"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
"गाण्याचा गोंगाट की संस्कृतीचा संकोच?"
वर्गामध्ये माझं लेक्चर चालू होतं. मुलं मन देऊन लेक्चर ऐकत होते. मुलांना थोडासा विरंगळा म्हणून, आजचा संघर्ष आणि उद्याचा भविष्य यावर थोडसं प्रेरणादायी मोटिवेशनल पीच मी त्यांना देत होतो. आजचा युवक, सामाजिक जबाबदाऱ्या, आपली स्वप्न आणि ध्येय, त्यासाठी करावा लागणार संघर्ष आणि त्याग, आणि उद्याचं उज्वल भविष्य. यासारख्या अनेक विषयावर आमची चर्चा रंगात आली होती. मी ही जीवाच्या आकांताने बोलत होतो. अन मुलांनाही ते आपले भविष्य साठी महत्त्वाचं आहे म्हणून ऐकावं वाटत होतं..
तेवढ्यात बाहेरून दण -दण असा मोठा आवाज येऊ लागला. माझं बोलणं मुलांना नीट समजेना असं झालं. मी मुलांना म्हणलो काय आहे?कसला आवाज आहे हा? त्यावेळी मुलं मला म्हटली, आज कसली तरी मिरवणूक आहे त्याच्यासाठी डीजे लावला आहे. त्याचा हा आवाज. मुलांचाही लक्ष त्या आवाजाकडे जात होतं. हे मी त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखलं. तेवढ्यात मुलंही मला म्हंटली सर आज लेक्चर सोडा ना लवकर. आम्हाला मिरवणूक बघायला जायचं आहे. बाहेरून येणारा मोठमोठ्याचा आवाज आणि मुलांचं बाहेर लक्ष यामुळे मी लेक्चर सोडून दिलं. मुल आनंदाने बाहेर पडू लागली. माझ्याही मनातील इच्छा जागृत झाली होती. कसली मिरवणूक आहे ते जाता जाता पाहू तरी.
बेभान होऊन नाचणारी तरुणाई पाहून माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला? आजच्या तरुणाईवर या आवाजाचा किती खोलवर परिणाम झाला आहे. किती बेभान होऊन ही तरुणाई दिसत आहे. मीही त्यांच्या नाचात सहभागी झालो होतो. पण त्यावेळी मला प्रश्न पडला. मिरवणूक कशाची असेल. अन आपण असं बेभान होऊन नाचून त्याचा उद्देश सफल होत असेल का? जर ही मिरवणूक एखाद्या लग्नाची असेल, तर ती पाहून आज कितीतरी शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत. त्यांना या डीजे मिरवणुकीचा अपूर्वक वाटत असेल का? किंवा एखाद्या महापुरुषाच्या जयंती निमित्त असेल तर, त्या महापुरुषांना या युवकांना आपले विचार वाचण्यापेक्षा असे बेभान होऊन नाचण्यात पाहून काय वाटत असेल का?
असे एक ना अनेक प्रश्न? त्या आवाजाच्या घुंगटा सारखेच माझ्या मनात घोंगत होते. माझं मन मला म्हटलं जाऊदे आज सगळे विचार बाजूला. आज फक्त नाचणारी बेभान तरुणाई पाहू. त्यांचं मनोरंजन पाहून, त्यांचा आनंद पाहू.
मीही त्यांच्या आनंदात हळूहळू सहभागी होण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी आजूबाजूला नजर जातातच. रस्त्याच्या कडेला असणारे घरे माझ्या नजरेत आली. ती सर्व दार खिडक्या लावून बंद झालेले दिसत होती. मी म्हटलं अरे यांना नाही काही आनंदात सहभागी व्हायचं. त्यावेळी माझं मन म्हटलं तुला या आवाजाची नशा झाली आहे. पण या लोकांना इथे त्रास होत आहे. कोणाच्या घरात शाळकरी मुलं होती तर कुणाच्या घरात आजारी वयोवृद्ध लोक होते. पण बोलणार कोणाला बेभान होऊन नाचणारी तरुणाई म्हणजे उद्याचं भविष्यच ना. तेच बेभान होऊन नाचत होतं. एक गोष्ट मला जाणवत होती. मी नाचण्यात एवढं दंग का होत नाही? त्यासाठी मी माझ्या शेजारी नाचणाऱ्या मुलाला म्हटलं. मला काय आनंद वाटत नाही. त्यावेळी तो मला म्हटला. तुमची सोय झाली नसेल. मी म्हटलं सोय म्हणजे काय? त्यावर तो म्हटला तुम्ही घेतली नसेल. मी म्हटलं काय म्हणता तुम्ही? त्यावेळी तो म्हंटला बेभान होऊन नाचायचं असेल तर, नशाही करावीच लागते.
" म्हणजे आनंदासाठी डीजे, आणि त्या आनंदात अधिक रंग भरण्यासाठी तरुणाई नशेचा आधार घेतला जातो" . सगळं चित्र मला स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात त्या आनंदाच्या भरात दोन-तीन वेळा कोणाचे तरी भांडणही झाली. त्यावेळी लोक म्हणत होते. अतिउत्सवाच्या भरात भांडण होन नही तर नॉर्मलच गोष्ट. माझं मन मला सांगत होतं आज या नकारात्मक गोष्टीकडे गुंतायचं नाही. आज फक्त बेभान होऊन नाचायचं. नाचत नाचत मी डीजे च्या जवळ जात होतो. त्यावेळी मला एक खूप विलक्षण गोष्ट दिसली.
जो तो मनुष्य आपल्या कानावरती हात ठेवत होता. कोण हाताच्या बोटाने कान दाबत होता. तर काही लोकांनी कानामध्ये कापूस घातला होता. मी त्यांना विचारत होतो अरे हे काय करता? आपण आपल्याच आनंदासाठी डीजे लावला आहे ना? मंग असं कानामध्ये बोट घालून कसं जमेल. त्यावेळी काय लोक म्हणत होते खूप त्रास होत आहे आवाजाचा! मला तर खूपच आश्चर्य वाटलं. म्हणजे पैसे पण आपण द्यायचे. डीजे पण आपणच बोलवायचा. बेभान होऊन त्याला आवाज वाढवायला आपणच सांगायचं. अन आपणच आपल्या कानामध्ये बोट घालून आपल्या मनाला, शरीराला त्रास करून घ्यायचा. हे मला खूप विचित्र वाटत होतं. किती विरोधाभासच वागणं ना आपलं. आपणच आपल्या आनंदासाठी डीजे लावायचा. अन आपणच त्याच्यासमोर कानात कापूस, बोटे घालून उभारायचं..
Follow me: Facebook | Instagram
Share: Facebook | Twitter | WhatsApp
Comment:
लेखक: कुलदीप लोंढे
खूप छान वास्तव मांडलस् मित्रा !!
उत्तर द्याहटवाvastav mandani
उत्तर द्याहटवाNice👌
उत्तर द्याहटवा