"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
“माणुसकी की फसवणूक? – एक सत्य अनुभव!”
साधारण दुपारची वेळ असेल, नुकतच जेवण करून मुलांबरं त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात चर्चा करत बसलो होतो. चर्चासत्रात सहभागून मुलही मनमोकळ्या पणे त्यांच्या समस्या सांगत होते. ग्रुप चर्चेतून होणारा अभ्यास कायम लक्षात राहतो. असे मुलं मला नेहमी म्हणत. त्यामुळे आम्ही असं चर्चासत्र आठवड्यात एकदा तरी आम्ही सर्वजण मिळून करतोच. अशाच आमच्या गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यात तिथे एक माझा मित्र आला. आणि मला त्याने निरोप दिला. तुला शिंदे सिस्टर ने वेळ मिळाला तर घरी येऊन जायला सांगितलं आहे. मी त्याचा निरोप ऐकून घेऊन थोड्यावेळ चर्चा सत्रात भाग घेतला. आणि शिंदे सिस्टर च्या घरी जाण्यासाठी क्लासरूमच्या बाहेर पडलो.
शिंदे सिस्टर शासकीय आरोग्य सेवेत कार्यरत असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व! आपल्या कामाच्या कर्तव्याबरोबरचं, सामाजिक प्रश्नाची तळमळ, जाण आणि आवड असणार त्यांचं व्यक्तिमत्व. आम्हा मुलांच्या रूमच्या जवळच त्यांचं घर होतं. कोविडच्या काळामध्ये जेव्हा आम्ही घरी न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला आर्थिक आणि मानसिक असा खूप मोठा आधार दिला होता. आम्हा मुलांची आपल्या मुलांप्रमाणे नेहमी अस्थिने चौकशी करत असतात. आपल्या कामतून जसा वेळ मिळेल त्यावेळी त्यांनी सामाजिक प्रश्न, आपली जबाबदारी, आजचा युवक, आजची राजकीय परिस्थिती आशा एक ना अनेक विषयांवरती आम्ही मनसोक्त गप्पा मारलेल्या. त्यांच्याबरोबर बोलताना मला त्यांच्या चिकित्सक आणि खोल अभ्यासक वृत्तीची कायम जाणीव होत असे. मी ही खूप काही त्यांच्याकडून शिकत असे. या सर्व गोष्टी डोक्यामध्ये चालू असताना, मी त्यांच्या घराजवळ येऊन पोहोचलो.
दरवाजाची बेल वाजवताच अगदी अस्थेने त्यांनी दरवाजा उघडला. हॉलमध्ये बसताना मी सोफ्यावर ठेवलेला पेपर चाळू लागलो. पेपर वाचत असतानाच शिंदे मॅडमनी माझ्यासाठी चहा आणला. अनेक सामाजिक विषयामध्ये मनमोकळे चिंतन केलेल्या शिंदे सिस्टर आज मला वेगळ्याच भासत होत्या. त्यांचा चेहरा दीर्घ गंभीर आणि खोल दुःखात बुडलेला भासत होता. चहा घेता घेताच मी त्यांना विचारलं सिस्टर काय झालं? काय बोलायचं आहे का? असं लगभगिनी निरोप देऊन का बोलावलं. त्या मनातून खूप तुटल्यासारख्या वाटत होत्या. खोल गेलेला आवाज आणि पाणवलेल्या डोळ्याच्या कडा या अवस्थेतच त्या माझ्याबरोबर बोलू लागल्या..
"‘कुणाशी बोलू नकोस, पण तू ऐकू शकतोस ना...?’ त्या म्हणाल्या आणि पुढे जे सांगितलं ते ऐकताना माझ्या अंगावर काटा आला. त्यांच्या डोळ्यांतल्या थेंबांपेक्षा त्यांच्या शब्दांमध्ये जास्त वेदना होत्या...
