"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..

                       प्रेम.....

 प्रेम हा असा शब्द, नकळत जरी कानावर पडला तरी; या हृदयाची स्पंदन वाढवणारा. अंगावरती एक हर्षदायी काटा उभा करणारा. आठवणींच्या एका खोल भाव विश्वात घेऊन जाणारा. कधीतरी नकळतपणे डोळ्यांच्या कडा ओलावणारा, तर कधी एक स्मित हास्य निर्माण करणारा. असे एक ना अनेक रंग या प्रेमाचे. प्रेम.. कोणासाठी जीवन असत, कोणासाठी जबाबदारी असतं, कोणासाठी त्याग असतं, कोणासाठी आत्मसमर्पण असतं, तर कोणासाठी भक्ती असतं...

 अशा या हिमालया एवढ्या उंची असणाऱ्या आणि समुद्र एवढी खोली असणाऱ्या " प्रेम" या विषयावर मी कधीतरी लिहील. हे माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं. कारण काही विषय अशी असतात की, त्यांच्यावर लिहिण्या  एवढी आपल्या विचारांची उंची आपण कधी गाठू शकत नाही. अशा विषयावर लिहिणं म्हणजे एक तपस्या वाटते. प्रेम या विषयावर लिहिता लिहिता कितीतरी महान लेखकांची हयात गेली. त्यामुळे त्यांच्या एवढी उंची आपण न घाटता. फक्त त्यांच्या विचारांचे पाईक व्हावं. एवढं जरी केले तरी प्रेमा विषय आपण खूप काही केल याची जाणीव होते. अन जर मला कधी कोणी म्हटलं दोन शब्द तरी 'प्रेमावर ' तर मी फक्त लिहील.....   

सपाट वहीवर लिहिलेली एक मराठी कविता, ज्यात प्रेमातील विरह, रिक्तता आणि मनाची असहाय्यता व्यक्त केली आहे – शेजारी निळी पेन ठेवलेली आहे
"तुझ्याविना मला माझं सारं जग सुन्न वाटतं" – या ओळीतून व्यक्त होणारं हळवं, तळमळणारं प्रेमकथन


 अशा या, महान 'प्रेम भावनेवर 'आपण कधीही व्यक्त न होता.आपल्या पूर्वज लेखकांनी घालून दिलेले प्रेमाच्या भावनेचा आपण फक्त अतोनात आदर करायचा एवढेच मी कायम ठरवत राहिलेलो.. ज्यानं माणसाला माणूस पण दिलं, ज्याने आत्म्याशी आत्म्याला अतुट बंधनाने जोडलं, अशा या प्रेमाने नेहमी आपल्या आयुष्यात हजारो रंग भरण्याचं काम केलं आहे. ते सदैव आपल्याबरोबर श्वासा सारखं चालत असतं. प्रेम कधी भावाचं असतं, कधी बहिणीचं, कधी आई-वडिलांचं, कधी मित्राचं, तर कधी जीवनाला दिशा देणाऱ्या प्रेमिकेचे पण प्रेम असतं. असं हे आपलं संपूर्ण जीवन समृद्ध करणार प्रेम! आपल्याला त्याग, समर्पण, आपले पण, आत्म सन्मान, विश्वास, जीवनाला एक उर्मी आणि नवी दिशा देणार!    

एवढं मानवी जीवन समृद्ध करणार हे' प्रेम' आज एवढं विकराल रूप धारण करत असताना. खरोखरच मान सुन्न होतं, डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावतात. आणि या निशब्द मनाला असंख्य शब्द फुटतात..  

ज्या अनंत काळापासून आम्ही, राधा-कृष्ण,  हिर-रांजा, लैला मजनू, सलीम अनारकली, यांनी घालून दिलेल्या आदर्श प्रेमाच्या वाटेवर चालत होतो, प्रेमाचा सन्मान करत होतो, त्याच्याबरोबर प्रेमाने जगत होतो. ज्या प्रेमान आम्हाला नेहमी त्याग, आत्मसन्मान,आपुलकी, भक्ती, आत्मसमर्पण, आणि आत्म्याची एकरूपता दिली. तेच प्रेम आज रोज बातम्यांमधून एकताना..    

 श्रद्धा,सौरभ, राजा.... प्रेमाची हत्या की विकृती..

1) श्रद्धा वालकरच्या रूपान आपल्या शरीराची 35 तुकडे होऊन फ्रिजमध्ये निपचिप बंद झाल.. प्रेमाच्या मुखवट्याखाली मालकी गाजवणारा हक्क आला की प्रेम संपत ...

