"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

"DJ वर बेभान तरुणाई: एक वास्तव"

        "गाण्याचा गोंगाट की संस्कृतीचा संकोच?"

 वर्गामध्ये माझं लेक्चर चालू होतं. मुलं मन देऊन लेक्चर ऐकत होते. मुलांना थोडासा विरंगळा म्हणून, आजचा संघर्ष आणि उद्याचा भविष्य यावर थोडसं प्रेरणादायी मोटिवेशनल पीच मी त्यांना देत होतो. आजचा युवक, सामाजिक जबाबदाऱ्या, आपली स्वप्न आणि ध्येय, त्यासाठी  करावा लागणार संघर्ष आणि त्याग, आणि उद्याचं उज्वल भविष्य. यासारख्या अनेक विषयावर आमची चर्चा रंगात आली होती. मी ही जीवाच्या आकांताने बोलत होतो. अन मुलांनाही ते आपले भविष्य  साठी महत्त्वाचं आहे म्हणून ऐकावं वाटत होतं..

 तेवढ्यात बाहेरून दण -दण असा मोठा आवाज येऊ लागला. माझं बोलणं मुलांना नीट समजेना असं झालं. मी मुलांना म्हणलो काय आहे?कसला आवाज आहे हा? त्यावेळी मुलं मला म्हटली, आज कसली तरी मिरवणूक आहे त्याच्यासाठी डीजे लावला आहे. त्याचा हा आवाज. मुलांचाही लक्ष त्या आवाजाकडे जात होतं. हे मी त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखलं. तेवढ्यात मुलंही मला म्हंटली सर आज लेक्चर सोडा ना लवकर. आम्हाला मिरवणूक बघायला जायचं आहे. बाहेरून येणारा मोठमोठ्याचा आवाज आणि मुलांचं बाहेर लक्ष यामुळे मी लेक्चर सोडून दिलं. मुल आनंदाने बाहेर पडू लागली. माझ्याही  मनातील इच्छा जागृत झाली होती. कसली मिरवणूक आहे ते जाता जाता पाहू तरी.

Dj:  अन आजची तरुणाई आवाज संस्कृतीसाठी कि चंगळवादासाठी.. 
 चालत चालत मी अगदी मिरवणुकीमध्ये जाऊन घुसलो. नेमकी कसली मिरवणूक आहे.हा प्रश्न विचारण्याची सोयच नव्हती. कारण आवाजच एवढा होता की, एक शब्दही कोणाचा कोणाला ऐकू येत नव्हतं. त्या प्रचंड मोठ्या आवाजाच्या नादावर मीही कधी थिरकू लागले हे मला कळलं नाही. असंच लहानपणी कधीतरी लग्नामध्ये बँजो मध्ये नाचलेलो होतो. बॅन्जो ते डीजे अशी जनरेशन पाहिलेला मी डीजेच्या तालावर नाचण्याचा प्रयत्न करत होतो.

 बेभान होऊन नाचणारी  तरुणाई पाहून माझ्या मनात  प्रश्न निर्माण झाला? आजच्या तरुणाईवर या आवाजाचा किती खोलवर परिणाम झाला आहे. किती बेभान होऊन ही तरुणाई दिसत आहे. मीही त्यांच्या नाचात सहभागी झालो होतो. पण त्यावेळी मला प्रश्न पडला. मिरवणूक कशाची असेल. अन आपण असं बेभान होऊन नाचून त्याचा उद्देश सफल होत असेल का? जर ही मिरवणूक एखाद्या लग्नाची असेल, तर ती पाहून आज कितीतरी शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत. त्यांना या डीजे मिरवणुकीचा अपूर्वक वाटत असेल का? किंवा एखाद्या महापुरुषाच्या जयंती निमित्त असेल तर, त्या महापुरुषांना या युवकांना आपले विचार वाचण्यापेक्षा असे बेभान होऊन नाचण्यात पाहून काय वाटत असेल का?

 असे एक ना अनेक प्रश्न? त्या आवाजाच्या घुंगटा सारखेच माझ्या मनात घोंगत होते. माझं मन मला म्हटलं जाऊदे आज सगळे विचार बाजूला. आज फक्त नाचणारी बेभान तरुणाई पाहू. त्यांचं मनोरंजन पाहून, त्यांचा आनंद पाहू.


