"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

पावसाच्या सरीत हरवलेली आठवणीतील कविता-"कणा"

पावसाच्या सरीत हरवलेली आठवणीतील कविता - "कणा "

 पाऊस म्हणजे फक्त थेंब नव्हे.,.. तो आठवणींचा एक झरा असतो, कधी गोडसर, कधी खोल आतपर्यंत मनाला भिनणारा.
 आज जेव्हा पावसाच्या सरी अंगावर पडल्या, तेव्हा पुन्हा एकदा जुन्या आठवणी जागा झाल्या..  आणि मन पुन्हा एकदा  त्याच्या गोड आठवणीत रमून गेलं...

 कवी लेखकांनी एक ना अनेक रूप पावसाळ्याचे रेखाटलेले.
 कोणाला तो ह्या धरती मायला हिरवा शालू नेसवणारा वाटतो.
 कोणाला वाट पाहणाऱ्या चातक पक्षासाठी धावून येणारा वाटतो. कोणाला प्रेमिकांना चिंब भिजवणारा वाटतो. तर कोणाला शेतकऱ्याचा जीवनदाता वाटतो.

 माझ्याही  या पावसाळ्याविषयी खूप आठवणी...
रस्त्यालगत ठेवलेली जुनी बैलगाडी आणि पडती झोपडी – ओसाड शांतता
गेला तो काळ, बैलगाडीच्या चाकांतून फिरणाऱ्या जगण्याच्या वाटा आता थांबल्या…

 लहानपणी खूप आठवण या पावसाच्या मनाच्या काळजात कोरलेल्या. मला आजही आठवत आहे. पावसामुळे तृप्त होऊन, त्याच्या पडणाऱ्या पाण्यामुळे अगदी नववधू सारखा हिरवागार शालू नसलेल्या माळरानावर  आम्ही लहानपणी गुर राखत असे. त्यावेळी गायीच्या पाठीवर बसणारा तो पांढरा "बगळा " मला एखाद्या राजकुमारा सारखा वाटत असे.
 जवळूनच खळखळ वाहणारी वगळ. तिच्या पाण्यातून आम्ही कितीतरी वेळा ये जा करत असे. पावसाळ्यामध्ये आजीच्या पाठीमागे घोगता घेऊन रानातील वेचलेलं केनपट. आषाढ, श्रावणात सरी मागून येणारे सरी. आज सगळं काही आठवत आहे. मला आठवते आमचं ते लहानपणीचे माळवदच घर. पावसामध्ये चिंब भिजवून, जणू काही निसर्गाने त्याला रंगच दिला आहे. असे भासत असेल. पावसामध्ये भिजून त्याच्या मातीचा सुटलेला सुगंध आजही लाखो रुपयांच्या परफ्युम पुढे  पुढे फिका वाटतो. पाऊस थांबताच गुरांच्या छपरातील गोठ्यातून आपलं अंग झाडीत बाहेर येणाऱ्या कोंबड्या आजही मला त्या आठवणीकडे घेऊन जातात. 

 आमच्या त्या लहानपणीच्या काळी, गॅस एवढा नव्हताच. पावसाळ्यात चूल पेटवताना आईची चाललेली धडपड. कितीतरी वेळा मी माझ्या डोळ्यांमध्ये साठवलेली. आमचं मातीचे घर रात्रभर पाऊस लागून राहिला तर. सर्वत्र गळत असे, त्या गळणाऱ्या पाण्याने घर ओलं होऊ नये म्हणून सर्वत्र ठेवलेली भांडी. आजही आठवत आहेत. तशाच परिस्थिती  गळणाऱ्या घरांमध्ये छोट्याशा उभीला घेतलेली विश्रांती. एवढं आम्ही पावसाबरोबर जीवन  जगलेलो 
 
आमचं गाव नदीच्या कडेलाच! पावसाळ्यात नदीला आलेला पूर पाहणे म्हणजे जीवनातील एक पर्वणीच! कितीतरी वेळा ती दुतोंड भरून वाहणाऱ्या नदीकडे मी मन लावून पाहत असेल.
 संपूर्ण आकाशात ढगांचा झालेला काळा कुट्ट रंग, त्यात कडाडणाऱ्या विजा, आणि मनसोक्त तो पडणारा तो पाऊस. हे मी सगळं अनुभवलेलं...
एका झाडाजवळून जाणारा चिखलाचा रस्ता, शेतात साचलेले पाणी आणि पुराची शांत खुण
ओल्या मातीतून वाहणारा रस्ता आणि आठवणींच्या ओसाड खुणा…

