पोस्ट्स

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

“तेजाकडून तिमिराकडे... पुन्हा आपल्या जुन्या काळात जाऊ वाटतं”

इमेज
  “मोबाईल युग : तेजाकडून तिमिराकडे… पुन्हा जुन्या काळाची हाक”  आज पुन्हा एकदा ब्लॉग लिहून मला खूप काळ झाला होता. मला ज्याच्यावर लिहायचं होतं, त्याच्यामुळेच मला लिहिण्यासाठी वेळ मिळत नव्हता. आमच्या दोघातील हा संघर्ष मी बऱ्याच दिवस अनुभवत होतो. एखादी गोष्ट खूप तीव्रतेने मनातून करावी असे वाटावे, आणि त्यासाठीच वेळ न मिळावा. या दोन टोकांच्या भावना मी खूप दिवस अनुभवत होतो. आणि आज मला वेळेने त्यावर व्यक्त होण्यासाठी वेळ दिलाच..   आज मी अस्वस्थ भावनेने येऊन, शांत चित्तेने रूमवर बसलो होतो. हातामध्ये पेन होता आणि मनाला न समजणाऱ्या रेषा मी कागदावर ओढत होतो. मनाची अशी अवस्था पहिल्यांदाच अनुभवत होतो. त्याला कारणही तसंच होतं, आत्ता  बाहेरून येताना मी हॉस्पिटल मधून आलो होतो. आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याचा कारण होतं.   मला न येणारी झोप!  तुम्हाला प्रश्न पडला असेल? यासाठी कोण हॉस्पिटल ला जातं का?कारण थोडं वेगळं होतं. पण ते खरं हे होतं. खूप दिवस मनाची अस्वस्थता वाढत होती. त्यामुळे मी आज जवळच्याच ओळखीच्या डॉक्टरला आवर्जून भेटण्यासाठी गेलो होतो. गेल्यानंतर त्यांनी मला प्रेमा...

"शासनाला कळू नये काय?" — आजीचा प्रश्न आणि लोकशाहीचं भवितव्य!

इमेज
 ⚠️ सूचना: [ही पोस्ट कोणत्याही राजकीय पक्ष वा नेत्यावर टीका करण्यासाठी नाही. ही एक साधी विचारमंथनात्मक मांडणी आहे — सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न आणि आपल्या लोकशाही प्रक्रियेवर चिंतन करणारी.] "शासनाला कळू नये काय?" — आजीचा प्रश्न आणि  लोकशाहीचं भवितव्य!...  आजचा रविवारचा दिवस. सुट्टी असल्यामुळे थोडं मार्केटमध्ये जाऊन आलो. येताना न चुकता दोन-तीन पेपर घेतले. रविवारच्या दिवशी पेपरला पुरवणी लेख असल्यामुळे, दर रविवारी दिवसभर पेपर वाचायचे, हा माझा आता जवळजवळ एक नियमच बनवलेला. त्यामुळे निवांत पेपर चाळत बसलो होतो. एक एक लेख  समजून घेत होतो. तेवढ्यात माझी नजर सकाळ पेपर मधील एका लेखावर गेली.   'मतदारयादी पुनरीक्षण'...   मन लावून तो लेख वाचू लागलो. लोकशाही ही संपूर्ण जगभर अनुसरली जाणारे शासन प्रणाली. पण गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील लोकशाहीला उतरती कळायला लागली आहे. ' डेमोक्रॉसी रिपोर्ट 2025 ' या अहवालात ' व्ही -डेम ' या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून दिसून आले आहे. आपण लोकशाहीचे पतन रोखू शकलो नाही. आणि आता आपला प्रवास मागल्या पावलाने सुरू आहे. ए...