2) मेरठ मधील सौरभच शरीर ही असच तुकडे होऊन ड्रम मध्ये बंद होतं.. सौरभ - मुस्कानचा तर प्रेम विवाह ना? तरीही ती आपल्या पतीला आपल्या दुसऱ्या साथीदाराच्या मदतीने तुकडे करून सिमेंटच्या ड्रम मध्ये बंद करते. त्या सौरभ च्या मुलीचे शब्द..' काळीज पिळून टाकतात, पापा ड्रम मे बंद है! कुठल्या प्रेमाचा आदर्श आपण समाजापुढे ठेवतोय. कारण सौरभ  एकटा मरत नाही. त्यावेळी सौरभच्या प्रेमाला त्याच्या आई वडील, त्याचे भाऊ-बहीण, आणि त्याची लहान मुलगी तिच्या वडिलांच्या प्रेमाला मुक्ते. कुठलं प्रेम आपल्याला हे शिकवतं की स्वतःच्या वासनेसाठी दुसऱ्याच्या प्रेमाचा गळा दाबायचा.

3) सोनम- राजा यांच तर नवीनच लग्न झालेलं होतं ना? गुलाबी आयुष्याची  स्वप्न पाहणारा राजा आपल्या हनिमूनच्या प्रवासातच शिलॉंगच्या खोल दरीमध्ये प्रेमामध्ये मिळालेला धोका घेऊन निपचिप पडला होता. त्याचा शांत आत्मा कदाचित बोलत असेल, मी जे भोगले  ते कोणी भोगू नये, कारण प्रेम कधी बदनाम होऊ नये. कारण हनिमून मध्येच त्याच्या प्रेमाचा विश्वासघात होतो..

4 ) वैष्णवी ही अशीच अंतर्मनाला खूप विचार करायला भाग पाडणारी. काय चुकलं तिचं? आपल्या आई-वडिलांवरील एका प्रेमाचा त्याग करून, आपल्या जीवनसाथी वरील प्रेम सिद्ध करण्याची  धडपड करत होती ना ती. काय मिळालं तिला? प्रेमाच्या गोंडस नावाखाली या विकृत प्रवृत्तीने तिला आत्महत्या करायला भाग पाडले ना? प्रेमासाठी स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला विचार करायला लावून गेलीच ती..


 हे सगळं कानावर पडल्यावर. मला आठवण येते त्या ऐतिहासिक गाण्याची  " हुस्न हाजिर है मोहब्बत की सजा पाने को कोई पत्थर से ना मारो मेरे दीवाने को!
 पण या सगळ्या घटना पाहिल्यावर, आता असं म्हणावं वाटतं  " तुम खुद ही न काटो  अपने दीवाने को! 

 मन सुन्न  करणारी प्रेमाची ही अवस्था पाहून वाटतं प्रेमाचं हेच रूप आपण आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवणार आहोत का? हाच वारसा आपण त्यांना देणार आहोत का? त्यावेळी शरीर कापायला लागतं. आणि मन रडायला लागतं. प्रेमाचं खरं रूप आणि आदर्श ते शोधू लागतं. आणि त्या मनाला ते रूप सापडतं फक्त इतिहासाच्या पानांमध्ये..
 आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या आदर्श प्रेमाच्या या काही मोजक्याच गाथा आपल्या येणाऱ्या हजारो पिढ्यांचे जीवन प्रेमाने समृद्ध करण्याचे सामर्थ्य ठेवतात.

आदर्श प्रेमाचे प्रकाश वाट .. राधा, हिर, पारो...                


1) हीर- रांझा.. प्रेमाला समाजाचा विरोध, प्रेमासाठी संघर्ष केला पण त्या संघर्षामध्ये हिंसा नव्हती. त्यांनी शिकवलं प्रेमासाठी प्राण देणं, एकमेकांचा सन्मान करणे 

2) राधा-कृष्ण.. राधाकृष्ण यांच्या प्रेमामध्ये स्वार्थ नव्हता, मालकी नव्हती. होतं फक्त समर्पण. त्यांचे प्रेमामध्ये भक्ती होती, एकमेकांचा सन्मान होता. कृष्ण तर देव अवतार मानतो  ना आपण मग त्यांना काहीही करणं शक्य होतं. पण प्रेमासाठी त्यांनी रक्त रणजीतपणा कुठे केला नाही. ना कधी राधान कृष्णावर हक्क गाजवला. कारण त्यांचं प्रेम फक्त त्यागाच  रूप होतं. कारण जिथे हक्क गाजवन चालू होतं. तिथे प्रेम संपत. आपण आज कृष्ण राधा यांना प्रेमाचं अमृत रूप म्हणून मंदिरात पुजतो. पण त्यांनी दिलेले शिकवणीवर चालतो का?
पारंपरिक पिछवाई शैलीत राधा आणि कृष्ण यांचं भक्तिपूर्ण प्रेम, जे निस्वार्थ भावनेनं आणि आत्मसमर्पणाने जोडलेलं आहे
राधा-कृष्ण – जिथं प्रेमात हक्क नाही, तिथं आत्म्याची एकरूपता असते

