"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
प्रेम.....
प्रेम हा असा शब्द, नकळत जरी कानावर पडला तरी; या हृदयाची स्पंदन वाढवणारा. अंगावरती एक हर्षदायी काटा उभा करणारा. आठवणींच्या एका खोल भाव विश्वात घेऊन जाणारा. कधीतरी नकळतपणे डोळ्यांच्या कडा ओलावणारा, तर कधी एक स्मित हास्य निर्माण करणारा. असे एक ना अनेक रंग या प्रेमाचे. प्रेम.. कोणासाठी जीवन असत, कोणासाठी जबाबदारी असतं, कोणासाठी त्याग असतं, कोणासाठी आत्मसमर्पण असतं, तर कोणासाठी भक्ती असतं...
अशा या हिमालया एवढ्या उंची असणाऱ्या आणि समुद्र एवढी खोली असणाऱ्या " प्रेम" या विषयावर मी कधीतरी लिहील. हे माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं. कारण काही विषय अशी असतात की, त्यांच्यावर लिहिण्या एवढी आपल्या विचारांची उंची आपण कधी गाठू शकत नाही. अशा विषयावर लिहिणं म्हणजे एक तपस्या वाटते. प्रेम या विषयावर लिहिता लिहिता कितीतरी महान लेखकांची हयात गेली. त्यामुळे त्यांच्या एवढी उंची आपण न घाटता. फक्त त्यांच्या विचारांचे पाईक व्हावं. एवढं जरी केले तरी प्रेमा विषय आपण खूप काही केल याची जाणीव होते. अन जर मला कधी कोणी म्हटलं दोन शब्द तरी 'प्रेमावर ' तर मी फक्त लिहील.....
![]() |
| "तुझ्याविना मला माझं सारं जग सुन्न वाटतं" – या ओळीतून व्यक्त होणारं हळवं, तळमळणारं प्रेमकथन |
अशा या, महान 'प्रेम भावनेवर 'आपण कधीही व्यक्त न होता.आपल्या पूर्वज लेखकांनी घालून दिलेले प्रेमाच्या भावनेचा आपण फक्त अतोनात आदर करायचा एवढेच मी कायम ठरवत राहिलेलो.. ज्यानं माणसाला माणूस पण दिलं, ज्याने आत्म्याशी आत्म्याला अतुट बंधनाने जोडलं, अशा या प्रेमाने नेहमी आपल्या आयुष्यात हजारो रंग भरण्याचं काम केलं आहे. ते सदैव आपल्याबरोबर श्वासा सारखं चालत असतं. प्रेम कधी भावाचं असतं, कधी बहिणीचं, कधी आई-वडिलांचं, कधी मित्राचं, तर कधी जीवनाला दिशा देणाऱ्या प्रेमिकेचे पण प्रेम असतं. असं हे आपलं संपूर्ण जीवन समृद्ध करणार प्रेम! आपल्याला त्याग, समर्पण, आपले पण, आत्म सन्मान, विश्वास, जीवनाला एक उर्मी आणि नवी दिशा देणार!
एवढं मानवी जीवन समृद्ध करणार हे' प्रेम' आज एवढं विकराल रूप धारण करत असताना. खरोखरच मान सुन्न होतं, डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावतात. आणि या निशब्द मनाला असंख्य शब्द फुटतात..
ज्या अनंत काळापासून आम्ही, राधा-कृष्ण, हिर-रांजा, लैला मजनू, सलीम अनारकली, यांनी घालून दिलेल्या आदर्श प्रेमाच्या वाटेवर चालत होतो, प्रेमाचा सन्मान करत होतो, त्याच्याबरोबर प्रेमाने जगत होतो. ज्या प्रेमान आम्हाला नेहमी त्याग, आत्मसन्मान,आपुलकी, भक्ती, आत्मसमर्पण, आणि आत्म्याची एकरूपता दिली. तेच प्रेम आज रोज बातम्यांमधून एकताना..
श्रद्धा,सौरभ, राजा.... प्रेमाची हत्या की विकृती..
1) श्रद्धा वालकरच्या रूपान आपल्या शरीराची 35 तुकडे होऊन फ्रिजमध्ये निपचिप बंद झाल.. प्रेमाच्या मुखवट्याखाली मालकी गाजवणारा हक्क आला की प्रेम संपत ...
2) मेरठ मधील सौरभच शरीर ही असच तुकडे होऊन ड्रम मध्ये बंद होतं.. सौरभ - मुस्कानचा तर प्रेम विवाह ना? तरीही ती आपल्या पतीला आपल्या दुसऱ्या साथीदाराच्या मदतीने तुकडे करून सिमेंटच्या ड्रम मध्ये बंद करते. त्या सौरभ च्या मुलीचे शब्द..' काळीज पिळून टाकतात, पापा ड्रम मे बंद है! कुठल्या प्रेमाचा आदर्श आपण समाजापुढे ठेवतोय. कारण सौरभ एकटा मरत नाही. त्यावेळी सौरभच्या प्रेमाला त्याच्या आई वडील, त्याचे भाऊ-बहीण, आणि त्याची लहान मुलगी तिच्या वडिलांच्या प्रेमाला मुक्ते. कुठलं प्रेम आपल्याला हे शिकवतं की स्वतःच्या वासनेसाठी दुसऱ्याच्या प्रेमाचा गळा दाबायचा.
3) सोनम- राजा यांच तर नवीनच लग्न झालेलं होतं ना? गुलाबी आयुष्याची स्वप्न पाहणारा राजा आपल्या हनिमूनच्या प्रवासातच शिलॉंगच्या खोल दरीमध्ये प्रेमामध्ये मिळालेला धोका घेऊन निपचिप पडला होता. त्याचा शांत आत्मा कदाचित बोलत असेल, मी जे भोगले ते कोणी भोगू नये, कारण प्रेम कधी बदनाम होऊ नये. कारण हनिमून मध्येच त्याच्या प्रेमाचा विश्वासघात होतो..
4 ) वैष्णवी ही अशीच अंतर्मनाला खूप विचार करायला भाग पाडणारी. काय चुकलं तिचं? आपल्या आई-वडिलांवरील एका प्रेमाचा त्याग करून, आपल्या जीवनसाथी वरील प्रेम सिद्ध करण्याची धडपड करत होती ना ती. काय मिळालं तिला? प्रेमाच्या गोंडस नावाखाली या विकृत प्रवृत्तीने तिला आत्महत्या करायला भाग पाडले ना? प्रेमासाठी स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला विचार करायला लावून गेलीच ती..
![]() |
| राधा-कृष्ण – जिथं प्रेमात हक्क नाही, तिथं आत्म्याची एकरूपता असते |
![]() |
| पारो आणि रॉबर्ट गिल – दोन संस्कृती, दोन जीव, पण प्रेम एक! |
Follow me: Facebook | Instagram
Share: Facebook | Twitter | WhatsApp
लेखक: कुलदीप लोंढे
khup vastavvadi
उत्तर द्याहटवाkhup sundar
उत्तर द्याहटवाWow
उत्तर द्याहटवावास्तवाचं अचूक वर्णन!! प्रेमाची खरी व्याख्या!!
उत्तर द्याहटवाThanx
हटवाGood
उत्तर द्याहटवाअप्रतिम खूप सुंदर शब्दरचना..
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलं आहे
उत्तर द्याहटवाThank you
उत्तर द्याहटवाmarmik
उत्तर द्याहटवाTrue
उत्तर द्याहटवा