 पण मी हे आज का आठवत आहे? आज पावसात भिजल्यामुळे  आठवणी जागा झाल्या असतील कदाचित.
 या सर्व पावसाळ्याच्या आठवणी जाग्या होत असताना. शाळेतील आठवणी कशा दूर जातील माझ्यापासून!
 शाळेच्या आठवणी म्हणजे जीवनाची एक शिदोरीच..
 आजही आठवते, पावसाळ्याच्या आभाळामुळे सर्वत्र पडलेला अंधार. आणि आम्ही वर्गात बसलेले बाल सवंगडी.
 जरी आभाळामुळे अंधार पसरला असला, तरी त्या पसरलेल्या अंधारात आणि पडणाऱ्या पावसाबरोबर, मी शाळेत असताना शिकलेलो  एक कविता. माझी ती आयुष्यातील सगळ्यात मोठी आठवण. प्रत्येक पावसाळ्यात मला तीची आठवण येते. आजही असेच तीची आठवण आली. आणि मी लिहिण्यामध्ये रमून गेलो......

   पावसाळ्याच्या सरीत हरवलेली आठवणीतील एक     कविता - " कणा "
      
   
     ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
     कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी 
 
    क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
    गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून 

     माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली 
     मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली 

      भिंत खचली, चूल वीझली होते नव्हते गेले 
      प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले 

     कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे 
     चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे 

    खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
     पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला 
  
    मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा 
    पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा...,
                                 कुसुमाग्रज.....
पावसात पुरामुळे धूसर झालेलं आणि अर्धवट पाण्यात बुडालेलं घर
पावसाच्या पुरात वाहून गेलेलं घर — आठवणींसह हरवलेलं आशियान


 या कवितेच्या प्रत्येक शब्दाने माझं जीवन समृद्ध करावं. मी पावलो पावली यातून काहीतरी शिकावं. आणि त्यातून मला जगण्याची नवी वाट कायम मिळत राहावी. एवढी ही कविता मला माझ्या आठवणीतील एक प्रेरणादायी मार्गदर्शक वाटते..

 कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी..
 या ओळीतून मला माझ्या लहानपणची आठवण येते. माणसांना कितीही मोठं झालं तरी आपण गरीबीतून भोगलेले  दिवस कधीही विसरू नये. किती मोठे झाले तरी आपण ज्या दिवसातून आलोय त्या दिवसांची आठवण विसरू नये.

 गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात  राहून..
 
जीवनात आलेल्या संकटांना कसं हसत हसत समोर जावं. हेच मला ही ओळ शिकवते. त्याच्या घरी पूर आलाय नदीचा तरीही तो आलेल्या पोराला पाहुणी म्हणतो. आपणही असंच जीवन जगावे ना. आलेल्या संकटांना हसत हसत समोर जावं. नाहीतर आजकाल आपण पाहतोस छोटे छोटे संकट आणि डिप्रेशन मध्ये जाणं. आणि त्यामधून आत्महत्या सारखा अवलंबक स्वीकारणं.

 माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली 
 मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली.

 त्याचा सगळा संसार वाहून नेणाऱ्या नदीच्या पुराला माहेर तो वाशिण पोरगी म्हणतो. सगळं पुरात वाहून गेलं तरी, बायको वाचल्याचा समाधान त्याच्या चेहऱ्यावर उठून दिसतं.
 आपन ही असच जीवनात कितीही मोठे संकट आलं तरी त्यामध्येही आपला आनंद शोधला पाहिजे.

 प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले..

