"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

"शासनाला कळू नये काय?" — आजीचा प्रश्न आणि लोकशाहीचं भवितव्य!

 ⚠️ सूचना:

[ही पोस्ट कोणत्याही राजकीय पक्ष वा नेत्यावर टीका करण्यासाठी नाही.

ही एक साधी विचारमंथनात्मक मांडणी आहे — सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न आणि आपल्या लोकशाही प्रक्रियेवर चिंतन करणारी.]


"शासनाला कळू नये काय?" — आजीचा प्रश्न आणि  लोकशाहीचं भवितव्य!...


 आजचा रविवारचा दिवस. सुट्टी असल्यामुळे थोडं मार्केटमध्ये जाऊन आलो. येताना न चुकता दोन-तीन पेपर घेतले. रविवारच्या दिवशी पेपरला पुरवणी लेख असल्यामुळे, दर रविवारी दिवसभर पेपर वाचायचे, हा माझा आता जवळजवळ एक नियमच बनवलेला. त्यामुळे निवांत पेपर चाळत बसलो होतो. एक एक लेख  समजून घेत होतो. तेवढ्यात माझी नजर सकाळ पेपर मधील एका लेखावर गेली. 


 'मतदारयादी पुनरीक्षण'... 

 मन लावून तो लेख वाचू लागलो. लोकशाही ही संपूर्ण जगभर अनुसरली जाणारे शासन प्रणाली. पण गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील लोकशाहीला उतरती कळायला लागली आहे.

' डेमोक्रॉसी रिपोर्ट 2025 ' या अहवालात ' व्ही -डेम ' या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून दिसून आले आहे. आपण लोकशाहीचे पतन रोखू शकलो नाही. आणि आता आपला प्रवास मागल्या पावलाने सुरू आहे. एखाद्या देशात निवडणुका घेतल्या जातात म्हणजे तिथं लोकशाही नांदत आहे असे काही नाही. तेथे लोकशाही अस्तित्व असते फक्त निवडणुकांपुरते. भारताने आता आपले 'उदारमतवादी लोकशाही 'असलेल्या देशाच्या यादीतील स्थान गमावले असून,' निवडणुकीवर आधारित' एकाधिकारशाही ' देशांच्या यादीत भारत आता मोडतो. 179 देशांच्या यादीत भारताचे स्थान शंभरच्या क्रमांकावर घसरले आहे. भारताच्या या गच्छंदि मुळे  आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची नाचक्की झाली आहे.[ संदर्भ- सकाळ सप्तरंग दिनांक. 20 7 2025 ]

 हा लेख वाचत असतानाच, मला माझ्या लहानपणी आजीचा एक प्रश्न प्रकर्षाने आठू लागला. हा प्रश्न कित्येक वेळा आजी कडून माझ्या कानी पडला होता.

लहानपणी माझी आजी एक वाक्य वारंवार म्हणायची...

"शासनाला कळू नये काय?"

गावातल्या काय घटना घडली, वीज गेली असेल, किंवा रेशन वेळेवर मिळालं नसेल की आजीचा हा प्रश्न गूंजायचा...

शासनाला कळू नये काय?"

तिच्या डोळ्यात राग नसे, फक्त एक भाबडा विश्वास असायचा — 'शासन' म्हणजे आपलं... आपल्या सुख-दुःखातलं!'

शांतपणे पाहणारी आजी, लोकशाहीवर विचार करताना दाखवलेली
"ती म्हणायची... शासनाला कळू नये काय? प्रश्न साधा होता, पण अर्थ गहिरा!"


 मला लहानपणी या प्रश्नाचे खूप कुतूहल  वाटायचं. शासन म्हणजे काय?काय कळत नसे. पण शासन म्हणजे खूप मोठा कोणीतरी राजा आहे. अन आपण त्याच्या राज्यात राहतो. असं काहीतरी माझा समज असायचा. पुढे शाळेत राज्यघटना शिकलो. शासन व्यवस्था शिकलो, लोकशाही शिकलो. काय दिवस स्पर्धा परीक्षेच्या मुलांना राज्यघटना शिकवल्यामुळे, राज्यघटना, लोकशाही, या गोष्टी माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या बनत गेल्या. आणि आजचा हा लेख वाचताना मन थोडं उदास झालं..

 आणि आजीचा तो प्रश्न पुन्हा आठवला. शासनाला कळू नये काय?

 एका पिढीचा काळ बदलला. आजीचा प्रश्नही बदलला असेल. पण काय प्रश्न आजही माझ्या मनात उमटतात. आता आपल्याला शासन म्हणजे काय हे कळलं. पण शासनाला आपण कळत आहे का?

 हा प्रश्न मनात उमटताच, माझ्या जीवनाशी निगडित तीन प्रश्न माझ्या डोळ्यासमोर फिरवू लागले.

 आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सेवा व उद्योग..

 भोळ्या आजीच्या शासनाकडील अपेक्षा काय असतील? अन आज माझ्या वाटेला काय येत आहे? हे सगळं चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.

