"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

"युद्ध एक चाहूल, चला पुन्हा स्वयंपूर्ण श्रीमंत होवू या!"

 मी आणि युद्ध!

 मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त असणारा, एक सामान्य युवक. रोजची ठरलेली कामे, रोजच धाक दुखीचे जीवन! त्यामधून  थोडाफार मोकळा वेळ मिळाला तर, त्या वेळेत रील बघण्यात रमून जाणारा. वीकेंडला एखादी पार्टी. इतकं साधं सरळ माझं जीवन. 'आयुष्य म्हणजे अजून काय'? एवढं माझं जीवन सुरळीत चाललेला असतं. सोशल मीडियामुळे जगाचा संपर्क रोज मला नव्याने घडतच असतो. “रात्री मोबाईलवर रील्स पाहत बसलेलो मी…

जगात कुठेतरी युद्ध पेटलंय, याच्याशी माझा काय संबंध? असंच मला वाटत होतं.

पण काही दिवसांतच पेट्रोल पंपावरील रांगा, गॅसची टंचाई आणि खतासाठी भटकणारे शेतकरी पाहिले…

तेव्हा कळलं —

युद्ध हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याच्या झळा माझ्या उंबऱ्यापर्यंत पोहोचतात.” सगळं काही एकदम सुरळीत चालू असताना, म्हणतात ना संकट काही सांगून येत नाही? तसंच काहीतरी आता माझ्या आयुष्यात घडतं होत.

 संकट हजारो कोस दूर तरी झाळा मात्र मला.

 आपला काय दोष नसताना,काही भोग हे आपल्या वाटेला नकळत येतातच. तसंच काहीतरी माझ्या जीवनात आता घडलं. माझ्यापासून हजारो कोस दूर असणाऱ्या इराण मध्ये  युद्ध पेटलं. आणि त्याच्या झळा अगदी माझ्या उंबऱ्यापर्यंत आल्या. या विज्ञान युगामध्ये जग जवळ आला आहे. हे मी ऐकून होतो. पण ते अगदी उंबऱ्यापर्यंत येईल. असं मला कधीच वाटलं नव्हतं.

युद्धाचा भडका व इंधन टंचाई
युद्धजन्य परस्थिती व इंधन टंचाई 


 कालपर्यंत अगदी निवांत आनंदाने जीवन जगणारा मी,आज रात्रंदिवस गॅस साठी रांगेत उभा राहिलो होतो. पेट्रोल आणि डिझेल साठी लोकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा पाहत होतो. माझा देश शेतीप्रधान आहे. असं मी नेहमी अभिमानाने सांगणारा, शेतीला खत मिळत नाही म्हणून. चिंतेने व्याकुळलेल्या वडीलाकडे पाहत होतो. संकट अगदी माझ्या दारावर आलं, तेव्हा मला कळलं रोजच्या लागणारे खाद्य तेलासाठी पण मी दुसऱ्या देशावर अवलंबून आहे. त्यावेळी मात्र माझ्या डोक्यात' विचारांचं काहूर,उठलं. आणि मी किती पोकळ आनंदी जीवन जगत आहे. याचा मला भास झाला. आणि ही वेळ माझ्यावर का आली? या प्रश्नांच्या विचारात माझं मन प्रश्न आणि उत्तर शोधण्यासाठी धडपडू लागलं..

 मी एवढा परावलंबी का झालो?

 देशाच्या औद्योगिकीकरणाचा कणा असणारे पेट्रोल आणि डिझेल. माझ्या रोजच्या जेवणासाठी लागणारा गॅस. यासाठी मी सुमारे 85% दुसऱ्या देशावर अवलंबून आहे. याची जाणीव होणं हाच एक खूप मोठा धक्का ठरला. म्हणजे मी उद्या 'पिकवलं तरी, शिजवण्यासाठी' इंधन नाही दिलं. तरी मी उपाशीच राहणार. छे!छे "किती भयान विचार हा! भयान आहे पण सत्य आहे. याची जाणीव मला लवकरच झाली. कारण रात्रंदिवस गॅस साठी लागणाऱ्या रांगा जवळून पाहत होतो. शेतीप्रधान असणारा माझा देश. आता डिझेल नाही मिळालं तर शेतीची कामे कशी करणार, या विचारात डुबवून गेला होता.

इंधन टंचाई मुळं गॅसची लाईन
 युद्धाचा भडका कि संकटाची चाहूल..

 शेतीला लागणाऱ्या खतासाठीही शेतकऱ्याला आता मेटाकुटीला यावं लागणार होतं. खाद्य तेलासाठी पण मी दुसऱ्या देशावर अवलंबून आहे, आणि स्वतःला शेतीप्रधान देश म्हणून घेतो. हा विरोधाभास माझ्या मनाला खात होता.

 मला माझ्या पूर्वजांची आठवण आली..