.3) पारो- रॉबर्ट गिल ( Paro- Robert Gill)..
 माझ्या मनाला नेहमी भावणारा प्रेमाचा हा खूप बोलका आदर्श, रॉबर्ट गिल हा एक निवृत्त ब्रिटिश सैनिक. तो काळ पारतंत्र्याचा भारत भ्रमंती करत असताना, तो वेरूळ अजिंठा ला येऊन पोहोचतो. व तेथील अद्भुत कलाकृतींच्या प्रेमात पडतो. जगाच्या नकाशावर वेरूळ अजिंठाला तोच आणतो. तेथील कलाकृतींचे चित्र काढणे व डॉक्युमेंट बनवणे यात तो रमून जातो. त्याच्या या कामांमध्ये पारू नावाची एक आदिवासी मुलगी मदत करत असते. नैसर्गिक रंग बनवण्याच्या कामात ती नैसर्गिक साधने गोळा करून रॉबर्टला देत असे. रॉबर्टचं अजिंठा वेरूळ लेण्यांविषयी असलेले प्रेम, त्याची चित्र काढण्यासाठी मदत करणारे पारो. सेवेपासून सुरू झालेले हे नातं. प्रेमाची अथांग सेवा करतं. दोन धर्म, दोन भाषा,दोन देश वेगळे असले तरी त्यांच्या प्रेमाला कशाचं बंधन येत नाही. पुढे पारोच्या आजारपणात रॉबर्ट गिल तिची खूप मनापासून सेवा करतो. याच आजारपणात पारू आपला देह अजंठा वेरूळच्या परिसरात ठेवते. रॉबर्ट ही तिच्या आठवणीत येथेच रमतो. तो आपल्या मायदेशी ही परत जात नाही. आणि पारूच्या आठवणीत इथेच देह ठेवतो. त्यांच्या प्रेमात विरह आला. पण विकृती कधी आली नाही. प्रेमामध्ये संसार त्यांचा झाला नाही. पण प्रेमाचा खूप मोठा संस्कार त्यांनी आपल्याला दिला.
पारो आणि रॉबर्ट गिल अजिंठा लेण्यांजवळ पारंपरिक चित्रकलेत दिसत असलेले, सेवाभावातून सुरु झालेलं आणि त्यागावर संपलेलं एक शाश्वत प्रेम
पारो आणि रॉबर्ट गिल – दोन संस्कृती, दोन जीव, पण प्रेम एक!

  या घटनेमध्ये प्रेम केवळ भावना नाही. ती एक  जीवनदृष्टी होती. आजच्या तरुणांनी यामधून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.एक विदेशी माणूस असूनही आदर्श प्रेमाचे एक आरसा त्यांनी आपल्याला दाखवला. आणि आपण आपल्याच धर्माच्या, वंशाच्या,लोकांची प्रेमाच्या  नावाखाली हत्या करत आहोत. ती ही क्रूरपणे शरीराचे तुकडे करत! 

 "प्रेम ही भावना आहे, व्यवहार नाही. प्रेम हे समर्पण आहे, मिळवन नाही. पण आजच्या काळात प्रेम विकृत भावना का बनावे असा प्रश्न पडत आहे.
 जेव्हा प्रेम त्याग बनून राहते. तेव्हा ते फुलत राहते. पण जेव्हा ते मालकी आणि हक्क गाजू लागतं तेव्हा ते गुन्हा बनते..

 तुमचं मत!.. समाजाला कोणता वारसा द्याल?

 तुम्हाला काय वाटतं? आपण आपल्या येणाऱ्या पिढीला. हिर-रांजा, राधा-कृष्ण, पारो -रॉबर्ट गिल. यांच्या आदर्श प्रेमाचा मार्ग दाखवला पाहिजे  का?
                                  का?
 फ्रिज  मधील श्रद्धा? सिमेंटच्या ड्रम मधील सौरभ? शिलॉंगच्या खोलदरीत पडलेल्या राजा? की आपलं लहान बाळ सोडून गेलेली वैष्णवी? यासारख्या निष्पाप प्रेम करणाऱ्या लोकांचा कडेलोट करणाऱ्या नीच प्रवृत्तीचा...
 
 ही निवड आपल्या पुढच्या पिढीसाठी आहे. आज आपण ठरवायलाच हवं!- प्रेम म्हणजे मिळवणं की समर्पण..

 प्रेमाचं नाव घेत दुसऱ्याच्या अस्तित्वावर घाव घालणाऱ्या प्रत्येक विकृतीला आपण सामुदायिकपणे ' नाही म्हणायला हवं.


 तुमचं मत नक्की कळवा.. कारण समाजाला एक आदर्श देणे ही प्रत्येकाचं काम आहे..
 तुमच्या मताची मी वाट पाहते. थांबूयात 
 तुमचाच ...... कुलदीप लोंढे....
 
# प्रेरणा व चांगला विचार.... विचार काहूर..

# तरुणाई..

 



 


Follow me: Facebook | Instagram

Share: Facebook | Twitter | WhatsApp

लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

  1. वास्तवाचं अचूक वर्णन!! प्रेमाची खरी व्याख्या!!

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम खूप सुंदर शब्दरचना..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