"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
जवळचा एक मित्र गमावला..
मनाला खूप हेलावून टाकणारी घटना नुकतीच आयुष्यामध्ये घडून गेली. नियती एवढी पण कठोर असते. याचाच परिचय त्या दिवशी आयुष्यामध्ये झाला. ज्याच्याबरोबर लहानपणापासून खेळलो, बागडलो. अशा एका जीवाभावाच्या मित्रांन खूपच अनपेक्षित वेळी जगाचा आहे आणि माझाही निरोप घेतला होता. त्याच्या अकाली जाण्याने माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण केली होती. त्याच्या जाण्याची हानी कशानेच भरून येणारे नव्हती. त्याच्याबरोबर शाळेत घालवलेले एक एक दिवस. एकेक आठवणी डोळ्यांमध्ये अश्रूंबरोबर तरळत होत्या. अनंतामध्ये तो विलीन झाला होता ;पण माझ्या मनामध्ये विचाराचं 'अनंत काहूर ' उठलं होतं. आणि मी माझ्या अस्वस्थ मनामध्ये त्याची उत्तरं शोधत होतो.
![]() |
| मित्राच्याअचानक जाण्याने विचारात बुडलेला एक व्यक्ती |
आपण संवाद हरवून बसलो आहे..
सोशल मीडियाने भर भरलेला हा काळ. जग अगदी कवेमध्ये आल्यासारखं वाटतं. संपर्काचे एक ना अनेक साधने उपलब्ध. फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टा, अशी एक ना अनेक साधना माझ्या हातात. पण खरच आपण मनाने एकमेकांच्या जवळ येतो का? एकमेकांच्या सुखदुःखामध्ये मनापासून सहभागी होतो का? मी माझ्या मनातील वेदना, सुख दुःख, खरंच मनापासून व्यक्त करू शकतो का? का त्या मृगजळासारखं या रखरखत्या उन्हामध्ये या आभासी दुनियेत जगतो आहे . त्यावेळी माझ्या मनाला जाणीव झाली. आपण एकमेकांतील संवाद हरवून बसला आहे. या सोशल मीडियाच्या दुनियेत एकमेकांच्या जवळ वाटत असलं तरी मनापासून एकमेकांच्या खूप दूर गेलो आहोत. आणि दुनियेच्या या गर्दीत आपण एकटेच हरवून जात आहे. मी माझा आत्मिक शोध न घेता दुनियेच्या शर्यती फक्त धावत आहे.
माझी सुखाची आणि श्रीमंतीची व्याख्या काय?
जगाशी तुलना करताना. मी ही ऐश्वर्य आणि श्रीमंतीचे जीवन जगाव म्हणून स्वतःला हरवून बसतो. आणि मनाच्या खऱ्या समाधानापेक्षा संपत्तीच्या मायाजाळा माग धावत सुटतो. आपल्या समाजात 'श्रीमंत'आणि 'गरीब' या दोन शब्दांना सहसा बँक बॅलन्स, आलिशान गाड्या, मोठं घर आणि अंगावरील दाग दागिने, याच्याशी जोडल जातो. ज्याच्याकडे भरपूर पैसा तो श्रीमंत आणि ज्याच्याकडे उदरनिर्वाचे साधने कमी तो गरीब, अशी व्याख्या आपण ठरवून बसलो आहे. परंतु श्रीमंती खरोखरच पैशावर मोजली जाऊ शकते का? त्या मागे काय वेगळं मानसशास्त्र किंवा जीवशास्त्र आहे का?
"श्रीमंती आणि गरिबी यांचं नातं देखील शून्य आणि अनंत यांच्यासारखा आहे. हे सगळं तुमच्या इच्छेवर अवलंबून असतं." वरवर हा विचार सोपा वाटत असला तरी, यातच मानवी जीवनाचे त्रिकालबाधित सत्य दडला आहे.
गरीबी आणि श्रीमंतीचा वेध..