"स्पर्धा परीक्षा अपयशानंतर नव्या सुरुवातीची कथा"

इमेज
                       “स्पर्धा संपली मी नाही "......  सायंकाळची वेळ होती. नुकतच बाहेरून रूम वरती आलो होतो. थोडावेळ फ्रेश होऊन, निवांत खुर्चीवर बसलो. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. माझा नेहमीचा छंद म्हणून, दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी,माझ्या लॅपटॉप वरती जुनी गाणी लावून ऐकू लागलो. शांत बसून गाणे ऐकणे हा माझा नेहमीचा छंद!.....संगीत! ईश्वरांन मानवाला दिलेली एक मोठी देणगीच ना! या धावपळीच्या जीवनात आपण आपलं  जगणं विसरत चाललो असलो तरी, गाणी ऐकताना कित्येक वेळा मला माझं जगणं सापडत. कधी मला बालपण  आठवतं, कधी माझ तारुण्य, कधी माझं प्रेम आठवतं, .खरंच मला गाण्यात जगणं सापडत. कारण गाणं म्हणजे फक्त संगीत नाही. तो एक भावनिक आणि मानसिक आनंद आहे. असंच गाण्यात रमून गेलो असताना, अचानक फोन वाजला...  मित्र म्हणाला चल,थोडा वेळ सिटी मध्ये जाऊन येऊ. थोडी एक, दोन काम आहेत. आप्पा बळवंत चौकाकडील भागाकडे जायचं असल्यामुळे मी हो म्हटलं. कारण मला तिथून काही पुस्तक खरेदी करायची होती. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्यामुळे, अनेक पुस्तकांचा...

मदत माणुसकीची.... शिकवण फसवणुकीची..

इमेज
       “माणुसकी की फसवणूक? – एक सत्य अनुभव!”   साधारण दुपारची वेळ असेल, नुकतच जेवण करून मुलांबरं   त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात चर्चा करत बसलो होतो. चर्चासत्रात सहभागून मुलही मनमोकळ्या पणे त्यांच्या समस्या सांगत होते. ग्रुप चर्चेतून होणारा अभ्यास कायम लक्षात राहतो. असे मुलं मला नेहमी म्हणत. त्यामुळे आम्ही असं चर्चासत्र  आठवड्यात  एकदा तरी आम्ही सर्वजण मिळून करतोच. अशाच आमच्या गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यात तिथे एक माझा मित्र आला. आणि मला त्याने निरोप दिला. तुला शिंदे सिस्टर ने वेळ मिळाला तर घरी येऊन जायला सांगितलं आहे. मी त्याचा निरोप ऐकून घेऊन थोड्यावेळ चर्चा सत्रात  भाग घेतला. आणि शिंदे सिस्टर च्या घरी जाण्यासाठी क्लासरूमच्या बाहेर पडलो.   शिंदे सिस्टर शासकीय आरोग्य सेवेत कार्यरत असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व! आपल्या कामाच्या कर्तव्याबरोबरचं, सामाजिक प्रश्नाची तळमळ, जाण आणि आवड असणार त्यांचं व्यक्तिमत्व. आम्हा मुलांच्या रूमच्या जवळच त्यांचं घर होतं. कोविडच्या काळामध्ये जेव्हा आम्ही घरी न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्य...

पावसाच्या सरीत हरवलेली आठवणीतील कविता-"कणा"

इमेज
पावसाच्या सरीत हरवलेली आठवणीतील कविता - "कणा "  पाऊस म्हणजे फक्त थेंब नव्हे.,.. तो आठवणींचा एक झरा असतो, कधी गोडसर, कधी खोल आतपर्यंत मनाला भिनणारा.  आज जेव्हा पावसाच्या सरी अंगावर पडल्या, तेव्हा पुन्हा एकदा जुन्या आठवणी जागा झाल्या..  आणि मन पुन्हा एकदा  त्याच्या गोड आठवणीत रमून गेलं...  कवी लेखकांनी एक ना अनेक रूप पावसाळ्याचे रेखाटलेले.  कोणाला तो ह्या धरती मायला हिरवा शालू नेसवणारा वाटतो.  कोणाला वाट पाहणाऱ्या चातक पक्षासाठी धावून येणारा वाटतो. कोणाला प्रेमिकांना चिंब भिजवणारा वाटतो. तर कोणाला शेतकऱ्याचा जीवनदाता वाटतो.  माझ्याही  या पावसाळ्याविषयी खूप आठवणी... गेला तो काळ, बैलगाडीच्या चाकांतून फिरणाऱ्या जगण्याच्या वाटा आता थांबल्या…  लहानपणी खूप आठवण या पावसाच्या मनाच्या काळजात कोरलेल्या. मला आजही आठवत आहे. पावसामुळे तृप्त होऊन, त्याच्या पडणाऱ्या पाण्यामुळे अगदी नववधू सारखा हिरवागार शालू नसलेल्या माळरानावर  आम्ही लहानपणी गुर राखत असे. त्यावेळी गायीच्या पाठीवर बसणारा तो पांढरा "बगळा " मला एखाद्या राजकुमारा सारखा वाटत असे.  जव...