साधारण चार-पाच महिने पूर्वीची गोष्ट असेल. स्कुटी वरून कामावर जात असताना, सिग्नल जवळ उभी होते. तेवढ्यात आपल्या एका लहान बाळाला काखेवर घेऊन फिरणारी तरुणी जवळ आली. काखेला बाळ होते आणि भर उन्हात ती बाळाला घेऊन चालत होती. जणू काही,"भर उन्हात, रस्त्यावर ती बाळाला काखेत घेऊन अंधाऱ्या भविष्यात चालत आहे असं भासत होतं. माझ्या अगदी जवळ येऊन म्हणाली ताई एक मदत करता का? मला वाटलं पत्ता विचारत असेल. मी तिच्याकडे आपुलकीने हास्य करून पाहिले. ती मान खाली घालून बोलली. कराल का तुम्ही मदत? आणि पुन्हा मान खाली घातली. मी तिला म्हणाली हो मी करेल मदत पण आधी सांग तरी काय हवं आहे. केविलवाल्या चेहऱ्याने ते बोलू लागली. बाळाला दवाखान्यात न्यायचा आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत. मिस्टर सेंट्रींग च्या कामावर जात होते. कामावर असताना एक दिवस बिल्डिंग वरून पडून त्यांचा अपघात झाला. त्यांच ऑपरेशन झालं आहे आणि ते जाग्यावर झोपून आहेत. मी थोडं चौकस वृत्तीने चौकशी केली. घरचे कोणी नाहीत का? त्या ती म्हंटली आमचं लव्ह मॅरेज आहे..
नवऱ्याकडे आई-वडील नाहीत. एक घर आहे. आमचं सुरळीत चाललं होतं. पण बाळ सहा महिन्याचा असताना नवऱ्याचा अपघात झाला. माहेरचे कुणी फिरकले नाहीत. मला त्याचं वाईट वाटलं. त्यापेक्षा ते बाळ आजारी असल्याचं वाईट वाटलं. कारण मी ही एक सिस्टर्स आहे ना. आजारपणाचे दुःख माझ्यापेक्षा कोणाला जास्त कळणार. बाळाला दवाखान्यात नेण्यासाठी मी पर्स मधून दोनशे रुपये ची नोट काढली व तिच्या हातावर ठेवली. व तिला म्हटलं मी सोडू का तुला दवाखान्यात?. तर ती नको म्हटली मी जाईल माझं. जाताना तिने मला एक दोन वेळा नमस्कार केला. व त्यानंतर मी ती घटना विसरून गेले.
![]() |
| "एक मदतीचा हात – पण प्रश्न पडतो, गरज खरी की अभिनय?" |
मागच्याच महिन्यात आमच्या विभागाची एकदिवसीय कार्यशाळा असल्यामुळे, आम्ही सर्व स्टाफ मैत्रिणी गाडीने ऑफिस कडे चाललो होतो. त्यावेळी तीच मुलगी एका सिग्नल वर गाडीतील माझ्या मैत्रिणीकडे मदत मागताना मला दिसली. बहुतेक तिने मला ओळखलं नसावं. यावेळी ती जरा खूपच खराब आणि नाजूक दिसत होती. मी तिला म्हटलं आता काय झालं बाळ बरं आहे ना? त्यावेळी ती रडत बोलली. बाळ बरं आहे पण नवऱ्याचं आजारपण वाढत चालल आहे. त्याच अजून एक ऑपरेशन करावे लागेल. काही मदत मिळाली तर बरं होईल . सिग्नल वर असल्यामुळे मी काही न बोलता गडबडीतच तिच्या हातात पाचशे रुपयाची नोट ठेवली. यावेळी मात्र मी तिला माझा मोबाईल नंबर लिहून दिला. अन काय अडचण असेल तर फोन करायला सांगितलं. माझ्या या वागण्यामुळे मैत्रीण माझ्यावर खूप नाराज झाली. असं कोणत्या पण भिकाऱ्याला पैसे नसतात द्यायचं. असं बोलू लागले. मी तिला म्हटलं ती भिकारी नाहीये. तिच्या नवऱ्याचा एक्सीडेंट झालेला आहे आणि ती खूप अडचण मध्ये आहे.
आमची कार्यशाळा संपली तरी मला तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. तिचं दुःख मला स्वस्त बसून देत नव्हतं. या विचारातच काही दिवस निघून गेले. आणि अचानक एक दिवस मला अनोळखी नंबर वरून फोन आला. ताई तुम्ही मला नंबर दिला होता. माझ्या नवऱ्याचं अजून एक ऑपरेशन करायचा आहे . मला मदतीची खूप गरज आहे. काही मदत करताल का?