इच्छाआणि उत्पन्न: आपल्या जगण्यातदोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. आपली इच्छा व आपले उत्पन्न. आपण रात्रंदिवस कष्ट करतो. कारण आपल्याला वाटतं उत्पन्न वाढून आपण श्रीमंत होईल. परंतु, वास्तवात श्रीमंताची व्याख्या पण माझ्याकडे वर ठरत नाही, तर ती उत्पन्न आणि इच्छा यांच्यातील फरकावर ठरते.
![]() |
| श्रीमंती ही आपल्या विचारावर अवलंबून असते |
श्रीमंतीचा नियम :
" जर तुमचे उत्पन्न तुमच्या इच्छा पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही श्रीमंत आहात." उदाहरण अर्थ मला महिन्याला 40 हजार रुपये मिळतात. पण माझ्या इच्छा व गरजा खूप मर्यादित आहेत. तीस हजारात मला सर्व सुख सुविधा मिळतात. आणि मी त्यात समाधानी आहे. इथे माझे उत्पन्न माझ्या इच्छेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मी मानसिक व आर्थिकदृष्ट्या 'श्रीमंत' आहे.
गरिबीचा नियम :
" जर तुमच्या इच्छा तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतील, तर तुम्ही गरीब आहात." उदाहरण अर्थ माझे उत्पन्न मासिक दोन लाख रुपये आहे. परंतु माझ्या इच्छा अफाट आहेत. मला महागड्या वस्तू, महागड्या गाड्या, चैन बाजीचे जीवन, हवं असतं. आणि त्याचा खर्च महिन्याला चार लाख होत असेल, अशावेळी मी महिन्याला दोन लाख कमवूनही, सतत कर्जामध्ये असेल. मानसिक तणावामध्ये असेल.कारण माझे उत्पन्न माझी इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरते. मी भौतिक दृष्ट्या श्रीमंत दिसत असला तरी, मानसिक दृष्ट खूप गरीब ठरत असतो.
शून्य आणि अनंताचा खेळ.
गरिबी आणि श्रीमंतीचे नातं 'शून्य'आणि 'अनंत' सारखा असतो. अनंत म्हणजे ज्याला कोणताही अंत नाही. माणसाच्या इच्छा देखील अशाच असतात. एक पूर्ण झाले की लगेच दुसरी जन्माला येते. सायकल असणाऱ्याला मोटरसायकल हवी, मोटरसायकल असणाऱ्याला कार हवी, मी कार असणाऱ्या विमानाचे वेध लागतात.
याउलट 'शून्य' म्हणजे पूर्णविराम. समाधानाचे छोटेसे वलय. जेवढे तुम्ही तुमच्या इच्छा कमी करता, म्हणजे शून्य जवळ आणता. तेव्हा तुम्हाला जे काय आहे, ते अमूल्य वाटू लागतं. इथे तुम्हाला तुमच्या समाधानाचा शोध लागतो . फक्त इच्छेच्या मागे धावत राहिला, तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. कारण इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. खऱ्या श्रीमंतीचा मार्ग : इच्छा कमी करणे हाच आहे.
" मी स्वतःला श्रीमंत मानतो कारण माझ्या इच्छा माझ्या उत्पन्नापेक्षा कमी आहेत. मी श्रीमंत झालोय कारण मी माझ्या इच्छांवर विजय मिळवला आहे.हाच विचार आपल्याला समाधानाकडे आणि जीवनमूल्या कडे घेऊन जातो.' संतोष'आणि 'समाधान' ही जगातील सर्वात मोठी संपत्ती. जगामध्ये सर्वच जण करोडपती नाही होऊ शकत. कारण प्रत्येकाची परिस्थिती, कौशल्य व संधी वेगवेगळ्या असतील. पण इच्छा कमी करणे पूर्णपणे माझ्या हातात आहे. मला श्रीमंत होण्यासाठी फक्त एका जागरूक मनाची गरज आहे.
