"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

ती... मायक्रो फायनान्स मुळे आणखी मायक्रो होत आहे...

 ती.. मायक्रो फायनान्स मुळे आणखी मायक्रो तर होत नाही ना?.....

 माझी आजी जाऊन आज खूप दिवस झाले आहेत. तरीही तिच्या गोड आठवणींचा पसारा सदैव आपल्या भोवती असल्याचा भास होतो. आजही या धावपळीच्या जीवनात माझ्या बोटाला धरून ती, मार्गदर्शन करत असल्याची जाणीव होते. आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेल्या पायवाटेवर चालताना. ही माणसे विचाराने किती समृद्ध होती. याची जाणीव नक्कीच होते.

 भले ही आजच्या काळातील मॅनेजमेंट मध्ये तीच शिक्षण झालं नसेल. ती अडाणी असताना सुद्धा, आपल्या अनुभवाच्या जोरावर तिने आपल्या प्रपंचाची, आपल्याला घराची जी व्यवस्था लावली होती. त्याचंच फळ म्हणून आजची आमची पिढी उभा होती.

 त्यावेळी नव्हतं तिच्याकडे फोन पे,गुगल पे तरीपण कमरेवरील तिचा बटवा पैशाने समृद्ध असायचा. आजच्यासारखा फर्निचर समृद्ध नव्हतं तिचं घर. तरी पण वलणीवर घडी करून ठेवलेली कपडे,आहेत त्या परिस्थितीत आजीचा  व्यवस्थितपणा मला शिकवत असे. आजच्या सारखं  माझ्या आजीचं  किचन समृद्ध नव्हतं. वापरून झालेल्या पाण्याच्या माठाच्या उतरंडी मध्ये तिनं तीच जणू किचन साठवलं होतं. याची जाणीव मला आज होते.

👉 "आजीकडे शिक्षण नव्हतं, पण अनुभवाचा बटवा होता; आज शिक्षण आहे पण कर्जाचा डोंगर आहे..."

 प्रचंड गरिबीच्या काळातही आजीने बसवलेली घराची घडी. छोट्या छोट्या गोष्टीतील आजीचं  मायक्रो व्यवस्थापन मला आजही खूप काही शिकवत.

 पण मला हे आज सर्व का आठवत होतं. त्याचं कारण नुकतच लेक्चर संपून रूमवर परतत होतो. येताना एका वस्ती वरती थोडीशी गर्दी दिसल्यामुळे थांबलो होतो. काय चाललय पाहण्यासाठी थांबलो असता, काही महिलांनी मायक्रो फायनान्स कडून घेतलेलं कर्ज, आणि त्याच्या वसुलीसाठी आलेले लोक असा काय तो प्रकार होता. त्यासाठी रस्त्यावरती वादावादी चालू होती. तो सगळा प्रकार पाहून मी माझ्या रूम कडे परतु लागलो.

 रूमवर आल्यावर पण माझ्या डोळ्यासमोरून तो प्रकार जात नव्हता. कारण याआधी  खूप वेळा पेपरमध्ये वाचलं होतं. बातम्यांमध्ये ऐकलं होतं. 

 " मायक्रो  फायनानच्या जाळ्यात अडकत चाललेल्या महिला."

 त्यामुळे या विषयावर जवळून अभ्यास करण्याचा ही मी आधी प्रयत्न केला होता. आणि आज तो प्रसंग पाहून मायक्रो फायनान्स च्या विषयावर मी खोलवर विचार करू लागलो.

 आपल्या घरातील चैनीच्या  वस्तूसाठी सहज उपलब्ध होत असलेल्या कर्जामुळे महिला धडा -धड नको त्या वस्तू घेत होत्या. आणि ज्यावेळी ते कर्ज आणि त्यावरील व्याज भरण्याची वेळ येत होती. त्यावेळी मात्र त्यांची दमछाक होत होती. घेतलेले कर्ज त्याच्यावरील व्याज भरताना त्यांच्या हातात सेविंग नावाचा प्रकार राहत नव्हता.

 काही काही महिला तर जुनं मायक्रो फायनान्स भरण्यासाठी. आणखी नवीन मायक्रो फायनान्स घेत होत्या. आणि त्यांचे हे चक्र असंच चालू होतं. त्यावरील व्याज भरता भरता त्यांच्या हातात एक रुपयाही सेविंग नव्हतं राहात . आणि त्या आणखीनच मायक्रो होत होत्या.

पैसे कमवतो.. पण त्याच्या  व्यवस्थापनासाठी प्लॅन करतो का? 


 आपल्या घरात भौतिक साधनाच्या वस्तू नसाव्यात  या विचाराचा मी नाही. पण त्यासाठी मी माझं मानसिक सुख गहाण ठेवून मला न झेपणार कर्ज घेऊन,मी त्या वस्तू घेऊन माझं घर भरावा. आणि त्या कर्जामुळे माझं मानसिक सुख खराब होऊन, मी चिंतेत डूबून जाण्यापेक्षा. मला माझ्या आजीचे व्यवस्थापन भारी वाटत होतं. की जी आहे त्या परिस्थितीत सुखी होती.  तिच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर  नव्हता. उलट तिचा  बटवा पैशाने समृद्ध होता.

 समाजात खोटी प्रतिष्ठा मिरवण्यासाठी. आपण नको असलेल्या आणि आपल्याला न झेपणाऱ्या  कर्जाच्या डोंगरात नकळत बुडत चाललो आहे. कारण ते सहजासहजी उपलब्ध होत आहे. पण त्याच्या चक्रव्यूह मध्ये आपण कसं अडकत आहे. आपल्याला समजत नाही.

