ही तक्रार ऐकताच. त्यांनी एक स्मित हास्य केलं. आणि मला म्हटले, मी तुला यावर नक्कीच उपचार देणार. पण आज नाही उद्या. पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. आज रूमवर गेल्यावर. आत्ताच्या या क्षणापासून तुला लहानपणीचा जोपर्यंत काळा आठवत आहे. तो सगळा शांत मनाने आठव. आणि उद्या पुन्हा माझ्याकडे. मी तुझ्या या अस्वस्थ्येवर नक्कीच उपचार करेल. त्यांचा हा सल्ला ऐकून नुकताच मी रूमवर पोचलो होतो.
ते असे का बोलले असतील? मला झोप न येण्यामागे आज पासून पाठीमागचा काळ का आठवायला लावला असेल? याचाच विचार करत मी बसलो होतो.
![]() |
| "तेजाकडून तिमिराकडे... पुन्हा आपल्या जुन्या काळात जाऊ वाटतं, जेव्हा चांदण्याची रात्रच आपली स्क्रीन होती आणि निसर्गच आपला मित्र होता." 🌌 |
जणू काय मी तेजा कडून तिमिराकडे जात आहे....
माझी सकाळची सुरुवातच त्याच्या दर्शनाने होत होती. पहाटे उठल्या उठल्या, तास -अर्धा तास, सोशल मीडियाच्या आभासी मित्रांबरोबर मी रोजच बोलत आहे. कसंतरी त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडतो. रोजची दैनंदिन कामे उरतो. तेवढ्यात नाश्ता करताना, पुन्हा मला सोशल मीडियावर जावं वाटतं. आज जर काय स्टेटस ठेवलं नाही, तर मनाला अस्वस्थ वाटतं. लागलीच चार दोन स्टेटस ठेवून. गडबडीने पुढील कामासाठी जाऊ लागतो. थोडाफार वेळ काम करतातच. मला माझ्या स्टेटस ची आठवण येते. मनाला हुर लागते. किती लोकांनी माझे स्टेटस पाहिला असेल. ते पाहण्यासाठी पुन्हा मोबाईल चाळू लागतो. आणि पुन्हा एकदा तास अर्धा तास, सोशल मीडियावरील आभा सी मित्रांना भेटून येतो.
कामातून थोडाफार वेळ मिळाला तर, माझ्या मनाला थोडं मनोरंजन हवा वाटतं, त्यासाठी मी पुन्हा मोबाईल हातात घेतो. आणि रिल्स बघता बघता. दोन-तीन तास त्याच्याबरोबर घालवतो. संध्याकाळी मैदानावरती आम्ही सर्व मित्र नक्कीच भेटतो. व्यायाम करण्यासाठी. पण त्यातील बहुतांश वेळ आम्ही सगळेजण मिळून आपापल्या मोबाईल मध्ये रिल्स बघत असतो. हे मात्र नक्की..
जेवताना सुद्धा मात्र मी एकटाच जेवत नाही. त्याला माझ्यासमोर ठेवूनच. त्याच्यावरील रिल्स स्क्रोल करत करतच. मी जेवण करतो. कधी एकदा जेवण करेल आणि मोबाईल हातात घेईल, असं मात्र सतत वाटत असतं. त्याच्यानंतर त्याची आणि माझी संगत चालते ती, रात्री अकरा बारा वाजेपर्यंत. दिवसभराच्या कामानं शरीर थकला असला तरी, आणि डोळे आपोआप झाकत असले तरी. मी मात्र त्याला सोडत नाही. यासाठी मध्ये त्याची चार्जिंग न संपवी म्हणून मी लाईटचा बोर्ड अगदी माझ्या बिछान्या जवळ लावून घेतलेला. चार्जिंगला लावूनच तू माझ्यासोबत करतो अकरा बारा वाजेपर्यंत. कसंतरी मनावर दगड ठेवून त्याला बाजूला केलं तरी त्याच्या आठवणी सहजासहजी झोप येत नाही. अशीच वेळ पुढे सरकत जाते. आणि पहाटे थोडीफार लागलेली झोप सुद्धा मोडून मी पुन्हा त्याच्यावर रिल्स पाहू लागतो.
चला मला माझ्या आताच्या काळातील जीवन तरी या निमित्ताने कळलं होतं. पण मला डॉक्टर ने सांगितल्याप्रमाणे मला आज पासून लहानपणापर्यंत जायचं होतं..
आणि तोही काळ मी आठवू लागलो, मला आजही तो काळ आठवत आहे. आम्ही सर्व मित्र सवंगडी शाळेवरच झोपायला असायचो. आयुष्याची जवळजवळ 10-12 वर्षे आम्ही शाळेच्या मैदानावरती झोपलो. कधी लाईट गेली तर चिमणीच्या उजडा पुढे केलेला अभ्यास. आणि नंतर चंद्राच्या शीतल प्रकाशाखाली शाळेच्या मैदानावरती घेतलेली ती सुरेल झोप. स्वर्ग सुखापेक्षा नक्कीच कमी नव्हती. त्यावेळी आमच्या हातात मोबाईल नव्हता. किती मनसोक्त संवादआम्ही एकमेकांबरोबर करायचो. गप्पा मारता मारता. गार वाहणाऱ्या त्या वाऱ्यामध्ये, चंद्राच्या प्रकाशात, आणि गावाच्या मातीमध्ये कधी शांत झोप लागत होती. हे कळत सुद्धा नव्हते. त्यावेळी उठण्यासाठी आम्हाला अलार्म ची गरज नव्हती. सभोवती होणारा पक्षांचा किलबिलाट, कोंबड्याचा आरवणे, आणि गाय गुरांचे हंबरणे हाच आमचा अलार्म होता.