मला तिचा दुःखद चेहरा माझ्या डोळ्यासमोर आठवतच होता. यावेळी मी माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींच्या विरोधात जाऊन. सर्वांबरोबर भांडून, आमच्या ग्रुप मधून दहा हजार रुपयांची मदत गोळा केली. व माझेही त्यामध्ये पाच हजार टाकले. यावेळी माझी एक मैत्रीण मला म्हणत होती. तिला मदत करताना आपण तिच्या घरी जाऊ. तिच्या नवऱ्याची परिस्थिती पाहू. व आपण स्वतः त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तसं मी त्या मुलीला बोलले. त्यावेळी ती मुलगी बोलू लागली. ताई आमचं घर खूप लहान आहे व खूप घाण आहे. नवऱ्याची परिस्थिती पाहण्यासारखी नाही. ते एकदा व्यवस्थित झाले की मी तुम्हाला नक्की बोलवेल. यावेळी मात्र तिने नवऱ्याबरोबर फोनवर बोलणं करून दिलं. आणि तोही तेच बोला. आम्ही तिला पैशाची मदत केली. व नवऱ्याच ऑपरेशन लवकरच करण्याचे सांगितले. यावेळी मात्र माझी मैत्रीण खूप चौकस झाली होती. तिला न कळता तिचा मागवो घ्यायचा आणि तिची परिस्थिती पाहिच तिने ठरवलं होतं.
मला तिच्या परिस्थिती विषयी दुःख होतच. त्याची जाणीव मैत्रिणीला ही व्हावी. म्हणून आम्ही तिचा मागोवा घेतला. त्यावेळी जे दृश्य माझ्यासमोर आलं. ते अतिशय हृदय द्रावक हादरून सोडणार होतं. मी तर अगदी तुटून पडले. माझा बीपी हाय झाला. कसंतरी मला मैत्रिणीनं आधार दिला. एवढ्या विश्वासाने माणुसकीने मी सगळ्यांबरोबर भांडून मी जिला मदत केली. ती अतोनात माझ्याबरोबर खोटं बोलली होती. ती आणि तिचा नवरा दोघेही चांगल्या परिस्थितीत होते. "तिचं आणि नवऱ्याचं खरं रूप पाहिल्यावर माझा विश्वासच उडाला." तो ही असंच लोकांना खोटं सांगून दवाखान्याच्या बाहेर लोकांची सहानुभूती घेऊन पैशाची मदत मागत होता. दोघांची मिळून दिवसाची कमाई दीड दोन हजार रुपये होती.आम्ही ज्यावेळी त्यांच्या घरी पोहोचलो. त्यावेळी दोघेही दारूच्या नशे मध्ये होते. आणि जे मुल आजारी आहे असे सांगून मदत घेतली. ती शेजारीच रडत बसल होत. आपल जीवन चैनीत जगण्यासाठी, दुसऱ्याच्या माणुसकीचा असा विश्वासघात करणे. आणि आपल्या स्वतःच्या मुलाच्या भविष्याविषयी असं खेळणं. यामुळे मी अगदी हादरून गेले.
मला शिंदे सिस्टर यांचा स्वभाव जवळून माहित होता. मलाही त्यांनी कित्येक वेळा मदत केली होती. अगदी मनापासून मदत करण्यासाठी त्या नेहमी पुढे असं. त्यामुळे त्यांनी केलेल्या मदतीचा असा विश्वासात होणं. आणि त्यामुळे त्यांना दुःख होणं साहजिकच होतं. मी त्यांना म्हणालो मॅडम तुमची मदत करण्याची भावना प्रामाणिक होती. पण हे जग आता तेवढं प्रामाणिक नाही राहिलं. कित्येक वेळा अशी लोक आपल्या स्वभावाचा फायदा घेऊन आपल्याला सहज फसवतात. आणि ज्यांना खरंच मदतीची गरज असते. त्यांच्याविषयी आपलं मन मात्र नंतर विचार करू लागतं. कारण कुणीतरी आपल्या विश्वासाला ठोस पोहोचवलेली असते.
झालेली घटना सांगू त्याचं मन हलकं झाल्याचं मला जाणवलं. त्या मला म्हंटल्या ही घटना सांगण्याचे एवढे एकच कारण की, प्रामाणिकपणे मदत करताना अशी कुणाची फसवणूक होऊ नये.. मी त्यांना म्हटलं, मॅडम यापुढे मदत करायची पण,
1) मदत करायला हरकत नाही, पण आंधळा विश्वास नको.
2)नेहमी वस्तूस्वरूप मदत करावी – पैसे न देता अन्न, औषधं, चेकअपची सोय, रिक्षाचा खर्च थेट दवाखान्यात वगैरे.
3) थोडं चौकशी करणं चुकीचं नाही – कुणी खऱ्या अर्थाने गरजू असेल, तर त्याला तेही योग्यच वाटेल.
Follow me: Facebook | Instagram
Share: Facebook | Twitter | WhatsApp
लेखक: कुलदीप लोंढे
सुंदर लेख
उत्तर द्याहटवाabhari aahot
हटवाApratim lekh
उत्तर द्याहटवावास्तविक लेख
उत्तर द्याहटवाsaty parasthiti
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिले
उत्तर द्याहटवाThanx
हटवा