 मीही त्यांच्या आनंदात हळूहळू सहभागी होण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी आजूबाजूला नजर जातातच. रस्त्याच्या कडेला असणारे घरे माझ्या नजरेत आली. ती सर्व दार खिडक्या लावून बंद झालेले दिसत होती. मी म्हटलं अरे यांना नाही काही आनंदात सहभागी व्हायचं. त्यावेळी माझं मन म्हटलं तुला या आवाजाची नशा झाली आहे. पण या लोकांना इथे त्रास होत आहे. कोणाच्या घरात शाळकरी मुलं होती तर कुणाच्या घरात आजारी वयोवृद्ध लोक होते. पण बोलणार कोणाला बेभान होऊन नाचणारी  तरुणाई म्हणजे उद्याचं भविष्यच ना. तेच बेभान होऊन नाचत होतं. एक गोष्ट मला जाणवत होती. मी नाचण्यात एवढं दंग का होत नाही? त्यासाठी मी माझ्या शेजारी नाचणाऱ्या मुलाला म्हटलं. मला काय आनंद वाटत नाही. त्यावेळी तो मला म्हटला. तुमची सोय झाली नसेल. मी म्हटलं सोय म्हणजे काय? त्यावर तो म्हटला तुम्ही घेतली नसेल. मी म्हटलं काय म्हणता तुम्ही? त्यावेळी तो म्हंटला बेभान होऊन नाचायचं असेल तर, नशाही करावीच लागते.

" म्हणजे आनंदासाठी डीजे, आणि त्या आनंदात अधिक रंग भरण्यासाठी तरुणाई नशेचा आधार घेतला जातो" . सगळं चित्र मला स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात त्या आनंदाच्या भरात दोन-तीन वेळा कोणाचे तरी भांडणही झाली. त्यावेळी लोक म्हणत होते. अतिउत्सवाच्या भरात भांडण होन नही तर नॉर्मलच गोष्ट. माझं मन मला सांगत होतं आज या नकारात्मक गोष्टीकडे गुंतायचं नाही. आज फक्त बेभान होऊन नाचायचं. नाचत नाचत मी डीजे च्या जवळ जात होतो. त्यावेळी मला एक खूप विलक्षण गोष्ट दिसली. 

 जो तो मनुष्य आपल्या कानावरती हात ठेवत होता. कोण हाताच्या बोटाने कान दाबत होता. तर काही लोकांनी कानामध्ये कापूस घातला होता. मी त्यांना विचारत होतो अरे हे काय करता? आपण आपल्याच आनंदासाठी डीजे लावला आहे ना? मंग असं कानामध्ये बोट घालून कसं जमेल. त्यावेळी काय लोक म्हणत होते खूप त्रास होत आहे आवाजाचा! मला तर खूपच आश्चर्य वाटलं. म्हणजे पैसे पण आपण द्यायचे. डीजे पण आपणच बोलवायचा. बेभान होऊन त्याला आवाज वाढवायला आपणच सांगायचं. अन आपणच आपल्या कानामध्ये बोट घालून आपल्या मनाला, शरीराला त्रास करून घ्यायचा. हे मला खूप विचित्र वाटत होतं. किती विरोधाभासच वागणं ना आपलं. आपणच आपल्या आनंदासाठी डीजे लावायचा. अन आपणच त्याच्यासमोर कानात कापूस, बोटे घालून उभारायचं..



 त्यावेळी माझ्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला? आपला याच्यामध्ये कशालाच विरोध नाही. ना डीजे,ला मिरवणुकीला,
 ना नशा करून बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईला, ना अतिउत्साहाच्या भरात समाजा समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या भावनेला. आपला विरोध कशालाच नाही.
 फक्त एकच प्रश्न मला वारंवार पडत होता. आपल्या आनंदाची व्याख्या तरी किती?अन मर्यादा तरी किती?
 किती आवाजा मध्ये मला आनंद पुरेपूर होईल?
 का असाच मोठा आवाज करायला सांगून, मी मात्र कान बोटाने दाबून धरेल? किती?किती?आवाजाने माझ समाधान होईल?
 का सांगू अजून त्याला आवाज वाढवायला. मलाही तो आवाज सहन होत नव्हता मीही कान दाबून धरले होते.
 बाहेरच्या गोंगाट्यापेक्षा डोक्यात जास्त गोंगाट होत होता.
 त्यावेळी डीजे मला ओरडून बोलला......

 काढ तो तुझ्या कानावरील हात!. अन मला सांग तुझ्या आनंदाचा आवाज किती? बास का अजून वाढू...
  
त्याच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हतं. त्यावेळी मला एवढंच वाटू लागलं असंच कानामध्ये बोटे घालून इथं थांबू नाहीतर चालायला लागू आपण आपल्या मार्गावर..

 त्या रात्री मला रात्रभर प्रश्नाचे उत्तर मिळालं नाही.
 त्यामुळे मी तुम्हा वाचक वर्गांनाच विचारतो त्याचे उत्तर 

 खरंच आपल्या आनंदाचा आवाज किती?
 शांत मंजुळ स्वरात आपली संस्कृती जपणारा?
 की बेभान आवाज सोडून आपलेच कान आपल्याला दाबून धरायला लावणारा?
 
 कमेंट मध्ये या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल..


Follow me: Facebook | Instagram

Poll:
तुम्हाला हा लेख कसा वाटला?
उत्कृष्ट
चांगला
सरासरी
सुधारणा हवी

Share: Facebook | Twitter | WhatsApp

Comment:


लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..