शाळा सुटल्यानंतर त्याकाळी आम्ही, पुन्हा सायंकाळी शाळेच्या मैदानावरती मोबाईलवर रिल्स पाहण्यासाठी जमत नव्हतो. आम्ही मैदानावरती जमायचो, कबड्डी, खो-खो, सुरपाटे खेळण्यासाठी. आजच्या सोशल मीडिया एवढे चार-पाच हजाराच्या घरात मित्र नव्हते. चार-पाच मित्रच असायचे पण खूप जीवाभावाचे असायचे. आईच्या हातचे चुलीवरील जेवण करताना, तिच्या हाताला होणारे चटके आणि चुलीवरील जाळ हेच पाहत आम्ही जेवण करत असे.
त्या काळी मनोरंजनाची खूप साधने नव्हती. गणपती उत्सवामध्ये गावामध्ये पडद्यावर पिक्चर पाहण्यासाठी आम्ही सगळे मित्रमंडळी चालत जात असे. सगळ्यांबरोबर मिळून पाहिलेला पिक्चर, कधी सगळ्यांबरोबर मिळून ऐकलेलं किर्तन. हेच आमचे मनोज रंजन. साधन कमी होती. पण समाधान खरोखरच खूप होतं.
आजच्या मोबाईल सारखा एका सेकंदात इकडल्या तिकडे मेसेज जात नव्हता. पण पाहुण्याच्या येणाऱ्या पत्राची वाट मात्र कायम पाहत असे आम्ही. त्याच रोज संवाद होत नव्हता. पण प्रेम मात्र अतोनात भरलं होतं. आज मोबाईल मुळे क्षणाक्षणाला मेसेज येतात. पण आपलेपणा क्वचितच येतो.
हे सर्व आठवताना, मला खरोखरच जाणीव झाली होती. मी का अस्वस्थ झालो आहे. मी का शांत झोपू शकत नाही. कारण माझ्याकडे मोबाईलच साधन होतं. पण समाधान नव्हतं. आणि माझ्या त्या लहानपणीच्या काळामध्ये साधन खरोखरच खूप कमी होती. पण त्याच्यामध्ये समाधान खूप होतं.
आज मला याची जाणीव झाली. आजच्या काळात मोबाईल गरज आहे.. तो माझ्या हातात हवा. पण त्याच्या ताब्यात मी असायला नाही पाहिजे. आपल्या सुखासाठी वापरत असलेली ही साधनं. नकळत आपलं सुखच नाही ना हिरावून घेत याचाही आपण विचार करायला हवा.
![]() |
| समाधानाचा रस्ता.. अंतकरणातून मिळतो. त्यासाठी भौतिक साधन लागत नाही |
मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण त्याच वेळी तो आपल्याला आपल्या जगण्याच्या गुंत्यातही अडकवतो.
आपण मोबाईल वापरतो, की मोबाईल आपल्याला वापरतो, याचा विचार कधी आपण करीतच नाही.
नाती जवळ आणण्याऐवजी मोबाईलने माणसाला एकटं केल आहे..मोबाईलमुळे माहितीचा सागर मिळतो, पण त्याच वेळी मनःशांती हरवते....मोबाईलशिवाय जीवन अपूर्ण वाटतं, पण मोबाईलमुळेच खरी नाती अपूर्ण राहतात.....
त्याकाळी मी शाळेत शिकलो होतो, तिमिरातून तेजाकडे...
म्हणजे या विज्ञानाच्या साधनाने माझे हे अंधारमय जीवन नक्कीच प्रकाशमान व्हावे,सुखकर व्हावे, समाधानी व्हावे.
पण आज जर मी, त्यांच्याच आहारी जाऊन. माझं जीवन जर अंधारमय करत असेल, अस्वस्थ होत असेल, असमाधानी होत असेल. तर आज मला परतीचा प्रवास सुरू करून, म्हणावे लागेल..
तेजाकडून तिमिराकडे, पुन्हा जुन्या काळात जावा वाटत आहे.!
कारण तिथे विज्ञानाची साधन मात्र मिळणार नाहीत.पण सुख आणि समाधान मात्र खूप मिळेल.
मला माझ्या अनेक प्रश्नाचे उत्तर मिळाले होती. आपल्याला क्षणभर सुख देणारी भौतिक साधन पाहिजेत. की मनाला चिरकाल शांती देणार समाधान पाहिजे. यावर विचार करून मी मैदानाकडे जाऊ लागलो होतो. ते म्हणजे मनसोक्त खेळण्यासाठी. मोबाईलवर रिल्स पाण्यासाठी नाही.
असो थांबवण्यात, तुम्हाला काय वाटतं, मोबाईल आपल्या हातात असावा, पण आपण त्याच्या ताब्यात नसावा..
आयुष्यात साधनं महत्त्वाची की समाधान... यावर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा... मी वाट पाहत आहे..
आपलाच ब्लॉगर लेखक......कुलदीप लोंढे......
Follow me: Facebook | Instagram
Share:
Facebook |
Twitter |
WhatsApp
लेखक: कुलदीप लोंढे
VERY GOOD
उत्तर द्याहटवाSUNDAR LEKH
उत्तर द्याहटवासुंदर लेखन
उत्तर द्याहटवासुंदर लेखन
उत्तर द्याहटवा