 कोरोना  काळातही मला असाच अनुभव आलेला. आमच्या मेस वाल्याची एक मुलगी. घरची परिस्थिती जेमतेम. कष्ट करून जगणार कुटुंब. आई वडील मुलीचे जेमतेम लग्न लावून देण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु त्याचवेळी मुलगी आपलं खूप मोठं लग्न व्हावं. यासाठी हट्ट करत होती. पुढ त्या कुटुंबाने मुलीच्या मोठ्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं. आणि ते कर्ज फेडता  फेडता. या कुटुंबाची खूप मोठी वाताहत झाली.

 आपल्या एक दिवसाच्या चैनबाजीसाठी आपल्या आई-वडिलांनी आयुष्यभर कर्जाच्या चिखलात चालावं. असा हट्ट तरी मुल का करत असतील. हे माझ्या समजण्याच्या पलीकडे होत.

 हे सगळं अनुभवत असतानाच, ओळखीच्या  एका काकांच्या मुलाने केलेली अवस्था पाहून मन पिळवटून निघाल होत. काका वेट बिगारीवर कामाला जात होते. कष्ट करून  जगणार कुटुंब. त्यांच्या मुलाने आपली ऐपत नसताना, सहज मिळणाऱ्या मायक्रो फायनान्स कर्जावर आयफोन विकत घेतला होता. आणि त्याचे हप्ते भरण्यासाठी पैसे नाहीत. म्हणून एक दिवस त्याने चोरी केली होती. त्यासाठी त्याला पोलीस घेऊन गेले होते. हे सगळे सांगताना काकाच्या डोळ्यातून अश्रू  ढळत होते.

 असंच पुण्यामध्ये आम्ही एका ठिकाणी राहत होतो. त्यावेळी आमच्या शेजारी राहणाऱ्याला काकू. महिन्यातून दोन-तीन वेळा तरी म्हणायच्याच कुलदीप थोडे उसने पैसे दे रे. हप्ता द्यायचा आहे. तुला आल्यावर परत देईल. अशी मी त्यांना खूप वेळा मदत केल्यावर, काकू हे हप्ता काय असतं, असं मी त्यांना विचारलं. त्यावर मला त्या सांगू लागल्या, घरात Tv नव्हता तो हप्त्यावर घेतला, नंतर फ्रिज पण हप्त्यावर घेतला, घरात बसायला सोपा नव्हता. कसंतरी वाटत होतं. त्यामुळे सोपा देखील हप्त्यावर घेतला. आणि आता मुलीला मोबाईल पण हप्त्यावर घेऊन दिला आहे. त्यामुळे थोडी परवड होते. घरात चैनीच्या वस्तू घेऊन डोक्यावर कर्जाचा डोंगर करणारी काकू, थोडी परवड होती,हे जेव्हा सांगत होती. ते ऐकून  मला  नवलच वाटलं.

 त्यावेळी माझ्या मनाला एक विचार शिवला होता. मोठ मोठ्या चैनीच्या वस्तू वापरण्यासाठी सुद्धा तेवढ आपलं स्टेटस असावं लागतं.

 गाढवाला वाघाचं कातड घातल्यावर गाढवाचा वाघ कधी होत नाही.

 तसंच कर्ज काढून घेतलेल्या वस्तूमुळे समाजामध्ये माझं स्टेटस उंचावणार नाही. नाही मला प्रतिष्ठा प्राप्त होणार. उलट त्या कर्जामुळे माझंच मानसिक सुख घाण पडणार आहे.

 मला माझ्या परिस्थितीची जाणीव सदैव असायला पाहिजेत. गौतम बुद्ध म्हणतात. माझ्या अपेक्षा जर कमी असतील  तर मी सुखी मात्र प्रचंड राहील.

 मला न झोपणारे कर्ज घेऊन मी दुःखी होण्यापेक्षा. मी आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहील. त्यामुळे मला आज आजीची आठवण येत होती. ती अडाणी होती. पण जीवनात तिचे व्यवस्थापन आज शिकलेल्या महिलेपेक्षा कितीतरी भारी होतं. आहे त्या परिस्थितीत प्रपंच करत होती. न झेपणार कर्ज घेऊन तिने घरात कोणती वस्तू आणली नाही. उलट त्या कठीण काळातही तिने केलेल्या सेविंगमुळे तिचा बटवा कायम भरलेला असायचा. आणि त्यातीलच एक रुपया काढून माझी आजी माझ्या हातावर ठेवत असे.

 कदाचित त्या वेळी ती मला शिकवत असेल, अपेक्षा कमी ठेवून जगलास तर तुझा ही बटवा असाच कायम भरलेला असेल. नाहीतर तू ही कर्जाच्या डोंगरात बुडून जाऊन कर्ज वसूल  करण्यासाठी आलेल्या लोकांच्या समोर  मान खाली घालून रस्त्यावरती उभा अशील..

 असो थांबूया..

 तुम्हाला काय वाटतं? सहज उपलब्ध असलेले नको ती कर्ज घेऊन  आपण आपलं सुख नाही ना घाण ठेवत..

👉 "तुम्हाला वाटतं का मायक्रो फायनान्स खरंच महिलांना बळ देतं की त्यांना आणखीनच मायक्रो करतं?"

 यावर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.. वाट पाहतोय 

 आपलाच लेखक... कुलदीप लोंढे...


Follow me: Facebook | Instagram

Share: Facebook | Twitter | WhatsApp WhatsApp

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..