जर तुम्ही आज पासून तुमच्या आवश्यक इच्छा, स्पर्धा करण्याची वृत्ती, आणि दिखाव्याचे जीवन बाजूला ठेवले, तर या क्षणी तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतात.
![]() |
| मित्रांबरोबर आनंदी क्षण जगताना.. |
आयुष्यातील खरी समृद्धी...
आयुष्यातील खरी समृद्धी काय आहे? फक्त भौतिक श्रीमंती म्हणजे जीवन नव्हे. आपल्याला आपल्या आयुष्यातील खरी समृद्धी आपल्या विचारांच्या ताकतीवर शोधावी लागेल. मला वाटते ती पुढील प्रमाणे असू शकते :
1. चांगले विचार: तुमचे विचार जितके सकारात्मक आणि प्रगतशील असतील, तितके तुमच्या आयुष्य सुंदर बनेल. विचारांची दारिद्र्यता माणसाला कधी सुखी होऊ देत नाही.
2. चांगले कर्म : आपण समाजाला काय देतो यावरून आपली किंमत ठरते. दुसऱ्याच्या कामी येणे, प्रामाणिकपणे वागणे हीच आपल्या कर्माची श्रीमंती.
3. चांगली माणसे : तुमच्या अवतीभवती असणारे माणसं तुमच्या व्यक्तिमत्वावर नकळत परिणाम करत असतात. ते जर प्रेमळ विश्वासू आणि पाठिंबा देणारे असतील, तर तुम्ही खरोखर श्रीमंत आहात.
4. खरा मित्र: सोशल मीडियाच्या या काळात आपण सर्वजण आभासी मैत्रीच्या दुनियेत जगत आहे. इथे तुमचं मनोरंजन होईल. पण भावनिक दृष्ट्या तुमच्या सुखदुःखात सहभागी होणार कोणीच भेटणार नाही. संकटाच्या काळामध्ये सावलीसारखे उभे राहणारे मित्र असणे, हीच जगातील सर्वात मोठी श्रीमंती आहे.
चला मग श्रीमंत बनवूया....
जीवनामध्ये पैसा कमावणे चुकीचे नाही. भौतिक प्रगतीसाठी, कुटुंबासाठी, माझ्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी तो आवश्यक आहेच. पण पैशाच्या मागे धावताना आपण आपले इच्छा अमाप केल्या, तर आपण कधीच श्रीमंत व सुखी होऊ शकणार नाही.
ज्या दिवशी आपल्याला आपल्या गरजा व इच्छा यातील फरक समजेल. मी माझं उत्पन्न वाढवेल, पण इच्छा मर्यादित ठेवील. त्या दिवसापासून माझा श्रीमंतीकडे प्रवास चालू होईल.
आपला आयुष्य केवळ पैशाने नव्हे, तर चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्मानी, चांगल्या लोकांच्या सोबतीने, आणि खऱ्या मित्रांच्या साथीने श्रीमंत होत जाईल..
![]() |
| समाधानाचा शोध लागलेला एक व्यक्ती. |
स्व: सुखाचा शोध..
माझ्या मित्राच्या अचानक जाण्याने माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं. त्याच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली. ती आता कधीच भरून येणार नाही. पण वादळासारख्या निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांनी मला माझ्या सुखाचा शोध लागला..
तुम्हाला काय वाटतं सुख म्हणजे काय?
आपण श्रीमंत होऊ शकतो का?
तुमचा अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवा. तुमचं मत हीच माझी प्रेरणा आहे..
तुमचाच ब्लॉगर लेखक.
कुलदीप लोंढे....
Follow me: Facebook | Instagram
लेखक: कुलदीप लोंढे
खूप छान कुलदीप 👏
उत्तर द्याहटवाThank u
हटवाGood
उत्तर द्याहटवाBarober aahe
उत्तर द्याहटवा