 मी प्रगतीच्या कितीही मोठमोठ्या गप्पा करत असलो तरी, मी आतून किती पोकळ आहे. याची जाणीव मला या युद्धामुळे झाली. या कठीण काळामध्ये मला माझ्या पूर्वजांची आठवण झाली. ते आजच्या काळा एवढे सुशिक्षित नव्हते. पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान आणि कौतुक मला आज वाटत होत. "हजारो वर्षापासून माझ्या गावपाड्यातील अर्थव्यवस्था कायम स्वयंपूर्ण होती." गावाच्या सगळ्या गरजा गावातच भागवल्या जात होत्या.

 संपूर्ण ग्रामव्यवस्था हीच माझ्या भारताची खरी ताकद होती. माझा हा स्वयंपूर्ण गाव गाडा. स्वतःची गरज स्वतःही भागून जगाला ही वस्तूंची निर्यात करत होता.

स्वयंपूर्ण खेडी संपन्न खेडी
 स्वयंपूर्ण खेड्यातील एक शेतकरी 

 मला अजूनही आठवतो तो काळ! दर दिवाळीला घरच्या भुईमुगाच्या शेंगांच तेल आम्ही काढून आणत असून. तेलाच्या बाबतीतही आम्ही स्वयंपूर्ण होतो. आणि आज आम्ही एवढी प्रगती करूनही. काय मिळवलं याचे उत्तर मिळत नव्हतं. तेलाच्या बाबतीत ही आम्ही स्वयंपूर्ण नसावं. याच मला खूप दुःख झालं.

 बैलाच्या जीवावर आनंदाने शेती करणारा शेतकरी. खताच्या बाबत ही स्वयंपूर्ण होता. आणि आज तोच शेतकरी डिझेल आणि खताच्या चिंतेने व्याकुळ झालेला मी पाहिला.

 मलाही स्वयंपूर्ण श्रीमंत व्हावा लागेल..

 माझ्या पूर्वजांनी हजारो वर्ष स्वयंपूर्ण गाव गाडा ही ओळख टिकून ठेवली. आता त्या सर्व गोष्टी मला शक्य नसल्या तरी, अचानक युद्धामुळे आलेले हे संकट मी आगामी चाहूल म्हणून, स्वतःला स्वयंपूर्ण करावंच लागेल. कारण संकट कितीही दूर असलं तरी ते माझ्या उंबऱ्यापर्यंत कसं येतं. हे मी आता खूप जवळून पाहिलं.

 म्हणून मी विचार करू लागलो? स्वयंपूर्ण होण्यासाठी मी काय काय करू शकतो?

 1.अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर - या इंधन संकटामुळं मला जाणीव झाली. आता मला अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवावाच लागेल. त्यासाठी मला पवन ऊर्जा,सौर ऊर्जा, यामध्ये जास्तीत जास्त संशोधन व त्यांचा वापर करावा लागेल.

2. इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर - इलेक्ट्रॉनिक गाड्यांचा वापर आता, चैनीची गोष्ट न ठरता. माझ्या दैनंदिन वापराची गरज ठरवावी लागेल.

3. स्थानिक पातळीवर उत्पन्न - पूर्वी  आपण बहुतेक गोष्टीवरती स्वयंपूर्ण होतो. तीच स्वयंपूर्णता या आधुनिक काळात मला वाढवून स्थानिक पातळीवर ही उत्पन्न वाढवावे लागेल.

4. वैयक्तिक पातळीबरोबरच मला सार्वजनिक पातळीवर ही स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी मला जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर , ऊर्जेचा अपव्य  टाळणे. याचा विचार करावा लागेल.

 गाव स्वयंपूर्ण शहर ही स्वयंपूर्ण..

 स्वयंपूर्ण गाव गाडा ही माझ्या भारताची खरी ताकद! आता ती मला पुन्हा मिळवावी लागेल. मला गाव पुन्हा स्वयंपूर्ण श्रीमंत बनवावा लागेल.

 गांधीजी म्हटले होते गावाकडे चला, पण आज मला म्हणावं लागेल. गावाबरोबर शहराकडेही चला! आणि 

" गाव आणि शहर दोन्ही स्वयंपूर्ण बनवूया!"

“आज मला समजलं..स्वातंत्र्य फक्त सीमांचं नसतं,स्वयंपूर्णतेचंही असतं.”

 तुम्हाला काय वाटतं? हे युद्ध,ही इंधन टंचाई! माझ्यासाठी  माझ्यासाठी वेक-अप कॉल असेल!

 या संकटाला मी पुढची चाहूल समजून, आपण आपल्या मध्ये काय काय बदल केला पाहिजे? हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

 तुमचा अभिप्राय हीच माझी ताकत. तुमचा अभिप्राय महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला आम्हाला,सगळ्यांना, मिळून स्वयंपूर्णतेचा विडा उचलायचा आहे. कारण आज संकट दारात आले  आहे. उद्या ते आपल्या घरात येण्याची आपण वाट नाही पाहू शकत.

 आपलाच ब्लॉक लेखक : कुलदीप लोंढे..



 


Follow me: Facebook | Instagram

Share: Twitter | WhatsApp WhatsApp

लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..