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..

इमेज
                       प्रेम.....  प्रेम हा असा शब्द, नकळत जरी कानावर पडला तरी; या हृदयाची स्पंदन वाढवणारा. अंगावरती एक हर्षदायी काटा उभा करणारा. आठवणींच्या एका खोल भाव विश्वात घेऊन जाणारा. कधीतरी नकळतपणे डोळ्यांच्या कडा ओलावणारा, तर कधी एक स्मित हास्य निर्माण करणारा. असे एक ना अनेक रंग या प्रेमाचे. प्रेम.. कोणासाठी जीवन असत, कोणासाठी जबाबदारी असतं, कोणासाठी त्याग असतं, कोणासाठी आत्मसमर्पण असतं, तर कोणासाठी भक्ती असतं...  अशा या हिमालया एवढ्या उंची असणाऱ्या आणि समुद्र एवढी खोली असणाऱ्या " प्रेम" या विषयावर मी कधीतरी लिहील. हे माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं. कारण काही विषय अशी असतात की, त्यांच्यावर लिहिण्या  एवढी आपल्या विचारांची उंची आपण कधी गाठू शकत नाही. अशा विषयावर लिहिणं म्हणजे एक तपस्या वाटते. प्रेम या विषयावर लिहिता लिहिता कितीतरी महान लेखकांची हयात गेली. त्यामुळे त्यांच्या एवढी उंची आपण न घाटता. फक्त त्यांच्या विचारांचे पाईक व्हावं. एवढं जरी केले तरी प्रेमा विषय आपण खूप काही केल याची जाणीव होते. अन जर मला कध...

"जनरल ते एसी – प्रवास नाही, प्रतिमा आहे!"

इमेज
          नमस्कार वाचक मित्रांनो,  गेले काही दिवस ब्लॉगवर नियमितपणे काही लिहिता आलं  नाही, याची जाणीव मला होती. काही वैयक्तिक कारणांमुळे लेखनात थोडा खंड पडला. पण मनात विचार सतत चालूच होते – पुन्हा लिहायला सुरुवात करायची, पुन्हा तुमच्याशी संवाद साधायचा. आज पुन्हा नव्यानं सुरुवात करत आहे. तुमचा नेहमीसारखा विश्वास आणि साथ मिळेल, हीच आशा!          – तुमचा, कुलदीप लोंढे               दोन रेल्वे डब्बे... दोन भारत!   प्रवास! जो कधी असतो निवांत भटकंतीचा. तर कधी असतो रोजचाच पोटापाण्यासाठी केलेला. तर कधी असतो तो आपल्या गावाकडे घेऊन जाणारा. जो तो आपापल्या परीने प्रवासाला निघालेला असतो. मीही आज गावाकडे जाण्यासाठी अशाच एका प्रवासाला निघालो होतो. त्यावेळी मला कधी वाटलं सुद्धा नाही आजचा प्रवास माझ्या एवढ्या आठवणीतला बनेल. मला एवढा अंतर्मुख होऊन विचार करायला लावेल. मला एकाच प्रवासात दोन भारत पाहायला मिळेल. हो पण मी हे सगळं अनुभवलं त्याच अनुभवातील ही व्यक्त भावना......  गावी जाण्यासाठी मी लगभगने रूम ...