"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

शिवरायांचं बंधुप्रेम....

       "पराक्रमाचा  तमाशा  दाखवा.."

    

       इतिहास......मानवला सुसंस्कृत आणि समृद्ध करणार एक शास्र.गतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा घेतलेला आढावा म्हणजे इतिहास. असं म्हंटल जात इतिहास माहिती असणारी माणसच इतिहास घडवतात. या जगामध्ये घडलेल्या प्रत्येक महापुरुषान इतिहासातून योग्य ती शिकवण घेऊन, एक वेगळा इतिहास घडवला हा ही एक इतिहासच आहे. पण आज आपण इतिहासाकडं तेवढ्याच चिकित्सक दृष्टीने पाहतो का? आपण आपल्या या वैभवशाली इतिहासाला फक्त वाचनाच साधन म्हणून नाही पाहू शकत. त्यामधून आपण योग्य तो धडा घेऊन आजून पण एक आदर्श इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तयार केला पाहिजे. तरच आपण इतिहासाबदल खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करू शकतो.

आपण इतिहासाला फक्त मनोरंजनसाठी वाचन करून एक चांगला समाज नाही बनू शकत. तर आपल्या त्यामधून योग्य तो बोध घेऊन तो आपल्याजीवनात उतरावा लागेल. त्यानं घालून दिलेली तत्त्व आपल्याला आज ही जगावी लागतील. कारण इतिहास हा फक्त युद्ध किंवा तलवारीचा नसतो. तो आपलं सर्वांगीण जीवन व्यापून टाकणारा असतो. 

तो कधी, आदर्श रूढी,परंपराचा असतो, कधी तो विचारांचा असतो, तर कधी समतेचा, कधी तो न्यायाचा, तर कधी तो अन्यायाचा पण असतो. कधी तो क्रांतीचा तर कधी तो स्वातंत्र्याचा पण असतो. अशी एक ना अनेक रूप आहेत इतिहासाची. अगदी प्रेमाचा पण इतिहास असतो, तर कधी पत्रांचा पण इतिहास असतो. पत्रांचा इतिहास.. अशीच काही ऐतिहासीक साधन चाळताना शिवाजीमहाराज यांचं एक पत्र हाती लागलं.ते वाचत असताना या इतिहासाची आजच्या काळात किती गरज आहे, याची जाणीव झाली. व हे हात आपोआप लेखणीकडं वळाले.

शिवरायासारखे महापुरुष ज्या मातीत जन्मले त्याच मातीत आपला जन्म झाला, या पेक्षा मोठ भाग्य काय असू शकत. अशा या हिमालयापेक्षा उत्तुंग असणाऱ्या महान व्यक्तिमत्वचा, एक जरी अंश आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला तरी आपल जीवन खरोखरंच धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. अशा या रायतेच्या राजाच्या प्रत्येक कृती अन विचारात किती तरी महान अर्थ दडलेला आहे. त्यांच्या तलवारीचा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे. पण आज आपण त्यांच्या उत्तकंठ बंधुप्रेम दाखवणाऱ्या एका पत्राचा विचार करून त्यांच्या विचाराचे थोडं तरी वारसदार होण्याचा प्रयत्न करणार आहोत.


 6 जून 1674 रायगडावर राज्याभिषेक संपन्न झाला. संपूर्ण हिंदुस्थानसाठी सुवर्णक्षण होता तो, हजारो वर्षाच्या गुलामीच्या बेडया तोडून एक रयतेच स्वराज उभ राहील होत. एवढा मोठा सार्व्हभौम राजा हाऊन पण क्षणाची पण विश्रन्ती न घेता, शिवरायांनी 'दक्षिणदिग्विजय ' म्हणजे कर्नाटक मोहीम हाती घेतली. आपण आज काल छोट्या मोठया यशान हुराळून जातो. पण शिवरायांसारखं व्यक्तमत्व येवढा मोठा राजा हाऊन पण, क्षणाचीही विश्रन्ती न घेता एवढी मोठी मोहिम हाती घेतात. व त्याच नेतृत्व ते स्वतः करतात. यावरून त्याच्या दूरदृष्टी व महान व्यक्तिमत्वची जाणीव आपल्याला होते. 

आपल्या आयुष्याची दोन वर्ष शिवाजी महाराज या मोहिमेत खर्ची घालतात व दक्षिणचा मोठा प्रदेश जिंकून घेतात. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. याच मोहिमेत त्यांच्या बरं झालेला एक प्रसंग आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या एका पत्राचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत.
  
  शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे तंजावर येथे राज्य करत होते. त्यांनी आपल्या या स्वराज कार्यात सहकार्य करावे, व तंजावर वरून विजापूरच महत्व कमी करावं या हेतूने शिवराय त्यांची भेट घेतात. दक्षिणीयांची पतशाही दक्षिणीयांनच्या हाती हाच शिवरायचा हेतू होता. परंतु या भेटीदरम्यान काही कारणास्तव शिवराय अन व्यंकोजीराजे यांच्यात मतभेद झाले.
व त्यांच्यात संघर्ष घडून आला. एका रात्री व्यंकोजी राजांनी अचानक शिवाजी राजे यांच्या सैन्यावर हल्ला केला. त्यामध्ये मराठा सैन्याने व्यंकोजी राजे यांचा पराभव केला. 
आपला पराभव झाला या भावनेने व्यंकोजीराजे यांना वैराग्यवृतीन ग्रासले. त्यांच्या मध्ये नैराशाची भावना निर्माण झाली. राज्यकारभाराच सगळं लक्ष सोडून देऊन ते सन्यासी जीवन जगू लागले.जेव्हा ही गोष्ट शिवरायांना समजते, तेव्हा ते व्यंकोजीराजे यांचं ये वागण मान्य करत नाहीत. त्यांनी एका राजासारखं राहून राज्यकारभार पाहावा म्हणून शिवराय त्यांना वडीलकीच्या नात्याने एक उपदेशात्मक पत्र लिहितात. जे आज ही आपल्यासाठी खूप काही शिकवण देणार ठरत.

वैराग्यवृतीन ग्रासलेल्या व्यंकोजी राजांना शिवराय लिहितात..
"आम्ही स्वतः किती बिकट प्रसंगाना तोंड देऊन हे स्वराज निर्माण केल हा आदर्श तुमच्या समोर ठेवा."आणि आम्हाला तुमच्या "पराक्रमाचा तमाशा दाखवा "

पुढे लिहिताना शिवराय अत्यंत हृदयपार्शी लिहितात.

" आम्ही तुम्हास वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची " 
यापरी सहसा वैराग्य न धरिता, मनातून विष्णता काढून कालक्रमन करीत जाणे. सणवार उत्सव पूर्ववत करीत जाऊन तुम्ही आपले संरक्षण करीत जाणे.जमती सेवक लोकांना रिकामे न ठेऊन कार्य प्रयोजनचा उपयोग करून पुरुषार्थ व कीर्ती अर्जंने.

शिवरायच्या या पत्राची अन बंधुप्रेमाची किती तरी आठवण आज आपल्याला होते. शिवाजी महाराजसारखं बंधूप्रेम जपणारी पिढी आता कधीच नष्ट झाली आहे.काल पर्यंत एकत्र कुटूंब पद्धत होती. कुटूंबात प्रेम, माया, ममता होती. आपल्या घरात एखादा कर्तव्यशून्य भाऊ असला तरी बाकीचे भाऊ त्याला सांभाळून घेत होते.सगळे जण मिळून मिसळून राहत होते. एकमेकांच्या सुख दुःखात खादयाला खांदा लावून उभा राहत होते.पण आता हे प्रेम राहील नाही. जणू काही आपण जन्मच वेगळं राहण्यासाठी घेतला आहे काय?असं वाटाव एवढ्या आपल्या वाटा वेगळ्या वेगळ्या होतात. त्यामुळे आपण कुटूंबाचा आधार हारून बसलो आहे. आपण आपला संवाद हारून बसलो आहे.आपल्याला होणाऱ्या दुःखाच्या वेळी आपण एकटे आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनात उभारत राहते.

 त्यामूळ आज महाराष्ट्रात ही युवा पिढी सगळ्यात जास्त डिप्रेशन मध्ये जात असल्याच आपल्याला दिसत आहे. कारण आपण आपल्या घरातला संवाद हारून बसलो आहे. पाठीवर असणारा भावाचा हात हारून बसलो आहोत.
मग आपल्या वाटयाला येत ते एकटेपणाच वीरान जीवन, जे आपल्याला कायम नैराशाकड घेऊन जात.
     त्यावेळी मला शिवरायांच्या या पत्राची खूप -खूप आठवण येते.. अशा वेळी असावं वाटत कोणी तरी जिवाभावाच शिवाजीमहाराजांसारखं  जो पाठीवर हात ठेऊन म्हणेल...
 "आम्ही तुम्हास वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची उठा आणि पराक्रमाचा तमाशा दाखवा "

# महापुरुष

Follow me: Facebook | Instagram

Share: Facebook | Twitter | WhatsApp

लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..