 पुराना संसार मोडून पडला, होतं नव्हतं सगळं गेलं, डोळ्यांमध्ये फक्त अश्रू राहिले. तरी तो त्या अश्रूंना प्रसाद म्हणतो. कितीही मोठी सकारात्मक ऊर्जा. आपल्यावर आलेल्या संकटांना प्रसाद म्हण. आजकालच्या पिढी छोट्या छोट्या  संकटांनी मोडून जाऊन व्यसनाधींच्या आहारी जाणे किंवा जीवन संपवणे ह्या तर रोजच्याच बातम्या झाल्या आहेत. त्यावेळी मला या कवितेतील लढणारे नाईकाची खूप आठवण येते..

 कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे.
 चिखलगाळ काढतो आहे फडकी भिंत बांधतो आहे.
 जीवनात कितीही संकट आली तरी जीवाला जीव देणारी माणसं बरोबर असली की त्यावरही मात करता येते हीच ही कविता मला शिकवते.

 खिशाकडे हात जातात हसत हसत उठला 
 पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला..
 
 त्याचा सगळा संसार मोडून पडला आहे. तरीही त्याने मदतीची अपेक्षा ठेवली नाही. ना सहानभूती अपेक्षा. नाहीतर आजकाल आपण पाहतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवून जगणे. सहानुभूतीची मदतीची अपेक्षा ठेवता ठेवता. आपण आपल्यातील लढण्याची उमेदच हरवून बसलोय  का काय असं वाटायला लागलं आहे. आज आपल्यातला संवाद हरवला आहे. जो तो मोबाईल मध्ये बंद झाला आहे. आपण मनमोकळे गप्पा मारणे विसरून गेला आहे. सगळ्याच गोष्टी पैशाने होतात असं नाही. कधी कधी फक्त आपुलकीचे साथ खूप असते आपल्याला लढायला लढण्याची प्रेरणा देण्यासाठी.
 त्यामुळेच तो म्हणतो पैसे नको सर. जरा एकटेपणा वाटला.

 मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.
 पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा...

 पुरामध्ये सगळ्या संसार वाहून गेला, मोडून पडला. परंतु त्याच्यातील लढण्याची शक्ती मोडली नाही. संघर्ष करण्याची ताकद मोडली नाही. नाही त्याची उम्मीद मोडून पडली.. आपणही असंच प्रत्येक संकटापुढे छाती ठोकून उभा राहव. दोन हात करावी त्याच्याशी. द्यावा लढा येणाऱ्या संकटांना बेभान होऊन. सह्याद्रीच्या पर्वतासारखं उभे राहावं जीवनात येणाऱ्या संकटांपुढं. आणि या संकटाबर लढत असताना, मी कोणाच्या मदतीची या सहानुभूतीची अपेक्षा न करावी. हेच मला ही कविता शिकवते.

 ही कविता मला शिकवते... तुझ्यात संकटाशी दोन हात करण्याची हिम्मत असेल तर, जरी तुझ्या पाठीशी कोणी नसेल. तरी मी तुझ्या पाठीशी कायम असेल..
 
 माझा हात तुझ्या पाठीवरती ठेवून मी कायम तुला लढ म्हणेल.........


 पावसाच्या सरीत भिजताना मला ही माझ्या जीवनातील गोड आठवण आज आठवली..

 तुमच्याही पावसाळ्याच्या संबंधी काही आठवणी असतील,
 काही आवडत्या कविता असतील, केव्हा काय आवडत्या घटना. तर कमेंट मध्ये नक्की सांगा.. मी तुमच्या अभिप्राय ची वाट पाहत आहे... 

✍️ "तुमचं मत द्या! तुमच्या शब्दांनीच आमचं लेखन समृद्ध होतं..."

 जाता जाता एवढेच म्हणावं वाटतं..
" पाण्याने वाहून जातात वस्तू.. पण मनाच्या मातीखाली खोलवर रुजलेली ताकद, लढण्याची शक्ती कधीच वाहत नाही, त्यावेळी संकटांशी सामना करताना आपल्या पाठीवरती हात ठेवते. ती ही कविता  " कणा "

 मनापासून लिहिलं मनापर्यंत पोहोचलो...,
 आपलाच ब्लॉगर लेखक कुलदीप लोंढे.....
#पाऊस  
#कविता  
#कणा  
#आठवणी
#वाचन वेडा

Follow me: Facebook | Instagram

Share: Facebook | Twitter | WhatsApp

लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..