आरोग्य..

 शिवरायांच्या काळात जखमी सैनिकांच्या केलेल्या व्यवस्था. नंतर त्यांच्या पोटात पाण्यासाठी लावून दिलेले मार्ग. याच मार्गाने आपले शासन जात असेल असे मला वाटलं. परंतु सार्वजनिक आरोग्यवस्थेची चालू असलेले अवस्था. तर दुसरीकडे खाजगी हॉस्पिटलचे येणारे भरमसाठ बिल. आणि यामध्ये भरडून जाणारी सर्वसामान्य जनता. वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून रस्त्यावर झालेली  प्रसूती  हे बातमीत आपण कितीतरी वेळा पाहिला आहे. दुसरीकडे कुपोषणामुळे होणारे बालकांचे मृत्यू. हे पाहिल्यावर आजीला सांगावं वाटतं. शासनाला अजून कळलं नाही.

शिक्षण..

 चांगलं व दर्जेदार शिक्षण मिळणं हा  प्रत्येकाचा हाक्कच. पण आज मराठी शाळांची झालेली दुरावस्था. खाजगी महाविद्यालयांच्या वाढलेल्या भरमसाठ फी. त्यामुळे आजही गरिबांची मुलं शाळेत न दिसता उसाच्या  फडावर का दिसतात या प्रश्नाचे उत्तर मिळतं. मला एक प्रश्न कायम पडलेला? सरकारी शाळा बंद पडत असतानाच, मोठमोठ्या राजकीय लोकांच्या खाजगी शाळांच्या टोलेजंग इमारती कशा उभ्या राहत आहेत ? पुढील शिक्षणासाठी लागणारी  भरमसाठ फी आपल्याकडे नाही म्हणून, गोरगरिबांची मुलं दहावी बारावीचे पुढे. शिक्षणाची दार बंद करताना. समाजामध्ये सहज दिसतात.

 सार्वजनिक सेवा व उद्योग..

 यासंदर्भात सगळ्यात जास्त प्रश्न मला कायम पडलेले. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वच सार्वजनिक सेवा आणि उद्योगांची झालेले वाताहत. पाहून माझं मन कायम हळहळलेलं.

 ग्रामीण  जीवनाशी जोडलेली एसटी. व  तिची आजची अवस्था. आमच्या सहकारी सूत गिरण्या, आमचे सहकारी साखर कारखाने, हे सर्व आज शेवटचे घटका मोजताना दिसतात.

 यांना पाहून एक प्रश्न कायम मला पडत आलेला? हे आपले सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असणारे सेवा, सार्वजनिक उद्योग,डबघाईला येऊन बंद पडत असताना....

 राजकीय लोकांचे उद्योगच कसे भरभराटीला येतात?.

 यांच्याकडे उद्योगाचे एवढं मोठं कौशल्य असेल तर, मग हे लोक राजकारणात का येतात? 

मोठ-मोठे उद्योग उभारून देशाची सेवा का करत नाही?

 बर यांच्याकडे उद्योगांचे एवढे  मोठे कौशल्य असेल, स्वतःचे उद्योग भरभराटीला हे आणत असतील. तर मग यांच्याकडे असणारे सार्वजनिक उद्योग डब घाईला कसे जातात? 

 प्रश्न अनेक होते पण उत्तर सापडत नव्हती.. आज माझी आजी अस्तित्वात नाही. नाहीतर कधीतरी तिचाही प्रश्न पडला असता कानी,..

 शासनाला कळू नाय काय?..

शासनाला कळू नये काय — हा प्रश्न आजीच्या काळातही असाच होता, आजही आहे. पण आजचं शासन जनतेला समजून घेतंय का, हाच मोठा प्रश्न आहे.


आणि आज मला मनातल्या मनात आजीला म्हणावं वाटतं

    — "शासनाला कळणं दूर... शासनच कळत नाही             आता!"

 

 मला तर नाही कळलं शासन म्हणजे काय? पण तुम्ही वाचक वर्ग या प्रश्नाचे उत्तर नक्की देताल.

"तुमच्या मते ‘शासन’ म्हणजे नेमकं काय? लोकशाहीची खरी व्याख्या काय असावी?

खाली तुमचं मत नक्की शेअर करा — कमेंटमध्ये तुमच्या उत्तरांची वाट पाहतो!"


 आपला ब्लॉगर लेखक कुलदीप लोंढे..




--Google Translate-->

Follow me: Facebook | Instagram

Share: Facebook | Twitter | WhatsApp WhatsApp

लेखक: कुलदीप लोंढे

टिप्पण्या

  1. खरंच आजपर्यंत कळलं आहे का शासन म्हणजे काय, आज लेख वाचल्यानंतर हा प्रश्न पडला शासन म्हणजे काय?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

"तुमचं मत नक्की कळवा! Google अकाउंट किंवा Anonymous म्हणून कमेंट करता येईल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत!"

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

श्रीमंत कसे व्हावे? पैशांचाखेळ की इच्छांचे गणित?

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "